परभणी शहर : केंद्रीय पथकाकडून शौचालयांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:10 AM2019-01-23T00:10:57+5:302019-01-23T00:11:47+5:30

स्वच्छ महाराष्टÑ अभियानांतर्गत केंद्रस्तरीय पथकाने २२ जानेवारी रोजी शहरातील विविध भागात फिरुन सार्वजनिक शौचालयांसह वैयक्तिक शौचालयांचीही पाहणी केली. यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी वैयक्तिक शौचालयाचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना मनपा अधिकाºयांना दिल्या.

Parbhani city: inspection of toilets from Central team | परभणी शहर : केंद्रीय पथकाकडून शौचालयांची पाहणी

परभणी शहर : केंद्रीय पथकाकडून शौचालयांची पाहणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : स्वच्छ महाराष्टÑ अभियानांतर्गत केंद्रस्तरीय पथकाने २२ जानेवारी रोजी शहरातील विविध भागात फिरुन सार्वजनिक शौचालयांसह वैयक्तिक शौचालयांचीही पाहणी केली. यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी वैयक्तिक शौचालयाचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना मनपा अधिकाºयांना दिल्या.
स्वच्छ महाराष्टÑ अभियानांतर्गत शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सोमवारपासून केंद्रीय पथकातील अधिकारी प्रतिक पाटील व इतर अधिकारी परभणीत दाखल झाले असून, शहराच्या विविध भागात फिरुन प्रत्यक्ष पाहणी केली जात आहे. मंगळवारी गंगाखेड नाका, भिमनगर, परळी गेट आदी भागात फिरुन या पथकाने सार्वजनिक शौचालयांची पाहणी केली. शौचालयांमध्ये पुरेसे पाणी आहे काय, डस्टबिन, हॅण्डवॉश, नॅपकीन आहे का, याची पाहणी अधिकाºयांनी केली. सार्वजनिक शौचालयांविषयी पथकातील अधिकाºयांनी समाधान व्यक्त केले. तसेच वैयक्तिक शौचालयाचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही केल्या.
यावेळी उपायुक्त विद्या गायकवाड, प्रमुख स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, स्वच्छता निरीक्षक विनय ठाकूर आदींची उपस्थिती होती़ शहरातील रस्ते अरुंद आहेत. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला छोटे-मोठे अतिक्रमणे वाढली आहेत. ती काढावित, अशा सूचनाही या अधिकाºयांनी केल्या. त्यानंतर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा ते निरज हॉटेल मार्गे आर.आर. टॉवरपर्यंत रस्त्याच्या बाजूचे अस्थायी अतिक्रमणे काढण्यात आली. बॅनर, नामफलक आणि रस्त्याच्या कडेला असलेले हातगाडे हटविण्यात आले.

Web Title: Parbhani city: inspection of toilets from Central team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :parabhaniपरभणी