परभणी : सातबारावर चढविला ६४ लाखांचा बोजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:09 AM2019-04-16T00:09:47+5:302019-04-16T00:10:27+5:30

तालुक्यातील गोदावरी आणि पूर्णा नदीच्या पात्रातून वाळू उपसा करण्यासाठी शेतातून रस्ता दिल्याच्या कारणाने मिठापूर सारंगी येथील चार शेतकऱ्यांच्या सातबारावर ६४ लाख रुपयांचा बोजा चढविण्यात आला आहे.

Parbhani: The burden of Rs 64 lakh increased on Satara | परभणी : सातबारावर चढविला ६४ लाखांचा बोजा

परभणी : सातबारावर चढविला ६४ लाखांचा बोजा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा (परभणी): तालुक्यातील गोदावरी आणि पूर्णा नदीच्या पात्रातून वाळू उपसा करण्यासाठी शेतातून रस्ता दिल्याच्या कारणाने मिठापूर सारंगी येथील चार शेतकऱ्यांच्या सातबारावर ६४ लाख रुपयांचा बोजा चढविण्यात आला आहे.
तालुक्यातील मिठापूर सारंगी परिसरातील गोदावरी नदीपात्रालगतच्या गट नंबर १८, १९ आणि ५२ मधून काही शेतकऱ्यांच्या शेतीमधून रस्ता तयार केला होता़ मिठापूर येथील गोदावरी नदीतील जवळपास ३०० ब्रास वाळू या रस्त्यावरून अवैधरित्या वाहून नेल्याचा अहवाल तलाठी अरविंंद डांगे यांनी तहसीलदार श्याम मदनूरकर यांना पाठविला़ या प्रकरणी तहसीलदार मदनूरकर यांनी ११ फेब्रुवारी रोजी शेत मालकास महसूल जमीन अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) नुसार नोटीस देऊन याबाबत लेखी खुलासा करण्याचे आदेश दिले होते़ नदीपात्रात जाणारा रस्ता बंद करण्याचे आदेशही या नोटीसीद्वारे दिले; परंतु, या प्रकरणात दोन महिने उलटूनही शेतमालकांनी खुलासा सादर केला नाही़ त्यामुळे मिठापूर येथील विठ्ठल शंकर वारकड, लक्ष्मीबाई प्रभाकर वारकड, रघुनाथ सोनाजी मळवणे, कुशेबा तोलबा आगलावे या शेतकºयांच्या सातबारावर अवैध गौण खनिज उपसा केल्या प्रकरणी दंडासह ६३ लाख १९ हजार ५०० रुपयांचा बोजा चढविण्याचे आदेश तहसीलदार श्याम मदनूरकर यांनी २५ मार्च रोजी दिले होते़ या आदेशानुसार १३ एप्रिल रोजी चारही शेतकºयांच्या सातबारावर बोजा चढविण्यात आला आहे़ या कारवाईमुळे अवैध वाळू साठे करण्यास मदत करणाºयांचेही धाबे दणाणले आहेत़
कारवाईने शेतकºयांतही धास्ती
महसूल प्रशासनाने यापूर्वी वाळूमाफियांविरूद्ध दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई केली आहे़ अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्न करीत आहे़ पूर्णा तालुक्यात वाळू उपसा करणाºयांना मदत करणाºया शेतकºयांच्या सातबारावर बोजा चढवून प्रथमच कारवाई करण्यात आली आहे़ त्यामुळे महसूल प्रशासनाच्या या कारवाईमुळे नदीपात्र परिसरातील शेतकºयांतही धास्ती निर्माण झाली आहे़

Web Title: Parbhani: The burden of Rs 64 lakh increased on Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.