परभणी : उद्दिष्ट प्राप्त न झाल्याने लाभार्थी निवड रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 11:49 PM2018-08-17T23:49:44+5:302018-08-17T23:50:49+5:30

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी कृषी आयुक्तालयाकडून कृषी विभागाला अद्यापपर्यंत उद्दिष्टच प्राप्त न झाल्याने पुढील प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ७ हजार &७७४ शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

Parbhani: The beneficiary selection has not been given due to non-receipt of the target | परभणी : उद्दिष्ट प्राप्त न झाल्याने लाभार्थी निवड रखडली

परभणी : उद्दिष्ट प्राप्त न झाल्याने लाभार्थी निवड रखडली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी कृषी आयुक्तालयाकडून कृषी विभागाला अद्यापपर्यंत उद्दिष्टच प्राप्त न झाल्याने पुढील प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ७ हजार &७७४ शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.
शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करीत असताना यांत्रिकीकरणाची व जोडधंद्याची सोय व्हावी, या उद्देशाने कृषी विभागाने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना अंमलात आणली. या योजनेअंतर्गत शेतकºयांना २४ कृषी निविष्ठांसाठी अनुदान दिले जाते. २०१८-१९ साठी १ ते ३० जून या ३० दिवसांमध्ये जिल्ह्यातील शेतकºयांमध्ये अनुदान तत्वांवरील कृषी निविष्ठांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. २४ कृषी निविष्ठांसाठी जिल्ह्यातील ७ हजार ७७४ लाभार्थ्यांनी आपले प्रस्ताव त्या त्या तालुका कृषी कार्यालयाकडे दाखल केले होते. प्राप्त प्रस्तावांसाठी जिल्ह्यातील मानवत, परभणी, गंगाखेड, सोनपेठ या चार तालुक्यात सोडत पद्धतही घेण्यात आली. तर येत्या चार दिवसांमध्ये पालम, जिंतूर, सेलू व पाथरी या चार तालुक्यातील प्राप्त अर्जांवर त्या त्या कृषी कार्यालयात सोडत पद्धतीद्वारे लाभार्थी निवडण्यात येणार आहेत.
कृषी विभागाला लाभार्थ्यांनी प्रस्ताव दाखल करुन जवळपास दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे; परंतु, अद्यापही एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत कृषी आयुक्तालयाकडून जिल्हा कृषी विभागाला उद्दिष्टच प्राप्त झाले नाही.
त्यामुळे जिल्ह्यातील ७ हजार ७७४ लाभार्थी शेतकºयांनी २०१८- १९ या आर्थिक वर्षासाठी शेततळ्याचे अस्तरीकरण, सामूहिक शेततळे, फुलशेती, फळबाग लागवड, हळद लागवड, फवारणी यंत्र, औजारे, पॉवर ट्रील, ट्रॅक्टर, कांदा चाळ, मधुमक्षिका पालन, लागवड साहित्य, हरितगृह ग्रीन हाऊस आदी २४ कृषी निविष्ठांच्या अनुदानासाठी प्रतिक्षेत असल्याचे दिसून येत आहे.
याकडे जिल्हा कृषी विभागाने लक्ष देऊन जिल्ह्याला उद्दिष्टप्राप्तीसाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी लाभार्थी शेतकºयांमधून होत आहे.
असे प्राप्त झाले अर्ज
जिल्ह्यात ७ हजार ७७४ प्रस्ताव कृषी विभागाला प्राप्त झाले आहेत. यामध्ये परभणी २१६६, पालम ५५६, पूर्णा १०५६, मानवत १०१४, गंगाखेड ३९१, सोनपेठ १७६, जिंतूर १४७१, सेलू ६९८, पाथरी ६११ असे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. उद्दिष्टप्राप्तीनंतर या शेतकºयांना अनुदानाचे वाटप करण्यात येणार आहे.
१ कोटी २४ लाखांचे गतवर्षीचे देणे
राष्ट्रीय फलोत्पादन अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी शेतकºयांनी कृषी विभागाच्या अनुदान तत्वावरील कृषी निविष्ठांसाठी प्रस्ताव दाखल केले होते. त्यातील काही शेतकºयांचे १ कोटी २४ लाख रुपये गतवर्षीचेच देणे कृषी विभागाकडे बाकी आहे. त्यातच यावर्षीचेही उद्दिष्ट अद्याप प्राप्त झाले नसल्याने लाभार्थी शेतकरी चिंतेत सापडल्याचे दिसून येत आहे.
पालममध्ये २० आॅगस्ट रोजी सोडत
पालम तालुका कृषी कार्यालयात राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत विविध योजनांसाठी २० आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सोडत होऊन लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. तालुक्यातील शेतकºयांनी कांदाचाळसाठी २९०, सेडनेट १२४, उच्चदर्जा भाजीपाला लागवड १९, पॉलीहाऊस १४, फळबाग ५६, पॅक हाऊस २१ असे अर्ज दाखल केले आहेत. प्रस्ताव दाखल केलेल्या शेतकºयांनी सोडतीस उपस्थित रहावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी एस.व्ही. मस्के व विभागप्रमुख संतोष गायकवाड यांनी केले आहे.

Web Title: Parbhani: The beneficiary selection has not been given due to non-receipt of the target

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.