परभणी : आणखी एक झाड कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:22 AM2019-07-14T00:22:19+5:302019-07-14T00:23:07+5:30

येथील स्टेशन रोड परिसरातील वस्तू आणि सेवा कर कार्यालया जवळील एक जुने झाड शुक्रवारी मध्यरात्री रस्त्यावर आडवे झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे स्टेशन रोड परिसरातील वाहतूक सकाळी १० वाजेपर्यंत खोळंबली होती.

Parbhani: Another tree collapses | परभणी : आणखी एक झाड कोसळले

परभणी : आणखी एक झाड कोसळले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: येथील स्टेशन रोड परिसरातील वस्तू आणि सेवा कर कार्यालया जवळील एक जुने झाड शुक्रवारी मध्यरात्री रस्त्यावर आडवे झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे स्टेशन रोड परिसरातील वाहतूक सकाळी १० वाजेपर्यंत खोळंबली होती.
येथील रेल्वेस्थानक परिसरामध्ये वस्तू आणि सेवा कर कार्यालय असून, या कार्यालयाच्या संरक्षक भिंत जवळ वडाची जुनी झाडं आहेत. शुक्रवारी मध्यरात्री शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. या वाºयामुळे स्टेशनरोडवरील वडाचे झाड रस्त्यावर आडवे झाले. त्यामुळे मध्यरात्रीपासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर आडवे झालेले झाड बाजूला केले. साधारणत: पंचवीस-तीस वर्षांपूर्वीचे जुने झाड पडल्याने झाडांच्या संवर्धनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारी सकाळी ११ वाजता शहरातील जायकवाडी भागात एक झाड कोसळल्याची घटना घडली होती. त्यानंतर स्टेशन रोड भागात झाड पडल्याची घटना घडली.
परभणी जिल्ह्यात वृक्षारोपण मोहीम राबविली जात आहे. जिल्ह्याला १ कोटी १९ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. एकीकडे पावसाअभावी वृक्षारोपण मोहिमेत अडथळे निर्माण होत असताना दुसरीकडे वीस ते पंचवीस वर्षांपूवीर्ची जुनी झाडे जमीनदोस्त होत असल्याने जिल्हावासीयांच्या समोर ही एक नवी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे आता वृक्षारोपणा बरोबरच जुन्या झाडांचे संवर्धन करण्याकडेही प्रशासनाला लक्ष द्यावे लागणार आहे.

Web Title: Parbhani: Another tree collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.