परभणी : केंद्राकडे अडकली ‘सेझ’ची रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:17 AM2018-08-27T00:17:00+5:302018-08-27T00:26:50+5:30

केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत नाफेडकडून जिल्ह्यात शेतमालाची हमीभावाने खरेदी करण्यात आली. खरेदी केलेल्या या मालापोटी बाजार समित्यांना देय असलेली सेझची १.५ टक्के रक्कम अद्यापपर्यंत वितरित झाली नाही. जवळपास १ कोटी रुपयांची ही रक्कम केंद्राकडे अडकल्याने बाजार समित्या अडचणीत सापडल्या आहेत.

Parbhani: The amount of 'SEZ' stuck at the center | परभणी : केंद्राकडे अडकली ‘सेझ’ची रक्कम

परभणी : केंद्राकडे अडकली ‘सेझ’ची रक्कम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत नाफेडकडून जिल्ह्यात शेतमालाची हमीभावाने खरेदी करण्यात आली. खरेदी केलेल्या या मालापोटी बाजार समित्यांना देय असलेली सेझची १.५ टक्के रक्कम अद्यापपर्यंत वितरित झाली नाही. जवळपास १ कोटी रुपयांची ही रक्कम केंद्राकडे अडकल्याने बाजार समित्या अडचणीत सापडल्या आहेत.
जिल्ह्यात बाजार समितीच्या माध्यमातून शेतमालाची खरेदी केली जाते. दरवर्षी बाजार समिती अंतर्गत व्यापारी हा शेतमाल खरेदी करतात. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या हमीभावानुसार शेतमालाची खरेदी करण्यासाठी दरवर्षी जिल्ह्यामध्ये नाफेड या एजन्सीमार्फत हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले जातात. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा माल हमीभावाने खरेदी केल्यानंतर शेतकºयांना हमीभावाप्रमाणे रक्कम अदा केली जाते. त्याचबरोबर बाजार समित्यांना खरेदी केलेल्या मालाच्या तुलनेत १.०५ टक्के सेझ या एजन्सीकडून दिला जातो. चालू हंगामात जिल्ह्यात ८ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. या केंद्रावरुन तूर, हरभरा हमीभावाने खरेदी करण्यात आला. शेतकºयांकडील हे धान्य खरेदी केल्यानंतर बाजार समित्यांना देय असलेली रक्कम मात्र अद्यापपर्यंत अदा करण्यात आली नाही.
चालू हंगामात फेब्रुवारी ते मे या काळात जिल्ह्यात नाफेडने हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले होते. परभणी, जिंतूर, पाथरी, मानवत, सेलू, गंगाखेड, पूर्णा आणि बोरी या ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्रावरुन शेतमालाची खरेदी करण्यात आली. ४३ कोटी ३५ लाख ३९ हजार ६०० रुपयांची तुरीची खरेदी या काळात झाली असून ५३ कोटी ३८ लाख १३ हजार २०० रुपयांची हरभºयाची खरेदी झाली आहे. दोन्ही शेतमालाची मिळून ९८ कोटी ७३ लाख १२ हजार ८०० रुपयांचा शेतमाल खरेदी करण्यात आला आहे. या पोटी १ कोटी १ लाख ५७ हजार २०४ रुपयांची सेझची रक्कम जिल्ह्यातील बाजार समित्यांना मिळणे आवश्यक आहे. मात्र या रक्कमेचे अद्यापपर्यंत वाटप झाले नाही.
जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी त्या त्या बाजार समितीकडून जागा उपलब्ध करुन दिली जाते. तसेच शेतमाल खरेदीसाठी लागणारी चाळणी व एखादा कर्मचारीही हमीभाव खरेदी केंद्रासाठी दिला जातो. या बदल्यात केंद्र चालकाकडून बाजार समित्यांना खरेदीच्या १.०५ टक्के रक्कम सेझ म्हणून दिली जाते.
खरेदी केंद्र बंद होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. परंतु, बाजार समित्यांना ही रक्कम अद्याप अदा करण्यात आली नाही. त्यामुळे बाजार समित्या अडचणीत सापडल्या आहेत.
मागील हंगामात मिळालेली रक्कम
मागील २०१६-१७च्या हंगामात जिल्ह्यातील बाजार समित्यांना खरेदी केलेल्या मालापोटी सेझची रक्कम वितरित करण्यात आली होती. त्यानुसार परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत ३१ हजार ४५१ क्विंटल तुरीची खरेदी केली होती. त्यापोटी १५ लाख २७ हजार ६६३ रुपये बाजार समितीला प्राप्त झाले. जिंतूर बाजार समितीमध्ये १८ हजार १२३ क्विंटल तुरीची खरेदी झाली होती. त्यापोटी ८ लाख ८० हजार ९८ रुपये, मानवत बाजार समितीला १० लाख ६६ हजार ४८१ रुपये, गंगाखेड बाजार समितीला ६ लाख ६८ हजार ३८९ रुपये आणि सेलू येथील बाजार समितीला ६ लाख १६ हजार ९८६ रुपये प्राप्त झाले होते.
हमीभावाने झालेली खरेदी
केंद्र तूर हरभरा
परभणी १२१४५ ९२९५
जिंतूर १६२५४ २५५२
पाथरी ३८८८ १०२७३
मानवत ३४५६ --
गंगाखेड १२१०५ --
सेलू १४४२३ ५६०१
पूर्णा ९३५१ २८९३
बोरी ११७५१ ४०३२

Web Title: Parbhani: The amount of 'SEZ' stuck at the center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.