परभणी : मातंग समाजासाठी ७१४ घरकुलांचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 11:32 PM2019-01-15T23:32:06+5:302019-01-15T23:32:30+5:30

रमाई आवास योजनेंतर्गत ग्रामीण भागातील मातंग समाज बांधवांसाठी २०१८-१९ या आर्थिक वर्षात जिल्ह्याला ७१४ घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून याला राज्याच्या समाजकल्याण विभागाने १४ जानेवारी रोजी मंजुरी दिली आहे.

Parbhani: The aim of 714 houses is for the Matang community | परभणी : मातंग समाजासाठी ७१४ घरकुलांचे उद्दिष्ट

परभणी : मातंग समाजासाठी ७१४ घरकुलांचे उद्दिष्ट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : रमाई आवास योजनेंतर्गत ग्रामीण भागातील मातंग समाज बांधवांसाठी २०१८-१९ या आर्थिक वर्षात जिल्ह्याला ७१४ घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून याला राज्याच्या समाजकल्याण विभागाने १४ जानेवारी रोजी मंजुरी दिली आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने रमाई आवास योजना ग्रामीण व शहरी भागासाठी राबविण्यात येते. आतापर्यंत ही योजना अनुसूचित जाती नवबौद्ध संवर्गासाठी राबविण्यात येत होती. आता मातंग समाज बांधवांसाठीही ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत २०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार मातंग समाजाच्या लोकसंख्येची जिल्हानिहाय टक्केवारी विचारात घेऊन घरकुलाचे उद्दिष्ट मंजूर करण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्ह्याला ७१४ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
या उद्दिष्टास १४ जानेवारी रोजी सामाजिक न्याय विभागाने आदेश काढून मंजुरी दिली आहे. २०१८-१९ या या आर्थिक वर्षासाठी हे उद्दिष्ट असले तरी आर्थिक वर्ष संपण्यास फक्त अडीच महिन्यांचा कालवधी राहिला आहे.
या कालावधीत घरकुल बांधकामांना प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी मिळविण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवरुन या योजनेला गतीमानता आणण्यासाठी यंत्रणेला कामाला लागावे लागणार आहे.
नांदेडमध्ये सर्वाधिक घरकुले
४सामाजिक न्याय विभागाने ग्रामीण भागातील मातंग समाज बांधवांसाठी रमाई आवास योजनेंतर्गत मंजूर केलेल्या उद्दिष्टात मराठवाड्यात सर्वाधिक म्हणजे ३ हजार ५३ घरकुलांचे नांदेड जिल्ह्याला उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्या खालोखाल लातूर जिल्ह्याला २ हजार ५५२, हिंगोली जिल्ह्याला १ हजार ६९०, बीड जिल्ह्याला १ हजार ४७७, उस्मानाबाद जिल्ह्याला १ हजार ४९, जालना जिल्ह्याला १ हजार ६४, औरंगाबाद जिल्ह्याला ९३८ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
मनपाची साडेसातशे प्रस्तावांना मंजुरी
४रमाई आवास योजनेअंतर्गत महानगरपालिकेने ७५६ प्रस्तावांना १४ जानवरी रोजी मान्यता दिली असून, या प्रस्तावांची यादी रमाई आवास योजनेच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महानगरपालिकेला १८०० लाभार्थ्यांचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. शहराच्या हद्दीत यापूर्वी आॅगस्ट महिन्यात ३६५, आॅक्टोबर महिन्यात ४९५ प्रस्तावांना मंजुरी दिली होती. आता ७५६ प्रस्तावांची त्यात भर पडली आहे. त्यामुळे उद्दीष्टाच्या तुलनेत १६१३ प्रस्तावांना मनपाने मंजुरी दिली असून, त्यापैकी ३६२ घरकुलांचे बांधकाम सुरू असल्याची माहिती मनपाने दिली. दरम्यान, मनपाचे समाजकल्याण सभापती नागेश सोनपसारे, आयुक्त रमेश पवार, रमाई आवास विभाग प्रमुख सुभाष मस्के, अभियंता पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. मंजूर झालेल्या प्रस्तावांवर १७ ते २३ जानेवारी या काळात आक्षेप स्वीकारले जाणार आहेत.

Web Title: Parbhani: The aim of 714 houses is for the Matang community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.