परभणी :पुन्हा बोंडअळीची धास्ती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:23 AM2018-07-30T00:23:00+5:302018-07-30T00:23:38+5:30

परभणी आणि सेलू तालुक्यामध्ये कापसावर अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांनी आतापासूनच बोंडअळीची धास्ती घेतली आहे. कापसावर आढळणारी अळी नेमकी कोणती, अशी चर्चा कापूस उत्पादकांमध्ये होत असून शेतकºयांनी बोंडअळीची धास्ती घेतली आहे.

Parbhani: Against the bandwagon! | परभणी :पुन्हा बोंडअळीची धास्ती !

परभणी :पुन्हा बोंडअळीची धास्ती !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी आणि सेलू तालुक्यामध्ये कापसावर अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांनी आतापासूनच बोंडअळीची धास्ती घेतली आहे. कापसावर आढळणारी अळी नेमकी कोणती, अशी चर्चा कापूस उत्पादकांमध्ये होत असून शेतकºयांनी बोंडअळीची धास्ती घेतली आहे.
मागील वर्षी जिल्ह्यात बोंडअळीच्या प्रादूर्भावाने सर्वचच्या सर्व कापसाचे पीक फस्त झाले होते. शासनाला नुकसान भरपाई देखील द्यावी लागली होती. त्यानंतर यावर्षी कापूस लागवडीकडे शेतकºयांचा कल कमी झाला. असे असले तरी १ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. अनेक भागामध्ये या पिकांवर अळीचा प्रादूर्भाव दिसत आहे. परभणी, सेलू या दोन तालुक्यात हा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असून कापसावर निघालेली अळी ही बोंडअळीच असल्याची शेतकºयांची धारणा झाली आहे. त्यामुळे गतवर्षी प्रमाणेच यावर्षी नुकसान सहन करावे लागते की काय, अशी भितीही व्यक्त होत आहे. कापसाच्या पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. सेलू तालुक्यातील सिद्धनाथ बोरगाव येथे १० एकर क्षेत्रावरील कापूस पाळी घालून काढून टाकण्यात आला. कृषी विभागातील अधिकाºयांनीही घेतलेल्या प्रशिक्षण शिबिरात अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आतापासूनच शेतकºयांना मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
पात्यांमध्येच आढळल्या अळ्या
परभणी आणि सेलू तालुक्यात कापसाच्या पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव आढळत आहे. सध्या या तालुक्यातील कापसाचे पीक हे पाते आणि फुले लागवडीच्या अवस्थेत असून अनेक ठिकाणी कापूस पात्या-फुलांमध्ये आला असून या पात्यांमध्येच अळी निघत असल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. मागील वर्षी कापूस पिकाच्या बोंडामधून अळी निघत होती. हे बोंड परिपक्क्व होण्याच्या अवस्थेत असतानाच अळीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात मोठी घट झाली होती.
४कापसावर अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकºयांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. मागील वर्षी संपूर्ण पीक या अळीने नेस्तानाबुत केले होते. मागील वर्षी सारखीच परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी परिणामकारक कीटकनाशकांचा वापर होणे आवश्यक आहे. कापसावर प्रादूर्भाव झालेली ही अळी कोणती, याचा शोध घेऊन कृषी विभागाने शेतकºयांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

Web Title: Parbhani: Against the bandwagon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.