Parbhani: 50 lakhs of home-based movements | परभणी : निवासस्थानाचे ५० लाख वळविण्याच्या हालचाली
परभणी : निवासस्थानाचे ५० लाख वळविण्याच्या हालचाली

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व ४ च्या कर्मचाºयांच्या निवासस्थानासाठी तरतूद करण्यात आलेला ५० लाख रुपयांचा निधी इतरत्र वळविण्याच्या हालचाली जि़प़तील काही पदाधिकाºयांनी सुरू केल्याने निवासस्थानाचा प्रश्न प्रलंबित राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत़
जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व ४ च्या कर्मचाºयांसाठी शहरातील प्रशासकीय इमारतीच्या बाजुला निवासस्थाने उभारण्यात आली आहेत़ जवळपास ३० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या या निवासस्थानांची सध्या दुरवस्था झाली आहे़ असे असले तरी येथे जवळपास ३२ कर्मचाºयांचे कुटूंबिय राहतात़ दर अडीच वर्षाला जिल्हा परिषदेचे पदाधिकारी बदलल्यानंतर त्यांच्या निवासस्थानांची डागडुजी केली जाते़ शिवाय नवीन अधिकाºयांचीही नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्याही निवासस्थानांची तातडीने डागडुजी केली जाते़ परंतु, गेल्या ३० वर्षांपासून वर्ग ३ व ४ च्या या कर्मचाºयांच्या निवासस्थानांची डागडुजी झालेली नाही़ त्यामुळे येथील दुरवस्थेत भर पडली आहे़ ही बाब गतवर्षी येथील कर्मचाºयांनी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांच्या कानावर घातली होती़
त्यावेळी खोडवेकर यांनी नवीन इमारत बांधकामासाठी ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद जि़प़च्या अर्थसंकल्पात केली होती़ नवीन निवासस्थाने बांधण्यासाठी हा निधी पुरेसा नसल्याचे कारण सांगून त्यावर पुढे कारवाई झाली नाही़ खोडवेकर यांची बदली झाल्यानंतर हा विषय अडगळीत पडला़ आता या निवासस्थानांसाठी तरतूद करण्यात आलेला ५० लाख रुपयांचा निधी रस्ते किंवा अन्य इमारतींच्या दुरुस्तीसाठी खर्च करता येतो का? याबाबतची काही पदाधिकाºयांनी पडताळणी केली़ त्यामध्ये अधिकाºयांना हाताशी धरून मार्ग काढण्याचा प्रयत्नही झाला़ त्यानंतर आता हा निधी इतरत्र वळविण्यासाठी काही पदाधिकाºयांनी चांगलीच खटाटोप सुरू केली आहे़ परिणामी कर्मचाºयांच्या निवासस्थानाचा प्रश्न प्रलंबितच राहतो की काय? असा सवाल उपस्थित झाला आहे़
अधिकारी-पदाधिकाºयांच्या कक्षांची दुरुस्ती
जिल्हा परिषदेत अधिकारी व पदाधिकाºयांच्या कक्षांची दुरुस्ती करण्याचे काम सातत्याने सुरू आहे़ तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी खोडवेकर यांनी अधिकार मर्यादा ओलांडून तब्बल १० लाख रुपये खर्च करून त्यांच्या कक्षाची दुरुस्ती केल्याचा आरोप जि़प़ सदस्यांनी केला होता़ तसेच काही महिन्यांपूर्वी जि़प़चे कृषी सभापती श्रीनिवास मुंडे यांनी त्यांचा कक्ष सोडून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या कक्षात ठाण मांडले़ त्यावेळी त्यांच्या कक्षाचीही दुरुस्ती करण्यात आली़
त्यानंतर कृषी सभापतींसाठी पूर्वी असलेला कक्ष पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत मुळीक यांना देण्यात आला़ त्यांच्या कक्षाचीही डागडुजी झाली़ विरोधी पक्षातील सदस्यांसाठी एक कक्ष देण्यात आला़ त्याचीही तातडीने डागडुजी झाली़ आता सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम़व्ही़ करडखेलकर यांच्या कक्षाची डागडुजी करण्याचे काम सुरू आहे़
यासाठी जवळपास साडेचार लाख रुपयांचा निधी लागणार असल्याची चर्चा आहे़ त्यामुळे एकीकडे अधिकारी व पदाधिकाºयांच्या कक्षांवर लाखो रुपये डागडुजीसाठी खर्च केले जात असताना कर्मचाºयांच्याच निवासस्थानासाठी निधी का उपलब्ध करून दिला जात नाही, असा सवाल उपस्थित होत आहे़


Web Title: Parbhani: 50 lakhs of home-based movements
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.