परभणी : गणवेशासाठी ३७़५० लाख रु. शाळांना वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 11:52 PM2019-06-16T23:52:23+5:302019-06-16T23:52:57+5:30

विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश खरेदीसाठी तालुक्यातील ७१ शाळांच्या शालेय व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांच्या संयुक्त खात्यावर ३७ लाख ५०  हजार रुपयाचे अनुदान १५ जून रोजी वर्ग करण्यात आले आहे. शैक्षणिक सत्र सुरु होण्याच्या दोन दिवस आगोदर शाळांना  रक्कम मिळाल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना गणवेश  मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून गणवेशाची रक्कम तातडीने वर्ग करणारा मानवत तालुका जिल्ह्यात पहिला ठरला आहे.

Parbhani: 37-50 lakh for uniform Classrooms to schools | परभणी : गणवेशासाठी ३७़५० लाख रु. शाळांना वर्ग

परभणी : गणवेशासाठी ३७़५० लाख रु. शाळांना वर्ग

Next

सत्यशील धबडगे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी): विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश खरेदीसाठी तालुक्यातील ७१ शाळांच्या शालेय व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांच्या संयुक्त खात्यावर ३७ लाख ५०  हजार रुपयाचे अनुदान १५ जून रोजी वर्ग करण्यात आले आहे. शैक्षणिक सत्र सुरु होण्याच्या दोन दिवस आगोदर शाळांना  रक्कम मिळाल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना गणवेश  मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून गणवेशाची रक्कम तातडीने वर्ग करणारा मानवत तालुका जिल्ह्यात पहिला ठरला आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार शासनाच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जातो. शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार त्यांच्या गणवेशासाठी लागणारा निधी दिला जातो. गतवर्षी हा निधी विद्यार्थांच्या नावाने त्यांच्या बँक खात्यात जमा केला होता. मात्र शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना गणवेश मिळालाच नाही. यावर्षी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा निधी मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांच्या सयुंक्त बँक खात्यात टाकण्याचा निर्णय घेतला होता. शालेय  व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक यांच्या संयुक्त खात्यावर १५ जून रोजी निधी जमा झाला आहे. तालुक्यातील ७१ शाळातील ६ हजार २५० विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदीसाठी शासनाकडून ३७ लाख हजार २०० रुपये अनुदान गट शिक्षणाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले होते. रक्कम प्राप्त झाल्यानंतर लगेचच शाळांना वर्ग करण्यात आली.  शाळा सुरु होण्यापूर्वी रक्कम प्राप्त झाल्याने व्यवस्थापन समितीला गणवेश खरेदी करता येणार आहेत. तातडीने गणवेशांची खरेदी करावी, अशा सूचना गट शिक्षणाधिकारी संजय ससाणे यांनी दिल्या आहेत.
१ हजार ३३ विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश
च्केंद्राच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अधिकार क्षेत्रात येत असलेल्या समग्र शिक्षण विभागाकडून निधी दिला जातो़ दोन शालेय गणवेशासाठी अगोदर ४०० रुपये दिले जात असे, मात्र एवढ्या कमी रक्कमेत दोन गणवेश बसवायचे कसे? असा प्रश्न शाळा व्यवस्थापन समितीला पडत असे.
च्गतवर्षी २०० रुपयांची वाढ करण्यात आली होती. प्रत्येकी एका विद्यार्थ्यांसाठी ६०० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तालुक्यातील ६ हजार २५० विद्यार्थांना याचा लाभ होणार आहे.
च्यामध्ये सर्वाधिक ४८२६ मुलींना लाभ मिळणार आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील ७३३ तर अनुसूचित जमाती प्रवर्गातील १०१ आणि दारिद्र्यरेषेखालील ५९० असे एकुण १ हजार ३३३ मुलांना नविन गणवेश मिळणार आहेत. 
शालेय व्यवस्थापन समितीची मुख्य भूमिका
शालेय शिक्षण विभागाने गतवर्षी विद्यार्थी व पालकांच्या संयुक्त बँक खात्यावर गणवेशाची रक्कम जमा केली. मात्र, या निर्णयाचा मोठा फटका शालेय गणवेश वितरण प्रक्रियेला बसला होता. तो अनुभव लक्षात घेता  यावर्षी पालक आणि विद्यार्थ्यांच्या संयुक्त बँक खात्यावर रक्कम जमा न करता शालेय व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापक यांच्या संयुक्त बँक खात्यावर रक्कम जमा केली जाणार आहे. व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून यावर्षी गणवेश खरेदी केले जाणार असल्याने समितीची भूमिका महत्त्वाची राहाणार आहे.  
‘लोकमत’च्या वृत्ताची घेतली दखल
यावर्षीचे शैक्षणिक सत्र सुरु होण्यास तीन दिवस शिल्लक राहिले असताना गणवेशाची रक्कम शाळांना न मिळाल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळण्याची आशा धूसर झाल्याची बातमी ‘लोकमत’ ने १५ जून रोजी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेत गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने १५ जून रोजी दुपारी २ वाजता तातडीने तालुक्यातील ७१ शाळांच्या मुख्याध्यापक आणि शालेय व्यवस्थापन समितीच्य संयुक्त खात्यावर रक्कम वर्ग केली आहे. यामुळे शाळांना लवकरात लवकर गणवेश खरेदी करता येणार आहे. 

गणवेशाचे अनुदान मुख्याध्यापक आणि व्यवस्थापन समितीच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. गतवर्षीपासून गणवेशाची रक्कम वाढल्याने शाळांना नाविन्यपूर्ण गणवेश खरेदी करता येत आहेत.
-संजय ससाणे,
गटशिक्षणाधिकारी मानवत  

Web Title: Parbhani: 37-50 lakh for uniform Classrooms to schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.