परभणी : दरमहा ३३ हजार लिटर रॉकेल काळ्या बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:32 AM2018-08-15T00:32:04+5:302018-08-15T00:34:37+5:30

राज्याच्या पुरवठा विभागाचा आदेश ढाब्यावर बसवून जिंतूर तालुक्यात नियमबाह्य पद्धतीने मंजूर केलेल्या नियतनातील तब्बल ३३ हजार लिटर रॉकेल काळ्या बाजारात विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे़ विशेष म्हणजे या संदर्भात आलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून वर्षानुवर्षापासून हा प्रकार बिनबोभाटपणे सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे़

Parbhani: 33 thousand liters of kerala per month in black market | परभणी : दरमहा ३३ हजार लिटर रॉकेल काळ्या बाजारात

परभणी : दरमहा ३३ हजार लिटर रॉकेल काळ्या बाजारात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : राज्याच्या पुरवठा विभागाचा आदेश ढाब्यावर बसवून जिंतूर तालुक्यात नियमबाह्य पद्धतीने मंजूर केलेल्या नियतनातील तब्बल ३३ हजार लिटर रॉकेल काळ्या बाजारात विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे़ विशेष म्हणजे या संदर्भात आलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून वर्षानुवर्षापासून हा प्रकार बिनबोभाटपणे सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे़
जिल्हा पुरवठा विभागाकडून जिंतूर तालुक्याला दरमहा १५३ केएल रॉकेलचा कोठा मंजूर करून तो वितरित करण्यात येतो़ जिंतूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडून चार मुख्य अर्धघाऊक विक्रेत्यांमार्फत ७५, २७, ३३, १८ केएल असे या रॉकेलचे ग्रामीण भागात वितरण केले जाते़ वितरणाच्या या प्रक्रियेत प्रचंड अनियमितता गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याची बाब समोर आली आहे़ राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने २० आॅगस्ट २०१५ रोजी अव्वर सचिव के़जी़ ठोसर यांच्या स्वाक्षरीने पत्र काढले आहे़ या पत्रामध्ये ग्रामीण भागातील बिगर गॅस शिधा पत्रिकाधारकांना केरोसीन वितरित करण्याचे प्रमाण ठरवून देण्यात आले आहे़ त्यामध्ये शिधापत्रिकेतील एका व्यक्तीला २ लिटर, दोन व्यक्तींना ३ लीटर आणि ३ व्यक्ती वा त्याहून अधिक व्यक्तींना जास्तीत जास्त ४ लीटर रॉकेल वितरित करावे, असे स्पष्ट शासनाचे निर्देश असताना जिंतूरच्या पुरवठा विभागाने हा शासनादेश अडगळीत टाकून स्वत:च नियतन वितरणाची यादी तयार केली आहे़
या यादीमध्ये शिधापत्रिका धारकांची संख्या किती आहे? हे न पाहता मनमानी पद्धतीने संबंधित अर्धघाऊक विक्रेत्यांना रॉकेल वितरित केले जात आहे़ विशेष म्हणजे यामध्ये एका गावासाठी जो निकष लावण्यात आलेला आहे तो निकष दुसऱ्या गावाला मात्र बदलण्यात आला आहे़ विशिष्ट अर्धघाऊक विक्रेत्यावर मेहरबानी दाखविण्यात आली आहे़ उदाहरणच द्यावयाचे झाल्यास जिंतूर तालुक्यातील मंगरूळ ता़ या गावामध्ये एकूण ५३ शिधापत्रिका आहेत़
त्या गावाला ८०० लीटर रॉकेलचे नियतन मंजूर असून, ते वितरित केले जाते; परंतु, २३७ शिधापत्रिका असलेल्या असोला गावाला मात्र ३०० लीटर रॉकेलच वितरित केले जाते़ ५४२ शिधापत्रिका असलेल्या चांदजला ३ हजार लीटर रॉकेल वितरित केले जाते तर ५६२ शिधापत्रिका असलेल्या सावंगी भांबळेला मात्र ७०० लीटरच रॉकेल वितरित केले जाते़ १११ शिधापत्रिका असलेल्या नागठाणा गावाला १ हजार लीटर रॉकेल वितरित केले जाते आणि ११३ शिधापत्रिका असलेल्या बेलखेडाला २५० लीटर रॉकेल वितरित केले जाते़
२८३ शिधापत्रिका असलेल्या पिंपळगाव गा़ ला १६०० लीटर रॉकेल वितरित केले जाते़ तर ३३९ शिधापत्रिका असलेल्या कुºहाडीला फक्त ८०० लीटर रॉकेल वितरित केले जाते़ दुजाभाव दर्शविणारी अशी अनेक गावे आहेत़ ज्या गावांमध्ये प्रत्यक्षात रॉकेल वितरित होत आहे की नाही? याची माहितीही पुरवठा विभागाकडे उपलब्ध नाही किंवा प्रत्यक्ष तशी तपासणीही कधी केली गेली नाही़; परंतु, काही विशेष अर्धघाऊक विक्रेत्यांवर मेहरबानी करीत अधिकचे नियतन मंजूर करून वितरित करण्याचा पराक्रम मात्र पुरवठा विभागाने केला आहे़ जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडूनच तालुक्याला नियतन वितरित केले जाते़
या संदर्भातील इत्यभूंत माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडे उपलब्ध असतानाही या विभागाने या प्रकरणी चौकशी केली नाही़ परिणामी गेल्या अनेक वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने वितरित करण्यात आलेले रॉकेल बिनबोभाटपणे काळ्या बाजारात विक्री केले जात आहे़
चौकशी अधिकाºयांचा अहवालच मिळेना
या संदर्भात श्यामसुंदर सारडा यांनी १ जून २०१८ रोजी जिल्हा पुरवठा अधिकाºयांकडे तक्रार केल्यानंतर या प्रकरणी चौकशी करण्यासाठी जिल्हा पुरवठा निरीक्षण अधिकारी विवेक पाटील यांची नियुक्ती करण्यात आली़ पाटील यांना या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले; परंतु, गेल्या दोन महिन्यांपासून पाटील यांच्याकडून अहवाल आलेला नाही़ पाटील १ जुलै पासून रजेवर आहेत़ या संदर्भात १ जून रोजीच जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी जिंतूर तहसीलदारांना अर्धघाऊक केरोसीन परवानाधारकांमार्फत केरोसिन वाटपात होत असलेल्या अनियमिततेसंदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते; परंतु, जिंतूरच्या तहसीलदारांनीही या संदर्भात कसल्याही प्रकारचा अहवाल १३ आॅगस्टपर्यंत पुरवठा विभागाकडे सादर केलेला नाही़
असा होतोय काळा बाजार
रॉकेलच्या एका टँकरमध्ये १२ केएल म्हणज १२ हजार लिटर रॉकेल असते़ जिंतूर तालुक्याला एकूण १५३ केएल रॉकेल वितरित केले जाते़ त्यापैकी १२० केएल रॉकेल प्रत्यक्षात गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहचते़ उर्वरित ३३ केएल म्हणजेच ३३ हजार लीटर रॉकेल हे निव्वळ काळ्या बाजारात विक्री होत आहे़ रेशन कार्ड धारकांसाठी आलेले हे रॉकेल काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी संबंधितांनी स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली आहे़ या यंत्रणेमार्फतच सर्व सुत्रे हलली जातात, अशीही चर्चा जिंतूर तालुक्यात होत आहे़
मंत्रालयापर्यंत तक्रार, तरीही कारवाई होईना
जिंतूर तालुक्यात पुरवठा विभागाच्या आशीर्वादाने गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या रॉकेलच्या काळ्या बाजाराची जिंतूर येथील श्यामसुंदर सारडा यांनी थेट मंत्रालयापर्यंत तक्रार केली़ त्यांनी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना निवेदन दिले़
त्यानंतर पुरवठा विभागाचे प्रधान सचिव, विभागीय आयुक्त कार्यालय, परभणी जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी आदींकडे सातत्याने तक्रारी केल्या; परंतु, त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्यात आले़ विशेष म्हणजे सारडा हे स्वत:च अर्धघाऊक विक्रेते आहेत व त्यांनीच तक्रार केली असताना त्यांच्याच तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे़
जिंतूर तालुक्यात केरोसीन वितरणासंदर्भात अनियमित होत असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे़ त्या अनुषंगाने जिंतूरचे तहसीलदार सुरेश शेजूळ यांना मंगळवारीच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे़ चुकीचे झाल्यास निश्चितच कारवाई केली जाईल़
-सुकेशनी पगारे, जिल्हा पुरवठा अधिकारी

Web Title: Parbhani: 33 thousand liters of kerala per month in black market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.