परभणी : जिल्ह्यात २० टक्के पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:18 AM2018-11-15T00:18:26+5:302018-11-15T00:18:47+5:30

कृषी विभागाने २०१८-१९ च्या रबी हंगामाच्या पेरणीसाठी २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे़; परंतु, जिल्ह्यात परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने आतापर्यंत केवळ ५६ हजार २४३ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. या पेरणीची टक्केवारी केवळ २०.२८ टक्केच आहे.

Parbhani: 20% sowing in the district | परभणी : जिल्ह्यात २० टक्के पेरणी

परभणी : जिल्ह्यात २० टक्के पेरणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कृषी विभागाने २०१८-१९ च्या रबी हंगामाच्या पेरणीसाठी २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे़; परंतु, जिल्ह्यात परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने आतापर्यंत केवळ ५६ हजार २४३ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. या पेरणीची टक्केवारी केवळ २०.२८ टक्केच आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामात पेरणी केलेली पिके पावसाअभावी शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत़ उसणवारी करून पिकांवर खर्च केला़ परंतु, उत्पादनातून तेवढे पैसेही शेतकºयांच्या हाती लागले नाहीत़ त्यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकºयांच्या आशा परतीच्या पावसावर होत्या; परंतु, नोव्हेंबर महिना संपत आला तरीही जिल्ह्यात परतीचा पाऊस झाला नाही़ परिणामी कृषी विभागाने २०१८-१९ च्या रबी हंगामासाठी २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे़ यामध्ये ज्वारी पिकासाठी १ लाख ११ हजार ९६०, गव्हासाठी ३७ हजार २९६, हरभºयासाठी १ लाख २३ हजार ३९०, करडईसाठी २ हजार ५४९ तर मक्यासाठी १८ हजार ३८ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे; परंतु, या वर्षीच्या पावसाळ्यात एकही समाधानकारक पाऊस झाला नाही़ त्यातच परतीच्या पावसानेही पाठ फिरविली आहे़ त्यामुळे विहीर, नदी, तलाव, ओढे यांना पाणीच आले नाही़ जिल्ह्यातील शेतकºयांसाठी वरदान ठरलेला निम्न दूधना प्रकल्प व येलदरी धरणातही समाधानकारक पाणीसाठा झाला नाही़ त्यामुळे या धरणातील पाणी शेतकºयांना रबी हंगामातील पिके जगविण्यासाठी उपलब्ध होणार नाही़ सध्या शेतकºयांनी खरिप हंगामातील पिकांची विल्हेवाट लावून रबी हंगामातील पेरणीसाठी शेतजमीन तयार केली आहे़; परंतु, २० आॅगस्टपासून जिल्ह्यात पाऊस झालेला नाही़ त्यामुळे ठिक ठिकाणी जमीन भेगाळली आहे़
या जमिनीवर पेरणी करावी कशी? असा प्रश्न शेतकºयांसमोर उभा आहे़ काही शेतकºयांकडे सध्या पाणी उपलब्ध आहे; परंतु, हे पाणी रबी हंगामातील सिंचनासाठी पुरेल की नाही या भीतीने शेतकरी पेरणीसाठी धजावत नाहीत. त्यामुळे १४ नोव्हेंबरपर्यंत जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे २ लाख ७७ हजार २६७ हेक्टर क्षेत्र जमिनीपैकी केवळ २०.२८ टक्केच म्हणजेच ५६ हजार २४३ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. यामध्ये ज्वारीची ३४ हजार ३९२, गव्हाचे २ हजार ६७२, तर हरभºयाच्या १८ हजार २३३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जमिनीत फारशी ओल नसल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत.
पीक विमा योजनेची मुदत ३१ डिसेंबर
४पाण्याअभावी १४ नोव्हेंबरपर्यंत केवळ ५६ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणी केलेल्या शेतकºयांसाठी राज्य व केंद्र शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना २०१८-१९ च्या रबी हंगामासाठी अंमलबजावणी सुरू केली आहे. १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर दरम्यान या योजनेची मुदत आहे. यावर्षी राज्य शासनाने परभणी जिल्ह्याची विमा कंपनी बदलून आता भारती एक्सा या विमा कंपनीकडे जबाबदारी दिली आहे.
४त्यामुळे पेरणी केलेल्या शेतकºयांंनी ३१ डिसेंबरपर्यंत आपल्या पिकाचा विमा उतरवून घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
४या योजनेत सहभागी होणाºया शेतकºयांना गव्हासाठी प्रती हेक्टरी ५१९ रुपयांचा विमा हप्ता भरावा लागणार आहे. त्याच बरोबर ज्वारीसाठी ३७८ रुपये, हरभºयासाठी ३४६.५० रुपये, करडईसाठी ३४६.५० रुपये तर उन्हाळी भूईमुगासाठी ५६७ रुपयांच्या हप्त्याची रक्कम शेतकºयांना भरावी लागणार आहे.
जिल्ह्यासाठी दुष्काळात वरदान ठरलेल्या निम्न दुधना व जायकवाडी धरणातून परभणी जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेतकºयांसाठी रबी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी पाणीपाळ्या देण्यात येणार आहेत. त्यामुळे ३० नोव्हेंबरपर्यंत रबी हंगामातील गहू व हरभरा पिकाची पेरणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणीपाळ्या पूर्ण क्षमतेने देण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.

Web Title: Parbhani: 20% sowing in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.