परभणी: १०० टक्के विद्यार्थी मतदार नोंदणीचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 11:27 PM2018-10-10T23:27:44+5:302018-10-10T23:28:33+5:30

मतदार यादी अद्ययावत व शुद्धीकरण कार्यक्रमांतर्गत १८ वर्षे पूर्ण झालेल्या १०० टक्के महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी करण्याचा संकल्प बुधवारी जिल्हा कचेरीत झालेल्या प्राचार्यांच्या बैठकीत करण्यात आला.

Parbhani: 100 percent students voter registration resolution | परभणी: १०० टक्के विद्यार्थी मतदार नोंदणीचा संकल्प

परभणी: १०० टक्के विद्यार्थी मतदार नोंदणीचा संकल्प

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मतदार यादी अद्ययावत व शुद्धीकरण कार्यक्रमांतर्गत १८ वर्षे पूर्ण झालेल्या १०० टक्के महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी करण्याचा संकल्प बुधवारी जिल्हा कचेरीत झालेल्या प्राचार्यांच्या बैठकीत करण्यात आला.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक विभागाकडून तयारी सुरु झाली आहे. या अंतर्गत जिल्ह्यात सध्या मतदार यादी अद्ययावत आणि शुद्ध करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत मतदार नोंदणी, अपात्र मतदारांची वगळणी, मतदार यादीतील चुकीच्या तपशिलाबाबत दुरुस्ती आदी कामे करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस निवडणूक उपजिल्हाधिकारी महादेव किरवले, उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर, उपविभागीय अधिकारी डॉ.सूचिता शिंदे, तहसीलदार विद्याचरण कडवकर आदींची उपस्थिती होती. यावेळी सर्व महाविद्यालयातील प्राचार्यांनी १ जानेवारी २०१९ रोजी १८ वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची १०० टक्के मतदार नोंदणी करावी, यासाठी विद्यार्थ्यांचे रंगीत फोटो जमा करावेत, रहिवासी प्रमाणपत्र आणि वयाचा दाखला फॉर्म ६ सोबत जोडून द्यावा, महाविद्यालयात एका शिक्षकाची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करावी, असेही यावेळी आदेश देण्यात आले. आॅनलाईन मतदार नोंदणीसाठी ६६६.ल्ल५२स्र.्रल्ल या पोर्टलचा वापर करावा, असे आदेश यावेळी देण्यात आले. यावेळी प्राचार्यांनी पात्र विद्यार्थ्यांची १०० टक्के मतदार नोंदणी करण्याचा संकल्प केला. यावेळी गंगाखेडचे उपप्राचार्य घुगे, परभणीतील उपप्राचार्य बोराडे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी नायब तहसीलदार भातांब्रेकर, तमन्ना, शेख वसीम, वानखेडे, एस.ए.शिराळे, प्रवीण कोकंडे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Parbhani: 100 percent students voter registration resolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.