परभणी : जाधव, विटेकर, खान यांच्यासह १० जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 11:29 PM2019-03-25T23:29:11+5:302019-03-25T23:29:32+5:30

परभणी लोकसभा मतदार संघातून सोमवारी शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव, राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांच्यासह १० जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत़

Parbhani: 10 candidates, including Jadhav, Vitekar, Khan, filed nomination papers | परभणी : जाधव, विटेकर, खान यांच्यासह १० जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

परभणी : जाधव, विटेकर, खान यांच्यासह १० जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी लोकसभा मतदार संघातून सोमवारी शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव, राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांच्यासह १० जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत़
परभणी लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा २६ मार्च हा शेवटचा दिवस आहे़ त्यामुळे २५ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले़ वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांनी शक्तीप्रदर्शन करीत भारिप बहुजन महासंघाकडून २ तर वंचित बहुजन आघाडीकडून २ उमेदवारी अर्ज दाखल केले़ त्यातील २ अर्ज त्यांनी दुपारी १़३० वाजता दाखल केले़ त्यानंतर शहरातील नूतन महाविद्यालयापासून शिवाजी चौक, गांधी पार्क, स्टेशन रोडमार्गे जिल्हा कचेरीपर्यंत रॅली काढण्यात आली़ त्यानंतर पुन्हा २ उमेदवारी अर्ज दाखल केले़ या रॅलीत विविध समाजबांधव सहभागी झाले होते़ तसेच कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडियाचे उमेदवार राजन क्षीरसागर यांनीही रॅलीद्वारे उमेदवारी अर्ज दाखल केला़
याशिवाय शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांनीही मोजक्याच कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केले़ त्यांनी सोमवारी अर्ज दाखल केले तरी मंगळवारी शक्ती प्रदर्शनासह दोन्ही उमेदवार मुख्य अर्ज दाखल करणार असल्याचे समजते़ दरम्यान, मुख्य उमेदवारांसह सोमवारी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे यशवंत रामभाऊ कसबे, बहुजन महापार्टीचे शेख सलीम शेख इब्राहीम, अपक्ष संगीता कल्याणराव निर्मळ, डॉ़ आप्पासाहेब ओंकार कदम, किशोर बाबूराव मुन्नेमाणिक, सखाराम ग्यानबा बोबडे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले़ सोमवारी १४ इच्छुकांनी २२ अर्ज निवडणूक विभागातून घेतले़

Web Title: Parbhani: 10 candidates, including Jadhav, Vitekar, Khan, filed nomination papers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.