बनावट दस्तावेज तयार केल्याप्रकरणी मानवतच्या दोन टंकलेखन संस्था चालकाविरूध्द गुन्हा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 04:47 PM2018-03-21T16:47:07+5:302018-03-21T16:47:07+5:30

खोट्या सही द्वारे बनावट दस्तऐवज तयार करुन शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी दोन टंकलेखन संस्था चालकाविरूध्द गटशिक्षणाधिकारी ससाणे यांच्या तक्रारीवरुन मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

An offense against Manavata Typing Institution operator for creating fake documents | बनावट दस्तावेज तयार केल्याप्रकरणी मानवतच्या दोन टंकलेखन संस्था चालकाविरूध्द गुन्हा 

बनावट दस्तावेज तयार केल्याप्रकरणी मानवतच्या दोन टंकलेखन संस्था चालकाविरूध्द गुन्हा 

Next

मानवत : खोट्या सही द्वारे बनावट दस्तऐवज तयार करुन शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी दोन टंकलेखन संस्था चालकाविरूध्द गटशिक्षणाधिकारी ससाणे यांच्या तक्रारीवरुन मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अधिक तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पवार हे करीत आहेत. 

गटशिक्षणाधिकारी संजय ससाणे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, २०१२ - १३ मध्ये भास्कर केदंळे याने ओमसाई टंकलेखन संस्था स्थापन करावयाची होती. मात्र यासाठी शहरातील दुसऱ्या टंकलेखन संस्था चालकाचे ना हारकत प्रमाण पत्र प्रस्तावा सोबत द्यावे लागते. केदंळे यांनी शहरातील प्रभावती टंकलेखनचे संस्था चालक  सुनिल जकलवार यांच्या संस्थेचा बनावट शिक्का तयार करुन खोटी स्वाक्षरी केली व शासनास खोटे ना हरकत प्रमाणपत्र सादर केले. तसेच प्रभावती टंकलेखन संस्थाचे संचालक जकलवार यांनी शासनाच्या विविध प्रमाणपत्रासह जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी यांना दिलेल्या विविध पत्रावर संगनमत करुन वेगवेगळ्या सह्या करुन शासनाची फसवणूक केली. 

या प्रकरणी गटशिक्षणाधिकारी ससाणे यांच्या तक्रारीवरुन दोन जणा विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पवार हे करीत आहेत. दरम्यान  जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य  प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ संजय कुंडेटकर यांनी  ६ मार्च २०१८ ला गटशिक्षण अधिकारी यांना लेखी आदेश काढुन गुन्हा दाखल करण्याची सुचना दिली होती. या आदेशाप्रमाणे गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती मिळत आहे.

Web Title: An offense against Manavata Typing Institution operator for creating fake documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.