परभणीत महाआरोग्य शिबीर : आरोग्य शिबीर समाजसेवेचे खरे प्रतिक- तात्याराव लहाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:28 AM2018-02-17T00:28:42+5:302018-02-17T00:28:51+5:30

शहरी व ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी शिवसेनेने आरोग्य शिबिराचे आयोजन करुन समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे. समाजाच्या खºया सेवेचे प्रतिक म्हणून अशा शिबिरांचे वारंवार आयोजन केले जावे. मी स्वत: प्रत्येक वेळी आपल्या सेवेसाठी उपस्थित राहील. आजच्या काळात काळजी करणारे सर्वच असतात; परंतु, खरी काळजी घेणारा एखादाच असतो, असे भावपूर्ण उद्गार नेत्ररोग तज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी काढले.

Mahabharoga Camp in Parbhani: Health Shibir The true symbol of social service - Tatyarao Leh | परभणीत महाआरोग्य शिबीर : आरोग्य शिबीर समाजसेवेचे खरे प्रतिक- तात्याराव लहाने

परभणीत महाआरोग्य शिबीर : आरोग्य शिबीर समाजसेवेचे खरे प्रतिक- तात्याराव लहाने

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरी व ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी शिवसेनेने आरोग्य शिबिराचे आयोजन करुन समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे. समाजाच्या खºया सेवेचे प्रतिक म्हणून अशा शिबिरांचे वारंवार आयोजन केले जावे. मी स्वत: प्रत्येक वेळी आपल्या सेवेसाठी उपस्थित राहील. आजच्या काळात काळजी करणारे सर्वच असतात; परंतु, खरी काळजी घेणारा एखादाच असतो, असे भावपूर्ण उद्गार नेत्ररोग तज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी काढले.
शहरातील जिंतूररोडवरील नूतन विद्यामंदिराच्या प्रांगणात चौथ्या दिवशी परभणी शहर व ग्रामीण भागातील एकंदरीत २० हजार रुग्णांची तपासणी करुन उपचार करण्यात आले. त्यापैकी जवळपास १६ हजार नेत्र रुग्णांची डॉ.तात्याराव लहाने व त्यांच्या समवेत असलेले डॉ. दुर्गेश पिसीने, डॉ. चंद्रकिशोर पारधी, डॉ.अर्चना गोरे, डॉ.व्ही.एम. जोगदंड यांच्या पथकाने तपासणी केली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना डॉ.लहाने म्हणाले, परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी मला खूप प्रेम दिले आहे. माझ्यावरील त्यांचा प्रचंड विश्वास मला जोमाने काम करण्यास प्रेरणा देतो, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी आ.डॉ. राहुल पाटील व शिवसेना पदाधिकाºयांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी शिवसैनिकांनी प्रयत्न केले.

Web Title: Mahabharoga Camp in Parbhani: Health Shibir The true symbol of social service - Tatyarao Leh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.