'आमच्या हाताला काम द्या'; पाथरीत बांधकाम मजुरांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 05:40 PM2018-12-07T17:40:23+5:302018-12-07T17:40:47+5:30

तालुक्यात पावसा अभावी बहुतांश बांधकामे बंद आहेत.यामुळे यावर अवलंबून असलेल्या मजुरांच्या हाताला काम राहिले नाही.

'Let us work on our hands'; Construction Workers' morcha in pathari | 'आमच्या हाताला काम द्या'; पाथरीत बांधकाम मजुरांचा मोर्चा

'आमच्या हाताला काम द्या'; पाथरीत बांधकाम मजुरांचा मोर्चा

Next

पाथरी (परभणी ) :  बांधकाम व्यवसाय सध्या ठप्प असल्याने यावर अवलंबून असलेल्या मजुरांनी काम उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यात पाथरी शहर व ग्रामीण भागातील मजुरांची लक्षणीय संख्या होती. 

तालुक्यात पावसा अभावी बहुतांश बांधकामे बंद आहेत.यामुळे यावर अवलंबून असलेल्या मजुरांच्या हाताला काम राहिले नाही. मजुरांवर व त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. हाताला काम देण्याची मागणी करत मजुरांनी 3 डिसेंबर रोजी पाथरी तहसीलदारांना एक निवेदन दिले होते. यानंतरही काम उपलब्ध न झाल्याने मजुरांनी आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. 
या मोर्चामध्ये नगरसेवक अलोक चौधरी, वाजेद राज, लाईक राज ,एजाज राज, नसिरुद्दिन राज , खमरूदीन राज ,साजिद राज यांच्यासह तालुक्यातील बांधकाम मजुरांचा सहभाग होता. 
 

Web Title: 'Let us work on our hands'; Construction Workers' morcha in pathari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.