गंगाखेड येथे थकीत वेतनासाठी ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 07:20 PM2018-03-19T19:20:31+5:302018-03-19T19:20:31+5:30

ग्रामपंचायत कार्यालयात सेवक व पाणी पुरवठा विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांनी सहा महीण्यापासुन थकीत वेतन, राहणीमान भत्ता द्यावा व भविष्य निर्वाह निधीची कपात करावी आदी विविध मागण्यासाठी आजपासुन पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषण सुरू केले आहे.

Gram Panchayat employees' fasting for salary wages in Gangakhed | गंगाखेड येथे थकीत वेतनासाठी ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांचे उपोषण

गंगाखेड येथे थकीत वेतनासाठी ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांचे उपोषण

googlenewsNext
ठळक मुद्देतालुक्यातील ८४ ग्रामपंचायत कार्यालयात सेवक व पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी उपोषणात सुमारे १३० कर्मचाऱ्यांना मासीक वेतन वेळेवर मिळत नाही

गंगाखेड ( परभणी ) : तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयात सेवक व पाणी पुरवठा विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांनी सहा महीण्यापासुन थकीत वेतन, राहणीमान भत्ता द्यावा व भविष्य निर्वाह निधीची कपात करावी आदी विविध मागण्यासाठी आजपासुन पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषण सुरू केले आहे.

तालुक्यातील ८४ ग्रामपंचायत कार्यालयात सेवक व पाणी पुरवठा विभागात कार्यरत असलेल्या सुमारे १३० कर्मचाऱ्यांना मासीक वेतन वेळेवर मिळत नाही, शासन नियमानुसार राहणीमान भत्ता मिळत नाही त्याचप्रमाणे बँकेत कर्मचाऱ्यांचे खाते उघडले नसल्याने भविष्य निर्वाह निधीची कपात होत नाही. गेल्या एप्रिल २०१७ ते सप्टेंबर २०१७ दरम्यान कर्मचाऱ्यांच्या वेतनातुन कपात केलेली २५ टक्के व ५० टक्के रक्कम अद्याप मिळाली नाही त्याचप्रमाणे ऑक्टोबर २०१७ ते आज पावेतो सहा महिण्यांचे वेतन थकीत राहिल्याने व वरील मागण्यांसाठी वारंवार पत्र व्यवहार करून सुध्दा त्याची दखल घेतली न गेल्याने ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याचे निवेदनात नमुद करून सहा महिन्यांपासून थकीत वेतन, वेतानातून कपात केलेली २५ टक्के ५० टक्के वेतनाची रक्कम तात्काळ द्यावी व बँकेत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे खाते चालु करावे आदी मागण्यांकडे शासनाचे लक्ष  वेधुन घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी युनियनच्या कर्मचाऱ्यांनी आजपासुन पंचायत समीती कार्यालय प्रवेशद्वारासमोर अमरण उपोषण सुरू केले.

या विषयी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या मागणीचे निवेदनावर महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी युनियनचे तालुकाध्यक्ष नागणसिंग चंदेल, बालाजी मुंडे, बाबुराव आंधळे, परमेश्वर फड, मनोहर मुंडे, सुभाष टोलमारे, बालासाहेब शिंदे, माधव जाधव, निवृत्ती धापसे, शेख सालार, विठ्ठल चव्हाण, लक्ष्मण साबळे, भगवान बारगिरे, भारत कानडे, सोमनाथ मेनकुदळे, बाबुराव शेळके, अनंता कदम, वैजनाथ आडे आदीसह तालुक्यातील ८४ ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
 

Web Title: Gram Panchayat employees' fasting for salary wages in Gangakhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.