पिडीतेला न्याय देण्यासाठी गंगाखेड कडकडीत बंद; नागरिकांनी काढला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 04:28 PM2018-04-17T16:28:03+5:302018-04-17T18:03:02+5:30

कठूआ, उन्नाव व सुरत येथे घडलेल्या अत्याचार व खून प्रकरणाचा निषेध करत शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. यासोबतच या घटनांमधील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान नागरिकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. 

Gangakhed cracked off to give Asifa justice; Citizens removed the Front | पिडीतेला न्याय देण्यासाठी गंगाखेड कडकडीत बंद; नागरिकांनी काढला मोर्चा

पिडीतेला न्याय देण्यासाठी गंगाखेड कडकडीत बंद; नागरिकांनी काढला मोर्चा

Next

गंगाखेड (परभणी ) : कठूआ, उन्नाव व सुरत येथे घडलेल्या अत्याचार व खून प्रकरणाचा निषेध करत शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. यासोबतच या घटनांमधील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान नागरिकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. 

आज सकाळपासुन व्यापाऱ्यांनी बाजार पेठ स्वयंफुर्तीने कडकडीत बंद ठेवत कठूआ, उन्नाव व सुरत येथील घटनांचा निषेध नोंदविला. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी ११ वाजेच्या दरम्यान जैंदीपुरा येथील आझाद चौकातून तहसिल कार्यालयापर्यंत सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला. यात हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाली. तहसिल कार्यालयासमोर मोर्चा आल्यानंतर इरम फातेमा या मुलीने मनोगत व्यक्त करत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. मोर्चात सहभागी मुलींनी नायब तहसीलदार वाय. बी. गजभारे व पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांच्याकडे निवेदन दिले. मोर्चा दरम्यान मार्गात संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा आदी संघटना तसेच व्यापाऱ्यांनी आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली.

मोर्चात आ. डॉ. मधुसुदन केंद्रे, नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया, माजी नगराध्यक्ष गौतम भालेराव, रामप्रभु मुंडे, उपनगराध्यक्ष राधाकिशन शिंदे, हाफिज बागवान,  नगरसेवक सय्यद अकबर, शेख कलीम, सत्यपाल साळवे आदींचा सहभाग होता. 

Web Title: Gangakhed cracked off to give Asifa justice; Citizens removed the Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.