सोनपेठ येथे पिक विम्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 07:30 PM2018-06-22T19:30:11+5:302018-06-22T19:30:11+5:30

तालुक्यातील दहा हजार शेतकरी पिक विम्यापासुन वंचित आहेत, त्यांना तात्काळ पिक विम्याची रक्कम देण्यात यावी या मागण्यासाठी शेतकरी संघटनेच्यावतीने तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. 

Farmers' association fasting to demand crop insurance at Sonpeth | सोनपेठ येथे पिक विम्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे उपोषण

सोनपेठ येथे पिक विम्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे उपोषण

Next

सोनपेठ (परभणी ) : तालुक्यातील दहा हजार शेतकरी पिक विम्यापासुन वंचित आहेत, त्यांना तात्काळ पिक विम्याची रक्कम देण्यात यावी या मागण्यासाठी शेतकरी संघटनेच्यावतीने तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. 

सोनपेठ तालुक्यातील दहा हजार हुन अधिक शेतकऱ्यांना रिलायन्स विमा कंपनी ,कृषी विभाग व महसुल प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे दहा कोटी रुपयाच्या नुकसानभरपाई पासुन वंचीत राहावे लागत आहे. शेतकऱ्यांना त्वरित विम्याची रक्कम देण्यात यावी या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी अँड गजानन तोंडगे, विश्वंभर गोरवे, रामेश्वर भोसले, शिवाजी कदम, डॉ सुभाष कदम, सुधीर बिंदु यांनी आंदोलकांना मार्गदर्शन करत रक्कम न मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. नायब तहसीलदार डॉ निकेतन वाळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन विमा वितरीत करण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तालुका कृषी अधिकारी गणेश कोरेवाड यांची उपस्थिती होती. आंदोलनात माधव जाधव, सोमनाथ नागुरे, माऊली जोगदंड, आण्णा जोगदंड, अंगद काळे, चंद्रकांत देशपांडे, राजेश कदम, मारोती सपकाळ, सुधाकर मुंडे, पांडुरंग भोसले, रमेश भोसले, पांडुरंग जोगदंड यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचा सहभाग होता. 
 

Web Title: Farmers' association fasting to demand crop insurance at Sonpeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.