सेलू येथे अवैधरीत्या जनावरांची वाहतूक करणारा टेम्पो पकडला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 06:51 PM2019-01-31T18:51:25+5:302019-01-31T18:51:47+5:30

या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

Captured tempo transporting illegal animals in Selu | सेलू येथे अवैधरीत्या जनावरांची वाहतूक करणारा टेम्पो पकडला 

सेलू येथे अवैधरीत्या जनावरांची वाहतूक करणारा टेम्पो पकडला 

googlenewsNext

सेलू (परभणी ) : अवैधरीत्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोला पोलिसांनी आज पहाटे 6 वाजेच्या सुमारास पाथरी रोडवर पकडले. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

याप्रकरणी सेलू पोलिसात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंठ्याकडून पाथरीकडे टेम्पो  (एम.एच.19-झेड-7863 )मधून अवैधरीत्या दहा बैलांची क्रूरपणे वाहतूक करण्यात येत होती. हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी टेम्पो अडवून विचारपूस केली असता कुठलाही परवाना चालकाकडे नव्हता. त्यामुळे पोलिसांनी  जनावरे व टेम्पो जप्त केला. 

या प्रकरणी पोलीस कर्मचारी प्रदीप हिरक यांच्या फिर्यादिवरून आरोपी शेख नजीम शेख इस्माईल, मच्छिंद्र मारोती दांगोडे, आसेफ शहा अजीज शहा ( रा.बोरगाव सारोनी, ता.सिल्लोड जि. औरंगाबाद ) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास बीट जमादार संजय साळवे करत आहेत.

Web Title: Captured tempo transporting illegal animals in Selu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.