परभणी विधानसभेच्या जागेवर भाजपचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 12:07 AM2019-06-14T00:07:15+5:302019-06-14T00:08:02+5:30

परभणी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे मताधिक्य सातत्याने घटत असल्याने येथील जनता शिवसेनेला कंटाळली असून, आगामी विधानसभा निवडणुकीत परभणीची जागा भाजपाला सोडण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याची माहिती भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली़

BJP claims in parbhani assembly seat | परभणी विधानसभेच्या जागेवर भाजपचा दावा

परभणी विधानसभेच्या जागेवर भाजपचा दावा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणीविधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे मताधिक्य सातत्याने घटत असल्याने येथील जनता शिवसेनेला कंटाळली असून, आगामी विधानसभा निवडणुकीत परभणीची जागा भाजपाला सोडण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याची माहिती भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली़
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घेतलेल्या भूमिकेविषयी महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली़ ते म्हणाले, परभणी विधानसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली़ या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार परभणीच्या जागेवर भाजपाचा अधिकार असून, ही जागा भाजपाला सोडावी, यासाठी पक्षाकडे मागणी केली जाणार आहे़ आनंद भरोसे म्हणाले, मागील ३५ वर्षांपासून लोकसभेच्या निवडणुकीत परभणी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे मताधिक्य घटत आहे़ यावेळच्या निवडणुकीत हे मताधिक्य तब्बल ३२ हजारांनी घटले आहे़ लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करून शिवसेनेच्या विजयासाठी हातभार लावला़ मात्र शिवसेनेतच गटबाजी झाली़ युतीसाठी एक-एक जागा महत्त्वाची असून, परभणी विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मताधिक्य घटलेले असेल तर भाजपा कार्यकर्ते किती प्रयत्न करणार? असा सवाल करून परभणीत शिवसेनेला जनता कंटाळली आहे़ दरवेळी मताधिक्य घटत आहे़ भाजपाने या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पक्ष बांधणी केली आहे़ बुथनिहाय कार्यकर्ते भाजपाकडे असून, सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहचून भाजप या ठिकाणी सक्षम पक्ष आहे़ याशिवाय मागील विधानसभा निवडणुकीतही भाजपाला चांगले मतदान मिळाले होते़ भाजप सरकारने परभणी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे़ जनसामान्यांची कामे केली आहेत, असे सांगून परभणीची जागा भाजपालाच सोडावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली़ ही मागणी करीत असताना भाजप सरकारने परभणी विधानसभा मतदारसंघासाठी दिलेल्या निधीची माहिती त्यांनी दिली़ तसेच साडेचार वर्षांच्या काळात भाजपाने केलेल्या कामांची माहितीही त्यांनी या पत्रकार परिषदेत दिली़ या कामांच्या बळावर परभणीची जागा भाजपाला सोडून घेण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे मागणी करणार असल्याचे भरोसे यांनी सांगितले़ या पत्रकार परिषदेस भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भुमरे, महापालिकेतील गटनेत्या मंगला मुदगलकर, भाजप तालुकाध्यक्ष राजू देशमुख, भीमराव वायवळ, रितेश जैन, सुनील देशमुख, दिनेश नरवाडकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते़
शिवसेना आमदारांवर केले गंभीर आरोप
४या पत्रकार परिषदेत आनंद भरोसे यांनी शिवसेनेचे आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले़ ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आ.डॉ.राहुल पाटील यांनी शिवसेनेच्याच विरोधात काम केले़
४त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला ते मते कशी मागणार? असा सवाल केला़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी परभणी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ३३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला़
४परंतु, शिवसेनेचे आमदार मात्र आपणच ही कामे मंजूर करून आणल्याचे श्रेय घेत असून, कामांचे उद्घाटन करीत आहेत़ या दोन्ही मुद्यांवरून आनंद भरोसे यांनी आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले़

Web Title: BJP claims in parbhani assembly seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.