औरंगाबाद : १७०० विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 12:41 AM2018-06-26T00:41:49+5:302018-06-26T00:44:01+5:30

औरंगाबाद तालुक्यातील हिरापूर शिवारात गट नं ४६ मधील पी.एस.बी.ए शाळेची इमारत धोकादायक झाली आहे. त्यामुळे १७०० विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. शुक्रवारी शाळेच्या कॉलमला अचानक तडा गेल्यामुळे इमारतीला हादरा बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सदरील कॉलम फुटून खाली सरकल्यानंतर झालेल्या आवाजामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना तात्काळ बाहेर काढण्यात आले.

Aurangabad: The death of 1700 students | औरंगाबाद : १७०० विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

औरंगाबाद : १७०० विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

googlenewsNext

श्रीकांत पोफळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शेंद्रा (औरंगाबाद ) : औरंगाबाद तालुक्यातील हिरापूर शिवारात गट नं ४६ मधील पी.एस.बी.ए शाळेची इमारत धोकादायक झाली आहे. त्यामुळे १७०० विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. शुक्रवारी शाळेच्या कॉलमला अचानक तडा गेल्यामुळे इमारतीला हादरा बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सदरील कॉलम फुटून खाली सरकल्यानंतर झालेल्या आवाजामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना तात्काळ बाहेर काढण्यात आले.
शाळा व्यवस्थापनाने आठवडाभराची सुटी शिक्षण विभागाची परवानगी न घेता जाहीर करून टाकल्याने पालकांना हा सगळा प्रकार समजण्याच्या पलीकडे गेला आहे. संस्थाचालकाने पालकांना व शिक्षण विभागाला (पान २ वर)
शिक्षण विभागाचे मत...
सदर घटनेची व शाळेला सुट्या दिल्याची माहिती शाळेने शिक्षण विभागाला कळवायला हवी होती. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा स्ट्रक्चर आॅडिट रिपोर्ट आल्याशिवाय त्या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना बसवू नये, असे आदेश संस्थेला दिले आहेत, असे शिक्षणाधिकारी राकेश सोळुंके यांनी सांगितले.
पोलिसांचे मत...
सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर शाळेला लेखी नोटीस बजावली आहे. इमारतीच्या पडझडीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले, त्यांना इजा झाली तर सर्व जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची राहील. असे चिकलठाणा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी सांगितले.
संस्थाचालकाचे मत...
या घटनेनंतर स्ट्रक्चर आॅडिटच्या रिपोर्टसाठी अर्ज दिला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही. शिवाय शासकीय अभियंत्यांनी सांगितलेल्या सुधारणा करून त्यांच्या परवानगीनेच या इमारतीत विद्यार्थी बसविण्यात येतील, असे पीएसबीए इंग्लिश स्कूलचे संस्थापक अमित भुशेकर यांनी सांगितले.

Web Title: Aurangabad: The death of 1700 students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.