पिक कर्जातुन कपात केलेली रक्कम व्याजासह परत करावी;मानवत येथे शेतकऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 07:01 PM2019-01-31T19:01:11+5:302019-01-31T19:02:16+5:30

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पिक कर्जातुन कपात केलेली रक्कम व्याजासह परत करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेवर मोर्चा काढण्यात आला.

The amount of deducted from the crop loan should be returned with interest; the demand of the farmers at Manavat | पिक कर्जातुन कपात केलेली रक्कम व्याजासह परत करावी;मानवत येथे शेतकऱ्यांची मागणी

पिक कर्जातुन कपात केलेली रक्कम व्याजासह परत करावी;मानवत येथे शेतकऱ्यांची मागणी

Next

मानवत (परभणी ) :  दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पिक कर्जातुन कपात केलेली रक्कम व्याजासह परत करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेवर मोर्चा काढण्यात आला.

बसस्थानक परिसरातील महाराणा प्रताप चौकातून मोर्चास दुपारी २ सुरुवात झाली. बॅंकेचे व्यवस्थापक मनिष कालरा यांनी मागण्यांचे निवेदन स्विकारले. मोर्चात जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, दिगंबर पवार, भास्कर खटीन्ग, राजु शिन्दे, केशव आरमाळ, तालुका अध्यक्ष बालासाहेब आळणे, हनुमान मसलकर, माऊली निर्वळ, विक्रम निर्वळ, सुनील पान्हेरे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते. 

Web Title: The amount of deducted from the crop loan should be returned with interest; the demand of the farmers at Manavat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.