परभणीत पाच तासांनंतर इंटरनेट सेवा पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:01 AM2019-02-21T00:01:09+5:302019-02-21T00:01:34+5:30

वसमत रस्त्यावर ओएफसी केबल तुटल्याने बुधवारी परभणी शहरातील इंटरनेट सेवा ठप्प झाली होती़ भारतीय दूरसंचार निगमच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हा बिघाड दुरुस्त केल्यानंतर दुपारी २ वाजेच्या सुमारास शहरातील इंटरनेट सेवा सुरळीत झाली असल्याची माहिती या विभागातील अधिकाºयांनी दिली़

After five hours in Parbhani, Internet service is restored | परभणीत पाच तासांनंतर इंटरनेट सेवा पूर्ववत

परभणीत पाच तासांनंतर इंटरनेट सेवा पूर्ववत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : वसमत रस्त्यावर ओएफसी केबल तुटल्याने बुधवारी परभणी शहरातील इंटरनेट सेवा ठप्प झाली होती़ भारतीय दूरसंचार निगमच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हा बिघाड दुरुस्त केल्यानंतर दुपारी २ वाजेच्या सुमारास शहरातील इंटरनेट सेवा सुरळीत झाली असल्याची माहिती या विभागातील अधिकाºयांनी दिली़
नांदेडहून परभणीला येणारी डब्ल्यूटीआरसीची ओएफसी केबल बुधवारी सकाळी तुटल्याची घटना घडली़ साधारणत: ९ वाजेच्या सुमारास हा बिघाड झाल्याने शहरातील सर्व इंटरनेटसेवा ठप्प पडली होती़ परिणामी राष्ट्रीयकृत, सहकारी, नागरी बँकांमध्येही कामकाज ठप्प पडले़ तसेच शासकीय कार्यालये आणि खाजगी कार्यालयांमध्येही या बिघाडाचा परिणाम झाला़ कामकाज ठप्प झाल्याने नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागला़ दरम्यान, बीएसएनएलमधील डब्ल्यूटीआरसी विभागातील अधिकारी, कर्मचाºयांनी घटनास्थळी जाऊन दुरुस्तीचे काम सुरू केले़ दुपारी २ वाजेच्या सुमारास ही केबल जोडण्यात आली़ त्यानंतर शहरातील इंटरनेटसेवा पूर्ववत झाली असल्याची माहिती बीएसएनएलच्या अधिकाºयांनी दिली़
दोन दिवसांपासून सेवा विस्कळीत
शहरातील अनेक भागांमधील इंटरनेट सेवा मागील दोन दिवसांपासून विस्कळीत झाली आहे़ बुधवारी ओएफसी केबलमध्ये बिघाड झाल्याने सर्वच भागात सेवा ठप्प पडली असून, त्यापूर्वीही ही सेवा विस्कळीत झाली असल्याने ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे़ सुरळीत व योग्य गतीने इंटरनेट सेवा मिळत नसल्याने व्यापारी भागातील ग्राहक त्रस्त आहेत़ बीएसएनएल अधिकाºयांनी या संदर्भात तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी ग्राहकांमधून केली जात आहे़
बीएसएनएलच्या वतीने बुधवारी झालेला बिघाड दुरुस्त करण्यात आला़ त्यानंतर दुपारी इंटरनेट सुविधा सुरळीत झाली असली तरी शहरातील स्टेडियम कॉम्प्लेक्स भागात बुधवारी दिवसभर इंटरनेटची सुविधा सुरळीत झाली नव्हती़ रात्री उशिरापर्यंत या भागातील इंटरनेटसेवा विस्कळीत राहिली़

Web Title: After five hours in Parbhani, Internet service is restored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.