परभणी- हिंगोली विधान परिषदेसाठी ९९.६० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 05:44 PM2018-05-21T17:44:01+5:302018-05-21T17:44:01+5:30

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी ५०१ पैकी ४९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

99.60 percent polling for Parabhani-Hingoli Legislative Council election | परभणी- हिंगोली विधान परिषदेसाठी ९९.६० टक्के मतदान

परभणी- हिंगोली विधान परिषदेसाठी ९९.६० टक्के मतदान

Next
ठळक मुद्देकाँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे सुरेश देशमुख व शिवसेना-भाजपा युतीचे विप्लव बाजोरिया यांच्यात सरळ लढत होत आहे.परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये दुपारपर्यंत मतदान मंदावलेलेच होते.

परभणी :  परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी ५०१ पैकी ४९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तब्बल ९९.६० टक्के मतदारांनी मतदान केल्याने या निवडणुकीच्या निकालाकडे दोन्ही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे सुरेश देशमुख व शिवसेना-भाजपा युतीचे विप्लव बाजोरिया यांच्यात सरळ लढत होत आहे. परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये दुपारपर्यंत मतदान मंदावलेलेच होते. दुपारी २ वाजेनंतर मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली. सायंकाळी ४ वाजता दोन्ही जिल्ह्यातील सातही केंद्रांवर संपन्न झाले. निवडणूक विभागाने दिलेल्या अंतिम आकडेवारीनुसार ५०१ मतदारांपैकी ४९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. हिंगोली येथील १०९ पैकी १०७ मतदारांनी मतदान केले. येथे २ मतदारांनी मतदान केले नाही. उर्वरित सहाही मतदान केंद्रावर १०० टक्के मतदान झाले. 

दोन्ही उमेदवारांचे भवितव्य आता मतपेटीत बंद झाले असून गुरुवारी सकाळी मतमोजणी होणार आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीने आपल्याकडे असलेली परभणीची जागा कायम ठेवण्यासाठी पुरेपुर प्रयत्न केले. त्या दृष्टीकोनातून प्रचारही केला. दुसरीकडे शिवसेना-भाजपा युतीने अतिशय शिताफीने रणनिती आखत प्रचार केला. त्यामुळे निकाल काय लागतो, याकडे परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: 99.60 percent polling for Parabhani-Hingoli Legislative Council election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.