बसून बसून मेंदू शिणतो? बैठ्या कामानंही शरीर दमतंच, कसं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 11:50 AM2017-08-10T11:50:57+5:302017-08-10T12:23:58+5:30

  मस्त टेकडी चढून आलं किंवा पोहून, पळून आलं तर दमून जाणं ठीकच आहे हो; पण एकाजागी बसून काम करताना शरीर का दमावं?

Sit down sitting on the brain? Sitatanhi body and mind, how? | बसून बसून मेंदू शिणतो? बैठ्या कामानंही शरीर दमतंच, कसं?

बसून बसून मेंदू शिणतो? बैठ्या कामानंही शरीर दमतंच, कसं?

googlenewsNext
ठळक मुद्देमस्त टेकडी चढून आलं किंवा पोहून, पळून आलं तर दमून जाणं ठीकच आहे हो; पण एकाजागी बसून काम करताना शरीर का दमावं? बौद्धिक कामं करतानासुद्धा तुमचं शरीर दमू शकतं.

- प्रज्ञा शिरोदे  

तुम्हाला कधी असं जाणवलं आहे का, की तुम्ही दिवसभर मेख मारून काम करत बसला आहात, एक मोठं पुस्तक बसल्या बसल्या वाचून संपवलं, त्यानंतर अनेक ई-मेल्स केल्या, मग परत बसून काम केलं आणि हे सगळं करताना साधारण ५-६ तासांमध्ये तुम्ही एकदाच वगैरे उठला असाल. ही कामं करताना तुम्हाला मानसिकरीत्या दमायला तर होणारच. कारण तुमचा मेंदू कामात असतो ना. पण असं असताना तुमचं शरीर का दमावं?
  मस्त टेकडी चढून आलं किंवा पोहून, पळून आलं तर दमून जाणं ठीकच आहे हो; पण एकाजागी बसून काम करताना शरीर का दमावं?
   पण मित्रांनो, हो! बौद्धिक कामं करतानासुद्धा तुमचं शरीर दमू शकतं. स्टीव्हन फाइनसिल्वर नावाचे अमेरिकन शास्त्रज्ञ माणसाच्या झोपेवर काम करतात. झोपेमुळे, विश्रांतीमुळे माणसाच्या वर्तणुकीमध्ये कसे बदल होतात हे तपासणं हा त्यांच्या अभ्यासाचा विषय. त्यांच्यामते माणूस जेव्हा शारीरिक श्रम करत नाही आणि केवळ बौद्धिक श्रम करतो तेव्हाही त्याला दमायला होऊच शकतं. त्यांच्या मते शरीर कोणत्याही प्रकारच्या ताणाला साधारण सारख्याच पद्धतीने बघतो. म्हणजे पळून पायांच्या स्नायूंवर परिणाम होतो, तर एक तास खूप कठीण गणितं सोडवून तुमच्या मेंदूचा व्यायाम होतो. जसं पळाल्यामुळे शरीरात अ‍ॅड्रेनॅलीन तयार होतं तसंच बैठे काम करून, लेखन-वाचन करूनही तयार होतं.
  आपल्या शरीरामध्ये एक अजूनही गमतीदार गोष्ट तयार होते मित्रांनो! जर तुम्ही अशा मित्रमंडळींबरोबर असाल, जे सतत कशा ना कशाबद्दल तक्रार करत राहतात, म्हणजे माझी झोपच नाही होत, किंवा कामाच्या ठिकाणी मला सतत ताण असतो वगैरे तर दिवसाच्या शेवटी असं होतं, की तुम्हालाही तुमची झोप झालेली नाही, तुम्हाला कामात ताण आहे अशा काहीही गोष्टी वाटू लागतात! म्हणतातच ना, माणूस ज्या प्रकारच्या लोकांबरोबर राहतो त्यानुसार तो ओळखला जातो.
तर केटी हेनी हिने या सगळ्या विषयांवर विविध शास्त्रज्ञांची मते ऐकून एक सुंदर लेख लिहिला आहे. या लेखात ती असंही म्हणते की आपण ज्याप्रकारे शारीरिक श्रमांकडे बघतो त्याच प्रकारे बौद्धिक श्रमांकडे पाहिलं पाहिजे. नाहीतर नर्व्हस ब्रेकडाऊन, डिप्रेशन अशा मानसिक व्याधी आपल्या मागे लागू शकतात. रोजच्या कामामध्ये काही साधे नियम पाळा.. जसं कितीही महत्त्वाचं काम सुरू असेल तरीही एका तासानंतर १-२ मिनिटाचा ब्रेक घ्या! छोटी चक्कर मारून या, खिडकीबाहेर बघा. आपण एक स्प्रिंट मारली की जसा दम खातो ना, साधारण तसंच!

तर आपलं काम अधिक चांगलं कसं करावं, काम करताना आपल्या मेंदूमध्ये नक्की काय होतं, हे जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा

why sitting at your computer All Day Can wipe you out

त्यासाठी ही लिंक पहा..
http://nymag.com/scienceofus/2017/07/sitting-at-your-computer-all-day-can-wipe-you-out.html

पळा चिडचिड कमी होईल!

पळणं! म्हणजे आपण पळतो ते. त्याबद्दल काही खरंतर लिहायचं किंवा अभ्यासायचं काय? हजारो वर्षांपासून आपले पूर्वज हेच करत आले आहेत. पण आजच्या काळामध्येच विशेषत: या पळण्याबद्दल सांगण्यासारखं बरंच काही आहे.
ख्रिस्तोफर मॅकडुगल हा फॉरेन जर्नालिस्ट आणि ‘बॉर्न टू रन’ नावाच्या बेस्टसेलर पुस्तकाचा लेखक आपल्या टेड टॉकमध्ये पळण्याविषयी खूप कमाल काही गोष्टी सांगतो. तो म्हणतो की या जगात आपल्याला कधीच ज्याचं उत्तर कळू शकलं नाही अशी तीन आश्चर्य आहेत.

१. दोन मिलियन वर्षांपूर्वी माणसाचा मेंदू मोठा झाला, अर्थातच या मेंदूला पोषण देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रोटिन आवश्यक होते. पण मग जर अवजारे केवळ दोन लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात आली असतील, तर मग मानव शिकार कशी करत होता? मानव हा जंगलातला सगळ्यात छोटा, भित्रा आणि कोणतीही विशेष कौशल्य अवगत नसलेला प्राणी आहे, मग त्याने जंगलांवर राज्य कसं केलं?

२. महिला आॅलिम्पिकमधल्या स्प्रिंट रेसमध्ये अतिशय वाईट कामगिरी बजावतात. पण जसजसं अंतर वाढायला लागतं, काही किलोमीटर्स होतं तसतशा महिला या पळण्यामध्ये अव्वल क्रमांक मिळवू लागतात. म्हणजे मॅरेथॉनमध्ये गेल्या केवळ २० वर्षांपासून महिलांना पळण्याची संधी आहे. त्याआधी महिला मॅरेथॉन पळत नसत. तरीही आज मॅरेथॉन जिंकणाऱ्या  एवढ्या मोठ्या प्रमाणात बायका कशा दिसतात? या १०० मीटर्सचं अंतर अतिशय मंद गतीने पार करणाऱ्या ४२ किलोमीटर्स इतक्या सहजासहजी कसं पळू शकतात?

३. कुणाचं वय जरी ६५ वगैरे असलं तरीही तुम्ही तुमच्या १९ व्या वर्षी ज्या वेगाने पळायचा त्या वेगाने कसं पळता येईल? कारण आज अनेक पळणारे आपल्याला ज्येष्ठ नागरिक दिसतात.. हो ना?

ख्रिस्तोफरच्या मते या तिन्हींचं उत्तर आपल्या पळण्याच्या सवयीमुळे आहे. आणि पळण्यामुळेच माणूस निरोगी आणि कमी चिडचिडा होऊ शकतो ! मग ख्रिस्तोफर अनेक कथांमधून पळण्याविषयी आपल्याला सांगतो.

हा व्हिडीओ बघितल्यावर तुम्हाला एक रपेट मारावीशी वाटेल. पळून यावंसं वाटेल. मग नक्की बघा हा व्हिडीओ!

आर वी बॉर्न टू रन ?

https://www.ted.com/talks/christopher_mcdougall_are_we_born_to_run/transcript#t-47228

Web Title: Sit down sitting on the brain? Sitatanhi body and mind, how?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.