#RaiseTheWage- अमेरिकेची तरुण सिनेटर जेव्हा वेतनासाठी लढते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 05:57 AM2019-06-20T05:57:00+5:302019-06-20T06:00:02+5:30

29 वर्षाची अमेरिकन सिनेटर अ‍ॅलेक्झाण्ड्रिया. तिनं आता रेस्टॉरण्ट कर्मचार्‍यांच्या सन्मानजनक वेतनासाठी तिनं मोहीम उघडली आहे.

# RaiseTheWage - When US Senator fights for wages. | #RaiseTheWage- अमेरिकेची तरुण सिनेटर जेव्हा वेतनासाठी लढते.

#RaiseTheWage- अमेरिकेची तरुण सिनेटर जेव्हा वेतनासाठी लढते.

Next
ठळक मुद्देसमान आणि सन्मानजनक वेतनासाठी जगभरात आकार घेत असलेली एक चळवळ

 कलिम अजीम

कामगार हक्कांसाठी जगभरात आजवर अनेक आंदोलनं झाली. रशियन व फ्रेंच राज्यक्र ांती याच लढय़ाचं फलित होते. मात्र गेल्या अनेक शतकांपासून सुरू असलेला हा लढा आजही सुरूच आहे. अमेरिकेतील दोन महिला सिनेटरनी (खासदार) ‘रेज द वेज अ‍ॅक्ट-2019’ विधेयक मांडून कामगारांच्या प्रश्नांकडे जगाचं लक्ष वेधलं आहे. नुसतं विधेयक मांडून त्या शांत बसल्या नाहीत तर  त्यासाठी त्यांनी अनोखा लढा उभारला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे जगभरात महिला कामगारांच्या समान वेतन अधिकारांवर चर्चा सुरू झाली आहे.
सिनेटर अ‍ॅलेक्झाण्ड्रिया ओकासियो-कॉर्टेझ, वय फक्त 29 वर्षे. गेल्या मे महिन्यात त्या चक्क वेटरच्या रूपात एका मेक्सिकन हॉटेलात दिसल्या. त्यांनी न्यू यॉर्कमधील या हॉटेलमध्ये जाऊन वेटरसारखा ग्राहकांच्या टेबलावर पिझा सव्र्ह केला. ही अनोखी शक्कल त्यांनी हॉटेल कामगारांची सुरक्षा व पगारवाढीसाठी लढवली. यासाठी त्यांनी महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे 31 तारीख निवडली. पगाराच्या दिवशी त्यांनी रेस्टॉरंट मालकांना कामगारांची व्यथा समजून घेण्याची गळ घातली. कामगारांना समान वेतन आयोग लागू करावा, अशी मागणीही त्यांनी मालकांकडे केली. 
या अनोख्या आंदोलनाच्या निमित्ताने अमेरिकेत ‘रेज द वेज अ‍ॅक्ट-2019’ म्हणजे किमान वेतनवृद्धी कायद्यावर चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेच्या कायद्यानुसार फास्ट फूड आउटलेट्स, कॉल सेंटर, थियटर, दुकान, सलून, रेस्नं आणि  गॅरेजमधील कर्मचार्‍यांना जेमतेम एक डॉलर वेतन देतात. अ‍ॅलेक्झाण्ड्रिया यांच्या मते इतकं कमी वेतन ही गुलामी आहे. वेटरला सन्मानजनक पगार मिळाला पाहिजे, असं त्यांचं मत आहे. हॉटेलमालकांनी कर्मचार्‍यांना तासाला 2 डॉलर 13 सेन्ट (2.13) म्हणजे इतपत तरी पैसे द्यायला हवेत अशी मागणी आहे. 
अजून एक  महत्त्वाची गोष्ट म्हणजे हॉटेलमध्ये काम करणार्‍या महिला कर्मचार्‍यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची हमी त्यांनी हॉटेलमालकाकडून घेतली. यासंदर्भात दि गार्डियनला दिलेल्या प्रतिक्रि येत त्या म्हणतात, ‘‘बहुतांश हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये महिला कर्मचार्‍यांचा छळ केला जातो. अधिकचं काम करूनही त्यांना योग्य पगार दिला जात नाही. अन्य पुरु ष सहकारी महिलांचे लैंगिक शोषणही करतात. रेस्टॉरंट मालकांनी ‘बी हर्ड एक्ट’ कायद्याअंतर्गत सुधारित सुरक्षा नियमावली जाहीर करावी.’’
अ‍ॅलेक्झाण्ड्रिया सिनेटर होण्यापूर्वी बारटेंडर होत्या. हॉटेल कामगारांचं दुर्‍ख माहीत असल्यानं त्यांनी ही मोहीम सुरू केली. गार्डियनला दिलेल्या मुलाखतीत, नोकरी करताना आपल्यावर सहकार्‍यांनी लैंगिक अत्याचार केल्याचंही त्या सांगतात. 
अर्थात सध्या तरी रेस्टॉरण्ट असोसिएशनने पगारवाढीची त्यांची मागणी मान्य करण्यास नकार दिला आहे. मात्र तरीही आता अधिक जोमानं त्या चळवळीला गती देत आहेत. अमेरिकेतल्या भारतीय वंशाच्या सिनेटर कमला हॅरीस यांनीही पुरुष कर्मचार्‍यांइतकंच वेतन महिलांना मिळावं म्हणून मागणी केली आहे. समान वेतनाचा प्रश्न अमेरिकतेतही गंभीर आहे. 
पुरु ष कर्मचार्‍यांच्या तुलनेत महिलांना कमी पगार दिला जातो. हा भेदभाव दूर करून पगार समपातळीवर आणावा अशी मागणी जगभरात सुरू आहे. गेल्या वर्षी लंडनमध्ये बीबीसी या जगप्रसिद्ध मीडिया हाउसमध्ये महिला कर्मचार्‍यांनी समान वेतनासाठी ‘जेंडर पे गॅप’ मोहीम सुरू केली होती. त्यानंतर ब्रिटनच्या अनेक कंपन्यांमध्ये समान वेतनासाठी महिलांनी लढा उभा केला होता.
जगभरात ‘जेंडर पे गॅप’ दूर करण्याची मोहीम आता तीव्र झाली आहे. अमेरिकेच्या महिला खासदारांनी हा विषय संसदेत मांडल्याने हा विषय प्रशासकीय पातळीवर चर्चेला आला आहे. जगभरातून या महिला खासदारांना पाठिंबा मिळत असून, सोशल मीडियावर यूजर्झनी फं्र2ीळँीहंॅी मोहीम सुरू केली आहे. 


 

Web Title: # RaiseTheWage - When US Senator fights for wages.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.