आॅर्डर प्लीज..

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 06:04 PM2018-02-14T18:04:05+5:302018-02-15T10:40:17+5:30

हॉटेलात आॅर्डर घ्यायचं काम रोबोट करू लागलेत. कुठं? अमेरिकेत, चीनमध्ये? तिकडे तर करतातच पण आता चेन्नईच्या हॉटेलातही रोबोट वेटर आलेत..

Order please .. | आॅर्डर प्लीज..

आॅर्डर प्लीज..

Next

- डॉ. भूषण केळकर

आपण हॉटेलमध्ये जातो. आॅर्डर करतो. साधारणत: त्या उपाहारगृहात काम करणारे वेटर्स आपल्याला आपण सांगू ते आणून देतात. आपण ब-याचदा म्हणतो पण की एवढ्या गर्दीत, एवढ्या गडबडीत ही लोकं कशी प्रत्येकाची आॅर्डर लक्षात ठेवतात.’ अर्थात कधीकधी चुका होतात आणि शुद्ध शाकाहारी ग्राहकाला मांसाहारी डिश दिली जाऊ शकते. साखर नको असलेल्याला गोडमिट्ट चहा/कॉफी मिळते आणि गडबड होते.
आता तुम्ही वाचक मंडळी म्हणाल की, आपल्या या इंडस्ट्री ४.० च्या संवादाला हे कसलं ‘तोंडी लावणं’? अहो हीच तर गंमत आहे इंडस्ट्री ४.० ची. हॉटेलांत स्वयंपाक करणं म्हणजे फूड इंडस्ट्री घ्या किंवा उपाहारागृहात ते सर्व्ह करणं घ्या, यामध्ये इंडस्ट्री ४.० पोहोचलंय बरं का! शेवटी मनापर्यंत पोहोचण्याचा मार्ग पोटातूनच जातो म्हणतात ना ते काही खोटं नाही!!
डॉ. मार्कुस लॉरेन्झ हा जर्मनीतला प्रख्यात संशोधक. त्याचे टेडवर एक भाषण आहे. ते तुुम्ही पण मुळातून पाहू शकाल. विशेषत: बीसीजी लंडनमध्ये दिलेले त्याचे भाषण तुम्ही टेडच्या अ‍ॅपवर (जे फुकट डाउनलोड करू शकाल आणि करा!) ऐकू शकाल. पाहू शकाल. त्यात त्यानं म्हटलंय की, संधी निव्वळ फूड इंडस्ट्री घेतली तर तुमच्या लक्षात येईल की अन्नप्रक्रिया करताना ज्या चुका होतात त्याची किंमत असते पाच हजार कोटी अमेरिकन डॉलर्स. साधी कल्पना करा की ही किंमत म्हणजे आयबीएम या प्रचंड दबदबा असणाºया अमेरिकन कंपनीची निम्मी वार्षिक उलाढाल आहे. तीन- साडेतीन लाख कोटी रुपये फक्त आणि निव्वळ इंडस्ट्री लॉस म्हणून वाया जाणं ही केवढी भयानक बाब आहे! विशेषत: आताचा आॅक्सफॉमचा रिपोर्ट सांगतोय की, जगातील ८२ टक्के संपत्ती निर्मितीची मालकी केवळ नऊ टक्के लोकसंख्येकडे आहे. नुसतं एवढंच नाही, तर संयुक्त राष्टÑसंघ असं सांगतो की, रोज २५००० लोक अन्नान्न दशा होऊन मृत्युमुखी पडतात. दर दिवसाला! मॅन्युफॅक्चरिंग आणि अन्य विषयांप्रमाणे अन्ननिर्मिती आणि अन्नप्रक्रिया यामध्ये इंडस्ट्री ४.० मुळे ३० टक्के वेग वाढेल आणि किमतीत २५ टक्के घट होईल, अशी अटकळ बांधली जाते आहे. भारतासारख्या देशात जिथं आपले अनेक बांधव केवळ अन्नान्न दशेनं मृत्युमुखी पडताहेत तिथं या तंत्रज्ञानाने जीवनस्तर उंचावेल, जीव वाचतील.
नुसते अन्नप्रक्रियाच नव्हे, तर रेस्टॉरंट्समध्येसुद्धा इंडस्ट्री ४.० आलं आहे. अमेरिकेमध्ये अनेक स्टार्टअप्स आले आहेत की जे अन्नपदार्थ निर्माण करण्यामध्ये कार्यरत आहेत. उदाहरणार्थ मिसो रोबोटिक्स या कंपनीने रोबोटिक किचन असिस्टण्ट बनवलाय की जो एकसारखे अनेक ‘बर्गर’ बनवण्याचं काम करेल. अशा अनेक कंपन्या अमेरिकेत आहेत. उदा. कॅफे एक्स किंवा झेम पिझ्झा. नुसतं अन्नपदार्थ तयार करण्यासाठी इंडस्ट्री ४.० चा वापर नव्हे, तर अमेरिका आणि युरोपमध्ये ते अन्नपदार्थ उपाहारगृहात सर्व्ह करायलासुद्धा इंडस्ट्री ४.० चे दूत रोबोट्स वापरले जात आहेत.
परत तुम्हाला असं वाटायला नको की हे सर्व फक्त युरोप-अमेरिकेत होत आहे. हे लोण चीनमध्ये २००६ सालीच येऊन पोहोचले आहे. सूझाओ, थिऊ आणि हेफेई या शहरांमध्येसुद्धा रेस्टॉरंट्समध्ये रोबोट्सद्वारे सर्व्हिस दिली जाते आहे. १५०० डॉलर्स (म्हणजे एक लाख रुपये) मध्ये हे रोबोट मिळतात. त्यामुळे चीनमध्ये रेस्टॉरंट्सचे मालक म्हणताहेत की अन्नपदार्थ सर्व्ह करायला वेटर्स म्हणजे माणसं ठेवण्यापेक्षा रोबोट बरे! वेटर्सच्या ५-६ महिन्यांच्या पगारामध्येच हे एक लाख रुपये केव्हाच वसूल होतात. आणि मग पुढे फायदाच फायदा!
मित्रांनो, अमेरिका-युरोपातील हे फॅड म्हणून किंवा चीनमधील काहीतरी गंमत- जंमत म्हणून गाफील राहू नका! आपल्याकडे हे येणार नाही म्हणता म्हणता ते येऊन पोहचलंय. मागील महिन्यातच चेन्नईमध्ये ‘मोमो’ नावाच्या रेस्टॉरंटमध्ये पदार्थ सर्व्ह करण्याचं काम वेटर्स नाही तर रोबोट्स करू लागलेत.
नीट वाचलंत ना?
चेन्नई काही तसं लांब नाही..


(लेखक संगणकतज्ज्ञ आहेत.)
 

Web Title: Order please ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.