आज मराठी राजभाषा दिन. त्यानिमित्त एक विशेष चर्चा,
मराठीच्या ‘सोशल’ होण्याची..
 
भाषेचा अभिमान असतो आपल्याला?
अमृतातही पैंजा जिंकी वगैरे सुभाषितं
आपण येताजाता ऐकवतो,
तेव्हा खरंच नक्की 
कशाचा अभिमान वाटतो आपल्याला?
नव्या जगात, नव्या सोशल मीडियात,
नव्या ऑनलाइन जगात,
नव्या ट्रेडिंग स्पॉट्सच्या ट्विटर 
हॅशटॅगच्या गर्दीत आपली भाषा
घेऊन आपण जातोय,
किंवा जायला हवं,
असं वाटतं आपल्याला?
आणि समजा, वाटतं असेल तर
आपण काय करतो?
- शासनाच्या धोरणावर टीका!!
पण त्यापलीकडे आपण जे करू शकतो,
ते तरी करतोय का आपण?
 
तुम्ही स्वत:च 
स्वत:चं
करिअर बरबाद करायला
निघाला आहात!
आता कुणीही हिंदीत ट्विट करू शकतं,
हे माहितीये तुम्हाला?
आणि हिंदीत म्हणजे खरंतर देवनागरी लिपीत!
म्हणजेच हिंदीत जर ट्विट करता येत असेल
तर मराठीतही ट्विट करता येईल!
गुगलनं अॅण्ड्रॉईड फोनसाठी नुकताच एक हिंदी इनपूट कीबोर्ड लॉँच केलाय!
इंग्रजी फोनेटिक वापरून, म्हणजे इंग्रजीत टाइप करून
हिंदीत लिहायची ही सुविधा.
गुगलनेच एक इंडियन लॅँग्वेज इंटरनेट अलायन्स
नावाची एक योजनाही आणली.
हिंदीसह भारतीय भाषांमधे लिहिता यावं आणि जे लिहिलं जाईल 
तो कण्टेण्ट सहज उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न सुरू केले.
भाषा विषयात काम करणा:या संस्थांसह सरकारनंही यात सहभागी होत,
हिंदीत सर्व माहिती उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न सुरू केले.
हिंदींतले हॅशटॅग ही सोशल मीडियावरची सर्वात मोठी 
आणि महत्त्वाची घटना आजच्या घडीला मानली जात आहे.
हिंदी हॅशटॅग ट्रेडिंग उत्तम आहे.
हिंदीच्या खालोखाल भारतात
तमिळ हॅशटॅग हे सर्वाधिक ट्रेड होताना दिसत आहे.
 
गेल्याच महिन्यात ट्विटरने
इंग्रजी ट्विट्सचे
हिंदी आणि उर्दू भाषेत अनुवाद देण्याची सुविधा सुरू केली आहे.
‘बिंग’च्या मदतीनं हे अनुवाद उपलब्ध करून दिले जात आहेत.
ट्विटरवर हिंदी, बंगाली, तमिळ आणि तेलगू हे हॅशटॅग
सध्या तरुण जगात अत्यंत चर्चेचा विषय आहे.
 
या सा:या चर्चेत मराठी कुठं आहे?
खरंतर हिंदी आणि मराठीची लिपी एक असल्यानं
हिंदीसाठी उपलब्ध की-बोर्ड वापरूनही
ऑनलाइन जगात, सोशल मीडियाच्या पोस्टसाठी,
मराठीत, देवनागरी लिपीत उत्तम लिहिता येऊ शकतं.
मातृभाषेत व्यक्त होता येऊ शकतं!
पण तरी ते होत नाही,
इंग्रजीत मराठी असं आपण लिहितो.
असं का?
 
असं होतं कारण,
नव्या जगात, नव्या तंत्रज्ञानाच्या
सहाय्यानं
आपल्या भाषेत
कसं व्यक्त व्हायचं?
कम्प्युटरवर, सोशल मीडियात,
मोबाइलवर-व्हॉट्स अॅपवर
मराठीत कसं लिहायचं?
हेच आपल्याला माहिती नाही.
आपल्या भाषेत आपण माहिती निर्माण
अर्थात कण्टेण्ट जनरेटच करायला तयार नाही,
असं झालं तर?
नुस्तं ‘गर्व आहे मला’
अशा फुकाच्या घोषणांचा काय उपयोग?
त्यापेक्षा नवीन गोष्टी शिकून
मराठीत बोलण-लिहिणं-व्यक्त होणं
जास्त मोलाचं ठरावं.
त्यासाठीच पान उलटा.
 
 

Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.