The love story of England's princess | इंग्लंडच्या राजपुत्राची लव्हस्टोरी
इंग्लंडच्या राजपुत्राची लव्हस्टोरी

- निळू दामले
हॅरीचं लग्न ठरलंय, म्हणजे त्यानंच ठरवलंय. लग्न ठरवण्याची राजघराण्याची परंपरा अशी की, राणी सोयरीक ठरवते. म्हणजे तोलामोलाची एखाद्या देशाची राजकन्या राणी शोधतात. सध्या ब्रुनेई आणि जॉर्डनमध्ये राजेशाही आहे. पण तिथले राजे मुसलमान आहेत. आफ्रिकेत काही राजे आहेत; पण ते काळे आहेत. रहाता रहातो स्पेन किवा न्यूझीलंडचा राजा. म्हणजे गोºया राणीला निवड करायला अगदीच कमी वाव. पण अलीकडं भानगड अशी आहे की राजपुत्र राणीला, राजाला विचारतच नाहीत. ते आपल्या प्रिय व्यक्तीला निवडतात. राजपुत्र कोणातरी मुलीच्या प्रेमात आहेत, तशी कुणकुण त्यांना लागलेली असते. पण राजपुत्र एकदम जाहीर करून टाकतात की, अमुक एक मुलगी निवडलीय. हॅरीनंही तेच केलं. कॅलिफोर्नियातल्या एका आफ्रिकन लोकांच्या वस्तीतल्या, टोळी हिंसेसाठी प्रसिद्ध असलेल्या उपनगरातल्या एका मुलीशी आपण लग्न करणार आहोत असं हॅरीनं पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. एक मोठी दृश्य मुलाखत त्यानं दिली. परस्पर. राणी एलिझाबेथ, राजपुत्र चार्ल्स यांनी आनंद व्यक्त केला. बस. तेवढंच त्यांच्या हाती होतं.
वधू आहे मेगन मर्कल. तिची आई आफ्रिकन आणि वडील गोरे फ्रेंच. मेगन आफ्रिकन दिसते. ओबामांचे वडील आफ्रिकन होते आणि आई गोरी अमेरिकन. ओबामा काळे दिसतात. मेगन टीव्ही मालिकांत अभिनय करते. मेगन तिच्या आईसोबत रहाते, तिच्या वडिलांचा घटस्फोट झाल्यापासून. खुद्द मेगनचाही एक घटस्फोट झाला आहे. मेगन चार पाच वर्षांपूर्वी एका कार्यक्र मासाठी बोटस्वानामध्ये गेली असताना तिची हॅरीशी भेट झाली आणि दोघांनी डेटिंग सुरू केलं.
हॅरी १२ वर्षांचे असताना डायनांचा अपघाती मृत्यू झाला. वडील चार्ल्स आणि आई डायनांच्या संबंधांवर जाहीर चर्चा झाल्या. राजघराण्यानं त्या साºयावर पांघरूण घातलं तरी सगळ्या गोष्टी समाजासमोर आल्या. आज्जी, वडील यांच्या संसारातले तणाव हॅरीनं पाहिले असल्यानं त्याचं बालपण कोळपलं होतं.
डायना आणि तिची दोन्ही मुलं यांच्यात फार जिव्हाळा होता. पोरांचा बापावर रागच होता. आईच्या अपघाती मृत्यूतून मुलं सावरली नाहीत. मोठा विल्यम त्या मानानं सावरला. त्यानं राजघराण्याचा चेहरा सांभाळला आणि हॅरीला सावरण्याचा प्रयत्न केला. हॅरीला मानसिक उपचार करून घेण्यासाठी त्यानं राजी केलं. त्याचा बोभाटा झाला. राजपुत्र आणि मनोरोगी म्हणजे वृत्तपत्रांना प्रचंड खाऊ. हॅरीचा एक खापर खापर पणजोबा राजा मनोरोगी झाला होता. राणी, राजपुत्र यांना सत्ता हवी होती, त्या साठमारीचा परिणाम म्हणून राजा मनोरोगी झाला होता.
राजा असो की राजपुत्र. शेवटी ती माणसंच तर असतात. आपल्या आईला बापानं वाईट वागवलं हा सल हॅरीला दूर करता आला नाही. आता लग्नात वधूच्या बोटात घालण्यासाठी तयार केलेल्या अंगठीमध्ये हॅरीनं डायनाच्या दागिन्यातले हिरे वापरले आहेत. आपली आई सदैव आपल्यासोबत असावी असं वाटलं म्हणून ते हिरे अंगठीत घातलेत असं त्यानं पत्रकार परिषदेत सांगितलं. बापाची नव्हे, आईची आठवण.
ओठ घट्ट दाबून जगायचं ही राजघराण्याची परंपरा असल्यानं हॅरी गप्प होता, आतून धुमसत होता. जितकं जमेल तितकं तो बकिंगहॅम राजवाड्यापासून दूर रहात असे. दारूच्या नशेत स्वत:ला बुडवत असे. राजपुत्र असूनही तो पायलट झाला आणि सामान्य सैनिकाप्रमाणं अफगाणिस्तानातल्या लढाईत उतरला.
आधीच ब्रिटन, त्यातून राजघराणं, त्यामुळं पृथ्वीतलावरील प्रत्येक व्यक्तीचं स्थान आणि पायरी पाहून त्या व्यक्तीशी कसं वागायचं ते ठरवलं जातं. वरच्या पायरीवरच्या माणसाकडं आदरानं पाहिलं जातं, अर्धी पायरी खाली असलेलीही व्यक्ती असली तर खडूस तोडांनं तिच्याकडं पाहिलं जातं. पायरीनुसार पद आणि किताब. वधू राजघराण्यातली तर नाहीच, उलट अगदीच सामान्य घराण्यातली काळी मुलगी आहे. ती चर्च आॅफ इंग्लंडची सदस्य नाही. ती तोलामोलाची असती तर तिला प्रिन्सेस म्हणजे राजकन्या असा किताब मिळाला असता. तिला बहुदा कुठली तरी डचेस करण्यात येईल; पण रॉयल हायनेस असं संबोधलं जाईल.
हॅरीचे वडील राजपुत्र चार्ल्स यांनी डायनाशी लग्न केलं होतं. राजपुत्र चार्ल्सचे कॅमिला पार्कर या अमेरिकन स्त्रीशी प्रेमसंबंध होते. त्यामुळं डायनाशी त्यांनी तणावातच संसार केला.
वधू मेगन मर्कल ही थेट सामान्य कर्तृत्ववान स्त्री आहे. संघर्ष करत करत तिनं स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. माध्यमांतले जाणकार तिच्या सूट या मालिकेतल्या भूमिकेचं कौतुक करतात. आपल्याला आवडलेल्या एका माणसाशी आपण लग्न करतोय अशा अगदीच मानवी मन:स्थितीत ती आहे, तिला नवल वाटतंय, आनंद होतोय. हॅरीपेक्षा आपण तीन वर्षांनी मोठे आहोत याचं काही वाटत नाही. प्रेमात पडल्यावर कसलं वय अन् कसलं काय !
मेगन रीतसर आपल्या आजेसासूला भेटायला लंडनला गेली. राणी एलिझाबेथची पहिली भेट झाली तेव्हा राणीसोबत दोन कॉर्गी कुत्री होती. राणीची फार आवडती, राणीसोबत सतत वावरणारी. ही कुत्री फार तिखट आहेत. परकं कोणी आलं की भुंकून, अंगावर धावून हैराण करतात. हॅरीशी त्यांची कधीच दोस्ती होऊ शकलेली नाही. पण मेगनशी मात्र त्या दोघांची दोस्ती झाली, दोघंही मेगनच्या भोवती घोटाळत राहिले. एलिझाबेथ आतून सुखावल्या असतील. कदाचित.
एलिझाबेथ ९१ वर्षांच्या आहेत. १९५२ पासून त्यांनी राजवाडा आणि ब्रिटिश समाज अनुभवला आहे. आई, काका, काकू, आज्जी, बहीण, पंतप्रधान, नोकरशाही यांच्यातले तणाव एलिझाबेथनी अगदी बालपणात असल्यापासून अनुभवले आहेत. हे सारं डोळ्यासमोर तरळत असताना हॅरी त्याच्या अमेरिकन काळ्या पत्नीला घेऊन समोर बसला होता. एलिझाबेथना काय वाटलं असेल?
आज्जीबद्दल हॅरीला ममत्व आहे की नाही? एलिझाबेथनी कधीही कशाचीही वाच्यता केली नाही. चर्चिल आणि एलिझाबेथ यांच्यात संघर्ष असतानाही त्या कधी बोलल्या नाहीत. त्यामुळं हॅरी आणि त्याचं लग्न या बद्दल काय वाटतंय ते एलिझाबेथ बोलणार नाहीत. पण एक नक्की घडलं असेल. ते सॉलिड हृद्य आणि नाट्यमय असणार.
तर असा हॅरी. त्याची मैत्रीण मेगन. मे महिन्यात लग्न करणार आहेत. कधी काळी फोटोग्राफीचा शोध लागला तेव्हा तत्कालीन राजानं लग्नप्रसंगाचे फोटो काढले होते आणि त्यात त्या काळाच्या फॅशननुसार राणीनं राजाच्या खांद्यावर हलकासा हात ठेवला होता. त्यावर ब्रिटिश माणसं आणि राजघराणं जाम खवळलं होतं. आता हॅरी आणि मेगन एकमेकांच्या कंबरेभोवती हात लपेटून फिरताना काढलेले फोटो प्रसिद्ध झाले आहेत. पण आता जनता खवळलेली नाही. जनतेला मजा येतेय. जनतेला हा राजपुत्र आपल्यातला वाटतोय. तो पोरकटपणे वागला, त्यानं दारू पिऊन धमाल उडवली हे लोकांना माहीत असलं तरीही हॅरीबद्दल जनतेला आपलेपणा वाटतोय. लोक त्याला समजून घेताहेत. लोकांना तो आपल्यातला वाटतोय.
राजघराणं असावं की नाही, थाटामाटात लग्न करावं की नाही यावर विचारवंत मंडळी चर्चा घुसळत आहेत. ब्रिटिश जनता म्हणतेय की, सध्याच्या बिकट आर्थिक राजकीय स्थितीत राजपुत्राचं लगीन हा एक छान विरंगुळा आहे. ब्रिटिश माणसं म्हणत आहेत, कम आॅन, लेट अस एंजॉय!

( लेखक आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास असणारे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
 


Web Title: The love story of England's princess
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.

प्रमोटेड बातम्या

प्रमोटेड बातम्या

ऑक्सिजन अधिक बातम्या

खेलो इंडिया! तळातल्या ‘टॅलेण्ट’ला मिळालेला हा बळकट हात

खेलो इंडिया! तळातल्या ‘टॅलेण्ट’ला मिळालेला हा बळकट हात

11 hours ago

युवा करें, तो करें क्या?

युवा करें, तो करें क्या?

11 hours ago

नोकरी सोडून भाजी विकण्याचं वेड!

नोकरी सोडून भाजी विकण्याचं वेड!

12 hours ago

सायकलिंग!- तरुण जगात का बनतंय नवं ग्लॅमरस स्टाईल स्टेटमेण्ट?

सायकलिंग!- तरुण जगात का बनतंय नवं ग्लॅमरस स्टाईल स्टेटमेण्ट?

6 days ago

आकाशातून समुद्रात! 'हे' असं सगळं करायची विलक्षण क्रेझ उफाळली आहे!

आकाशातून समुद्रात! 'हे' असं सगळं करायची विलक्षण क्रेझ उफाळली आहे!

6 days ago

कष्ट मागणार्‍या, परीक्षा पाहणार्‍या आणि तरीही वेडी चटक लावणार्‍या जगात..

कष्ट मागणार्‍या, परीक्षा पाहणार्‍या आणि तरीही वेडी चटक लावणार्‍या जगात..

6 days ago