दिल्लीतली स्वप्नांचे गॅस चेंबर्स- स्पर्धा परीक्षांच्या जगातलं गुदमरवून टाकणारं चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 05:11 PM2018-10-25T17:11:18+5:302018-10-25T17:15:27+5:30

यूपीएससी क्रॅक करण्याच्या ध्यासानं झपाटून तारु ण्य जाळणार्‍या मुलामुलींच्या आयुष्याची दिल्लीच्या कुबट, गजबजत्या गल्ल्यांमध्ये कोंबून भरलेली गुदमरवणारी चित्तरकथा.

Lokmat deepotsav 2018 - an exclusive report from Delhi's UPSC world | दिल्लीतली स्वप्नांचे गॅस चेंबर्स- स्पर्धा परीक्षांच्या जगातलं गुदमरवून टाकणारं चित्र

दिल्लीतली स्वप्नांचे गॅस चेंबर्स- स्पर्धा परीक्षांच्या जगातलं गुदमरवून टाकणारं चित्र

ठळक मुद्देदीपोत्सव 2018 यावर्षीच्या दिवाळी अंकात वाचा हा विशेष लेख

- शर्मिष्ठा भोसले

‘यावर्षी शेवटचा अटेम्प्ट ! काये ना, उम्मीद पे दुनिया कायम है.. आपण काय इतकेपन गयेगुजरे नाही गं. त्या सिद्धय़ाचं झालं ना. पीएसआय म्हणून गावात मिरवणूक काढली त्याची. काय येत होतं कॉलेजात त्याला?’
- असं सांगणारा गावाकडचा एक मित्न अजूनही पुण्यातल्या पेठेतल्या गल्लीत भेटतो. त्याला बघितल्यावर मलाच दडपण येतं. त्याची देहबोली, बोलणं आणि नजरेतला चमकदार ‘हम होंगे कामयाब एक दिन’वाला आशावाद. भीती वाटते त्याच्या आशावादी असण्याची. गावाकडं त्याची जेमतेम असलेली परिस्थिती आठवून कधी चिडायला होतं त्याच्यावर, कधी त्याच्याविषयी उगाच वाईट वाटतं.
या मित्नाचं नाव, गाव या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. कारण तो त्याच्यासारखाच एकटा नाही. तसे खूप जण, खूप जणी आहेत. काय करतोय?
‘सध्या स्पर्धा परीक्षा करतोय’ असं उत्तर स्वतर्‍ला आणि समोरच्याला सांगणारे हे जीव. पेठेतल्या त्यांच्या प्राचीन रूम्समध्ये लपलेल्या ढेकणांइतक्याच चिवटपणे अटेम्प्टवर अटेम्प्ट देत राहतात.
जे चित्र पुण्यात तेच दिल्लीत, तिथं तर गर्दी जास्त. चलो दिल्ली म्हणणार्‍यांचं हे जग शोधत दिल्ली गाठली.
दिल्लीतल्या यूपीएससीवाल्यांचं जग पाहत निघाले.
प्रदेश नवा होता, भाषा वेगळ्या होत्या. 
पण तीच धग, तीच ऊर्जा, स्पर्धेत जिंकण्याची तीच ईष्र्या आणि हरल्यावरची तीच तीव्र निराशा.. 
या मुलांचं जग मला ओळखीचं वाटत होतं. एकेकाळी पुणे विद्यापीठात पत्नकारितेचं शिक्षण घेताना मी कॅम्पसच्या हॉस्टेलमध्ये राहायचे. तिथं अनेक मैत्रिणी होत्या, ज्या नावाला एखाद्या विभागात मास्टर्ससाठी प्रवेश घेऊन होत्या. बाकी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात रात्नंदिवस बुडालेल्या असायच्या. मास्टर्सला प्रवेश घेतला की हॉस्टेल मध्ये राहता यायचं, म्हणून त्या मास्टरच्या डिग्रीचा टीळा लावून घ्यायचा.
पाली भाषेचा विभाग तर अशा जुगाडसाठी सगळ्यात लोकप्रिय होता. ज्यांना असे जुगाड जमत नाहीत अशा काहीजणी रेक्टरच्या नकळत पॅरासाइट बनून कुणाकुणाच्या रूमवर चोरून राहायच्या. त्यातल्याही बहुतेकजणी स्पर्धा परीक्षावाल्या. 
मुलांच्या हॉस्टेलला तर सगळा सावळा गोंधळ. मुलं वर्षानुवर्ष बेमालूमपणे पॅरासाइट बनून जगायची तिकडं. कधी धाड पडली की पटापटा गेट-भिंतीवरून उडय़ा टाकत एका रात्नीसाठी गायब व्हायची. हॉस्टेलवर राहणारे मित्न स्पर्धा परीक्षावाल्यांच्या सुरस कथा ऐकवायचे. कोण कसे नाइट आउट्स मारतो, कोणाला कसा तंबाखूशिवाय अभ्यासच होत नाही, आणि कोण कसा चेन स्मोकर बनलाय. कोण कुणाच्या डब्यात वर्षानुवर्ष जेवतो. कोण कशा बढाया मारतो आणि काय काय. 


मुलांचं हे असं तर मुलींच्या डोक्यात भलताच किडा. आता दिलेला अटेम्प्ट आणि पुढचा अटेम्प्ट यादरम्यान घरचे लग्न ठरवतील की काय हे ते दडपण. त्यात या सगळ्या मुली निमशहरी किंवा ग्रामीण भागातल्या. यासंदर्भानं बहुतांश किस्से नकारात्मक असले तरी एक अपवादात्मक फील गुड किस्सा आहे. माझ्या ओळखीतली एक मराठवाडय़ातली मैत्नीण आहे. बाविशीची. हुशार आहे. दोनेक वर्षापासून जिल्ह्याच्या ठिकाणी राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करते. गावाकडं घरी मुलं बघणं सुरूच होतं. हिला गावी जाणं नकोसं झालेलं. घरीही नातेवाईक काय काय मेलोड्रॅमॅटिक बोलून तणाव वाढवायचे. वडील शेवटी निर्वाणीचं बोलले, की ‘यावेळचा अटेम्प्ट शेवटचा. आता नाही झालं तर लग्न करून पुढे सासरी जाऊन अभ्यास कर.’ तितक्यात गावातली एक मुलगी एमपीएससीतून एसटीआय म्हणून सिलेक्ट झाली. तिचा ग्रामपंचायतीनं सत्कार ठेवला. तिचं भाषण झालं. ती ‘घरच्यांनी लग्नाचं दडपण न आणल्यानंच मी अभ्यासावर नीट लक्ष देऊ शकले.’ असं बोलली. 
झालं ! ते भाषण ऐकून मैत्रिणीचे वडील घरी आले. ‘आपल्या पोरीमागं लग्नाचा तगादा न लावता तिला पुढची काही र्वष नीट परीक्षा देऊ देणार’, असं त्यांनी जाहीर केलं. पण हा किस्सा नियम नाही, अपवाद आहे.
पालक असे चांगलं वागायला जातातही; पण तरी स्वतर्‍ला विचारावंच लागतं, मी किती वर्षे देणार अटेम्प्ट?
बाकीच्यांचं कशाला, मी स्वतर्‍ पुण्यात एका अकॅडमीत स्पर्धा परीक्षा क्लास लावला होता. काही महिन्यात जाणवलं, ‘हे आपल्यासाठी नाही, आपणही याच्यासाठी नाही.’ तोवर मात्र स्टडी रूम्स, क्लासेस, चहा-पोह्याचे अड्डे आणि मैत्रिणींच्या कोंदट कप्प्यांसारख्या खोल्या जवळून अनुभवल्या. 
एक मित्न नेहमी त्याचा सिग्निचर शेर ऐकवायचा, 
‘कहते है जिंदगी इम्तिहान लेती है, 
इधरतो एक इम्तीहानही हमारी जिंदगी ले रहा है!’
हे असं माझं पुण्यातलं अनुभवांचं संचित सोबत होतंच आणि दिल्लीत गेले तर तिथल्या यूपीएससीच्या भल्या मोठय़ा जगात मला काय काय नाही भेटलं.
 मेसवाले, अभ्यासिका-रूमवाले, त्यांचे फिक्सर वगैरे भेटले तसा ज्योतिषीही भेटला. 
‘कुणाला कुठल्या वर्षी कुठली पोस्ट मिळणार’ हे सांगणारा. स्पर्धा परीक्षेच्या जगात भरून राहिलेल्या असुरक्षितता आणि अनिश्चिततेचं प्रतीक म्हणजे हा ज्योतिषी. त्याच्या व्यवसायाचं अर्थकारणच त्यावर तरलेलं.
त्या गर्दीत मला जे जे दिसलं, जी अटेम्टवाली मुलं भेटली, बाजारपेठ उकलली त्याचं चित्र म्हणजे हा दीपोत्सवमधला लेख आहे.
स्पर्धा परीक्षा करतोय असं म्हणणार्‍या प्रत्येकाला त्यात ओळखीचं काही सापडेल. 
पण बाकी सन्नाटा.
काही न बोलण्याच्या गोष्टी.
ते न बोलणारे कुणीकुणी फक्त जाहिरात निघण्याची वाट पाहत राहतात.
काही परीक्षा देऊन आणि मुलाखतीच्या चाळणीतून पडलेच खाली तर पोस्टिंग मिळण्याची वाट बघत बसतात.
काही अटेम्प्टकर आता परत जायला नको वाटतं आणि राहत्या जागी जिवाची घुसमट थांबत नाही असं म्हणत घुसमटत राहतात.
काहींचा तर राग-चीड-रग सगळंच विझून गेलंय डोळ्यातलं. स्पर्धा परीक्षावाल्या पोरांच्या आंदोलनं-मोर्चात जायलाही त्यांना नको वाटतं आता. 
हे त्यांचं जग म्हणजे स्वपAांचं गॅस चेंबर आहे.
दिल्लीतल्या कुबट गल्ल्यांमध्ये चला, एक गुदमरून टाकणारी कहाणी तुमची वाट पाहतेय...
****

वाचा लोकमत दीपोत्सव 2018 />अंक नव्हे, उत्सव!!

* पाने 256 * मूल्य 200 रुपये * प्रसिद्धी दिवाळीच्या आधी 
* ऑनलाइन नोंदणी/खरेदी : 
deepotsav.lokmat.com
* फोन बुकिंग - एसएमएस / व्हॉट्सअ‍ॅप-8425814112
* अधिक माहिती - स्थानिक लोकमत कार्यालय, लोकमत वृत्तपत्र विक्रेते
* इ-मेल : deepotsav.lokmat.com

 

Web Title: Lokmat deepotsav 2018 - an exclusive report from Delhi's UPSC world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.