दुनियेची कहाणी फुटबॉल की जुबानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 04:10 PM2018-07-26T16:10:35+5:302018-07-26T16:10:41+5:30

फुटबॉल आणि राजकारण फुटबॉल आणि वंशभेद फुटबॉल आणि मानवी जगण्यातले गुंते हे सारं समजून घ्यायचंय?

how soccer explains the world - a must read book | दुनियेची कहाणी फुटबॉल की जुबानी

दुनियेची कहाणी फुटबॉल की जुबानी

Next
ठळक मुद्देहे पुस्तक आणि सिनेमा, आपल्या ‘मस्ट’ लिस्टमध्ये अ‍ॅड करून टाका.

- प्रज्ञा शिदोरे

नुकताच रशियामध्ये फुटबॉल वल्र्डकप झाला. फायनलर्पयत आपण तो रोमांच अनुभवला. पण कधी विचार केलाय की फुटबॉल हा खेळ एवढा प्रसिद्ध का आणि कसा झाला? आणि त्याच्या प्रसिद्धीचा परिणाम काय?   
फुटबॉल असा कदाचित एकमेव सांघिक खेळ आहे की जो 200 च्या आसपास देशांमध्ये खेळला जातो. खेळ असल्याने अर्थातच तो नियमांमध्ये बांधलेला आहे. पण इतर खेळांच्या तुलनेत, कमीत कमी वस्तू घेऊन खेळता येण्याजोगा आहे. त्यामुळे कदाचित हा एवढा लोकप्रिय झाला असावा.  (अर्थात हे म्हणणं माझं नाही, तर नॅशनल जिओग्राफिकने जून 2006 मध्ये याच विषयावर विशेष अंक प्रसिद्ध केला होता, त्यांचं म्हणणं आहे!) 
याच विषयावर फ्रॅँकलिन फॉयर यांनी ‘हाऊ सॉकर एक्स्प्लेन्स द वल्र्ड’ नावाचं पुस्तक लिहिलं. यामध्ये त्यांनी देशोदेशी खेळाला जाणारा खेळ, त्यामुळे तयार झालेले आणि काही सुटलेले प्रश्न, फुटबॉल फॅन्सची मानसिकता असे अनेक विषय हाताळले आहेत. या सगळ्यांचा विचार करताना फुटबॉल आणि जागतिकीकरण यामधल्या संबंधांवरही त्यांनी भाष्य केलं आहे. 
वल्र्डकप फुटबॉलच्या आठवणीत वाचायलाच हवं असं हे पुस्तक. याबरोबरच फुटबॉलबद्दल नाही पण ज्याला आपण ‘अमेरिकन फुटबॉल’ म्हणतो अशा खेळाबद्दलचा एक चित्नपट आहे - क्लिंट इस्टवूडचा ‘इन्व्हिक्ट्स’. (यामध्ये मॉर्गन फ्रीमन आणि मॅट डेमन यांचं काम अप्रतिम आहे). मला सर्वात आवडलेल्या चित्नपटांपैकी एक!
यामध्ये नेल्सन मंडेला यांनी या खेळाच्या निमित्तानं दक्षिण आफ्रिकेमधला वर्णभेदाचा विषय कसा हाताळला हे दाखवलं आहे. हा चित्नपट नक्की नेल्सन मंडेलांबद्दल आहे, फुटबॉल या खेळाबद्दल की वर्णभेदाबद्दल, हे तुम्ही चित्नपट बघूनच ठरवा! फुटबॉलच्या पलीकडे फुटबॉलसह जाणारं हे पुस्तक आणि सिनेमा, आपल्या ‘मस्ट’ लिस्टमध्ये अ‍ॅड करून टाका.

 

    
 

Web Title: how soccer explains the world - a must read book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.