- आकाश भोर
 
‘झुंज दुष्काळाशी’ या मोहिमेचा मी समन्वयक. या कामाच्या निमित्ताने पाणीप्रश्नावर काम करणा:या संस्थांसोबत काम करायचं ठरवलं.  
मी पी. साईनाथ यांची नीरोज गेस्ट्स ही डॉक्युमेण्टरी पाहिली आणि खूपच अस्वस्थ झालो. माङया आजूबाजूला एवढं सगळं सुरू आहे आणि मला याची काहीच माहिती नाही, याचं वाईट वाटलं. त्यामुळे जेव्हा ‘झुंज दुष्काळाशी’ या उपक्रमाबद्दल समजलं, तेव्हा त्याच्या कामात लगेच सहभागी झालो.
दुष्काळ हा इतर नैसर्गिक आपत्तींपेक्षा निराळा आहे. भूकंप, त्सुनामी यामुळे कमी काळात प्रचंड नुकसान होतं. मोठय़ा प्रमाणात जीवितहानीही होते आणि आर्थिक नुकसानही होते. दुष्काळाचं मात्र असं नाही. प्रत्यक्ष जीवितहानी कमी असली, तरी शेती-गुरे यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे स्थलांतर होतं. आर्थिक घडी विस्कटते. आरोग्य-शिक्षण यावरदेखील परिणाम होतो. त्यातून निर्माण होणा:या सामाजिक-कौटुंबिक समस्यादेखील तितक्याच भयानक आहेत हे मला याच प्रवासात समजलं.
सध्याचा दुष्काळ 1972 च्या दुष्काळापेक्षा वेगळा आहे. तेव्हा 2-3 वर्षे पाऊसच कमी पडला होता. यावेळी मात्र तसे नाही. पाऊस पडलाय, पण आपण पाण्याचं  व्यवस्थित नियोजन न केल्याने ही वेळ आली आहे. हा दुष्काळ मानवनिर्मित आहे. नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरीमध्ये 23क्क् मिमी पाऊस पडूनही आयाबायांना पाण्यासाठी रोज पायपीट करावी लागते. दुष्काळ निवारणासाठी, सिंचनासाठी मोठी धरणो, बंधारे, कालवे बांधले गेले. पण महाराष्ट्रातील फक्त 18 टक्के शेती याद्वारे केली जाते. बाकीच्या शेतीसाठी पावसाचं पाणी आणि भूजलाचा वापर केला जातो. गेल्या काही वर्षांत भूजलाचा प्रचंड उपसा झालाय. सरकारने बोअरसाठी 2क्क् फूट ही मर्यादा घालून दिली आहे. पण ती कोणी पाळताना दिसत नाही. काही ठिकाणी भूजल पातळी एक हजार फूट एवढी खोल गेली आहे. 
वाहून जाणारे पावसाचे पाणी मातीपण वाहून नेते. एक इंच मातीचा थर तयार व्हायला हजारो वर्षे लागतात. भूजल पातळी उंचावण्यासाठी तसेच मृद्संधारण आणि पाणलोट विकासासाठी माथा ते पायथा करायच्या उपचारांची माहिती मला या कामात मिळाली. कडवंची पाणलोट क्षेत्रला भेट दिली. तिथल्या शेतक:यांशी गप्पा मारल्या. 8क्क्-1क्क्क् मिमी पाऊस पडणा:या कडवंचीत पाणलोटच्या कामामुळे झालेला बदल थक्क करणारा होता. या पाणलोट क्षेत्रचं नियोजन कसं करावं याविषयी जालन्याच्या कृषिविज्ञान केंद्रात प्रशिक्षण घेतलं.
नाशिकची प्रगती अभियान ही संस्था दुष्काळाच्या या प्रश्नावर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काम करते. जेणोकरून लोकांना त्यांच्या गावातच रोजगार उपलब्ध होऊन त्यांचे स्थलांतर थांबेल, तसेच यातून होणारी वैयक्तिक व सामुदायिक लाभाची 8क् टक्के कामे ही पाणलोटाची असतात. तिथे झालेल्या प्रशिक्षणामध्ये रोहयोसोबतच पंचायत राज व्यवस्था, जलयुक्त शिवार योजना, दुष्काळ आणि मीडिया तसेच संविधान आणि आपण या विषयांबद्दल अधिक जाणून घेता आलं. लोकांची रोजगार हमीबद्दलची  अपुरी आणि चुकीची माहिती, प्रशासनाची अनास्था, भ्रष्टाचार हे सारं या काळात फार जवळून अनुभवता आलं. एक नवीनच जग दिसलं. आणि आपण एरवी समजतो त्यापेक्षा स्थानिक प्रश्न निराळेच असतात हे लक्षात आलं. 
माङया कामाचा मुख्य उद्देश जरी दुष्काळ हा असला, तरी त्या निमित्ताने गावाची, गावातील इतर समस्यांशी झालेली ओळख झाली. शेतीबद्दल अधिक जाणून घेता  आलं. श्रमदान करणं हा फारच छान अनुभव होता. श्रमदानातून मन्याळी येथे आम्ही दोन अनघड दगडी बांध बांधले. या दोन महिन्यांत ब:याच ठिकाणी फिरणं झालं, अनेक लोकांशी ओळखी झाल्या. दुष्काळाचा प्रश्न अधिक व्यापकतेने समजला. 
प्रश्न पाहून उदास वाटलं, काळजी वाटली, अस्वस्थही झालो; पण  योग्य पद्धतीने लोकसहभागातून काम केलं तर भविष्यात येणारी संकटं टाळता येऊ शकतील, असा विश्वासदेखील मनाला वाटला.