इमोशनल इटिंग करताय?-सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 07:00 AM2018-09-20T07:00:00+5:302018-09-20T07:00:00+5:30

प्रेमभंग झालाय, स्ट्रेस आहे, उदास वाटतं आणि तुम्हाला खा खा सुटली आहे, मग समजा की, तुम्ही एका लाइफस्टाइल डिसऑर्डरचे बळी आहात.

Emotional Eating? beware of this lifestyle disease | इमोशनल इटिंग करताय?-सावधान

इमोशनल इटिंग करताय?-सावधान

Next
ठळक मुद्देगेल्या 15 वर्षात कर्नाटकात 15 ते 39 वर्षे वयात ज्या मुलांचा मृत्यू झाला त्यात 11.4 टक्के मृत्यू हे लाइफस्टाइल डिसऑर्डरने झालेले आहेत.

- निशांत महाजन

इमोशनल इटिंग हा शब्द गेलाय तुमच्या कानावरून? आपल्याला खूप लो वाटतंय, एकदम उदास, एकदम डिप्रेस्ट किंवा प्रेमभंगच झालाय तर मग खा काहीतरी गोड. चॉकलेट. आइस्क्रीम. वेफर्स असा मारा सुरू होतो. भावनेच्या भरात जरा अतीच खाल्लं जातं. त्याक्षणी भूक नसते; पण केवळ बरं वाटावं, मस्त वाटावं म्हणून खा खा सुरू होते. दुर्‍खात भूक जशी पळते तशी ही खा खा ही मागे लागते. आणि अतिखाणं सुरू होतं. तेच हे इमोशनल इटिंग. आपल्या लक्षातही येत नाही पण अलीकडच्या काळात, विशेषतर्‍ जंक फूड सहज उपलब्ध होऊ लागल्यापासून हे इमोशनल इटिंग फारच वाढत चाललं आहे. अगदी अलीकडच्या काळात विशेषतर्‍ अमेरिकन लाइफस्टाइलमध्ये हा शब्द सर्रास वापरला जायचा; पण म्हणता म्हणता हे प्रकरण आपल्याकडेही चांगलंच रूळलं. स्थिरावलं.
आपल्याला त्याक्षणी चांगलं वाटावं, सुख वाटावं म्हणून भरपूर साखर किंवा मीठ घातलेले, जिभेला मस्त वाटणारे पदार्थ एखादा किंवा एखादी खातच सुटतो. त्यातून वजन वाढतं, मग वाढत्या वजनानं पुन्हा निराश वाटतं. डाएटचे प्लॅन होतात; पण तेही बारगळतं. परिणाम काय तर हे इमोशनल इटिंग सुरूच राहतो. मन भरावं म्हणून जे खाणं होतं ते प्रत्यक्षात पोट भरत असतं आणि अकारण वजनाचे आकडे फुगायला लागतात.
त्या सार्‍याचा परिणाम आपल्या प्रकृतीवर वजन वाढीच्या पलीकडे होतो हे इतके दिवस आपल्या गावीही नव्हतं. म्हणजे अंदाज असेल; पण आकडेवारीचा सबळ पुरावा नव्हता. आता मात्र तो सबळ पुरावाही हातात आलेला आहे आणि मुख्य म्हणजे तो भारतातलाच आहे.
इंडिया स्टेट लेव्हल डिसीज बर्डन इनिशिएटिव्ह या उपक्रमांतर्गत एक अभ्यास अलीकडेच करण्यात आला. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, पब्लिक हेल्थ फाउण्डेशन ऑफ इंडिया, इन्स्टिटय़ूट फॉर हेल्थ मेट्रिक्स, युनिव्हर्सिटी वॉशिंग्टन यांनी संयुक्तरीत्या केलेला अभ्यास सांगतो की, भारतातही तरुण मुलांमध्ये इमोशनल इटिंगचं प्रमाण वाढतं आहे आणि त्यामुळे थेट दुष्परिणाम त्यांच्या जगण्यावर होत आहे.
त्याचाच एक पुरावा म्हणजे गेल्या 15 वर्षात कर्नाटकात 15 ते 39 वर्षे वयात ज्या मुलांचा मृत्यू झाला त्यात 11.4 टक्के मृत्यू हे लाइफस्टाइल डिसऑर्डरने झालेले आहेत. त्याच्या मुळाशी अन्य गोष्टींसह हे इमोशनल इटिंगही आहे. अचानक कार्डियाक अटॅक येणं, डिप्रेशन, मानसिक अस्वास्थ्य यासार्‍यानं मृत्यू ओढावलेले दिसतात. आणि अभ्यासकांचं म्हणणं आहे की, याविषयी वेळीच जागरुकता आली तर ही लाइफस्टाइल डिसऑर्डर टाळता येईल.
भावनिक अस्थैर्य, प्रेमभंग, नात्यात तणाव, झोप नीट नाही यातून हे इमोशनल इटिंग वाढतं आहे. वाढती वजन, व्यायाम नाही, जंक खाण्याचं प्रमाण, स्थानिक खाण्याकडे पाठ आणि सतत पॅक्ड फूड खाणं हा जिवाशी खेळ आहे, हे तरुणांनी समजून घ्यायला हवं असं हा अभ्यास सांगतो.
यानिमित्तानं आपणही आपल्या खाण्याचा विचार करून पाहू. ते हेल्दी आहे की इमोशनल.?
ठरवायला हवं.

 

Web Title: Emotional Eating? beware of this lifestyle disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.