मोबाइल अ‍ॅप्स

याविषयावर चर्चा करावी, बोलावं असं काही आता खरंच उरलं आहे का, असा प्रश्न पडावा इतके ते आम व्हावेत हेच खरं तर या वर्षाचं मोबाइल अ‍ॅपविषयीचं स्टेटमेण्ट. मोबाइल अ‍ॅप ढिगानं मुलं डाउनलोड करून घेतात, ती वापरतात. अगदी भाजी-किराणा ते सिनेमा ते फिटनेस ते व्हॉट्सअ‍ॅप सगळे अ‍ॅप्सच. यंदा या अ‍ॅपचा कचराच मोबाइलवर खूप साचला आणि अ‍ॅप्समध्ये काय नवीन आलं याच्या बातमीपेक्षाही या अ‍ॅपचं मॅनेजमेण्ट आणि अ‍ॅप मालवेअर हे अनेकांच्या काळजीचे, चर्चेचे विषय ठरले. त्यात नेमकं काय घडलं?

मोबाइल अ‍ॅप मालवेअर

अ‍ॅप्स तर भरपूर आले. पण कुठलीच आॅपरेटिंग सिस्टिम हमखास यशस्वी मालवेअरचा अर्थात, व्हायरसचा बंदोबस्त चोख करू शकलेली नाही. त्यामुळे आपला मोबाइल सतत अपटुडेट ठावणं, त्याचं व्हायरसपासून रक्षण करणं आणि त्यावर उत्तम स्पायवेअर किंवा अ‍ॅण्टिव्हायरस शोधणं हे एक मोठंच काम यंदा करावं लागलं. आउटडेटेड अ‍ॅप्स आपण हौशीनं डाउनलोड करून घेतलेले अनेक अ‍ॅप्स यंदा आउटडेटेडही झाले. त्यांचं काय करायचं, ते अनइस्टॉल केले तरी काही आॅफलाइन रन होत राहिले, त्या अ‍ॅपचं अनइस्टॉलेशन आणि त्यांचं मॅनेज करणं ही एक मोठी समस्या बनली.

डिकॉय अ‍ॅप

एक चर्चा अशीही झाली की, पोकेमॉन गो गाइडमध्ये आणखी ए ट्रोजन होतं. जे तुमच्या मोबाइलमधला कॉन्फिडेन्शिअल डाटा चोरून विकूही शकतं. हे डिकॉय अ‍ॅप अशा गोष्टींसाठी बनवलं गेलं. ते थर्ड पार्टी अ‍ॅप होतं, अनेकांनी ते वापरून आपापला डाटा सिक्युअर केल्याचं समाधान मानलं. बोगस अ‍ॅप स्टोअर्स अ‍ॅपल आणि गूगलच्या प्लेस्टोअरमधून आपण अनेकदा अ‍ॅप्स डाउनलोड करतो. मात्र हॅकर्सनी याचवर्षी असे अनेक आपल्याला कळणारही नाही असे बोगस अ‍ॅप स्टोअर्स तयार केले आणि त्यातून लोकांनी अ‍ॅप्स घेतले तेव्हा त्यांचा डाटा चोरीस गेला.

अ‍ॅप्स आणि परवानग्या

लोक फेसबुकवरही कसकसल्या टेस्ट घेतात. आणि त्या घेताना येस म्हणत आपल्या डाटाचा इतरांना स्वत:च्या नकळत अ‍ॅक्सेस देऊन टाकतात. हे अ‍ॅप्स मग आपला डाटा अ‍ॅक्सेस करतात. आणि त्यांना परवानग्या नाकारल्या तर आपण अ‍ॅपला मुकतो. त्यामुळे कुठलंही अ‍ॅप सुरक्षिततेची काळजी न घेता डाउनलोड करणं यंदा आणि पुढेही धोक्यांचंच ठरणार!

 

डाटाचं करायचं काय? फोनमधला, अ‍ॅप्समधला डाटा डिलीट करायला एक माणूस रोजंदारीवर ठेवावा लागेल, या गंभीर प्रश्नाचं उत्तर काही यंदा सापडलं नाही. कारण भरमसाट गोळा होणाऱ्या डाटाचं करायचं काय, या प्रश्नाचं उत्तर आजतरी कुणाकडेही नाही. डिलीट करायचं, हे उत्तर वेळखाऊ आहे हे नक्की!