तुम्ही पासवर्ड विसरता का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 06:00 AM2018-09-20T06:00:00+5:302018-09-20T06:00:00+5:30

सध्या दिवसाकाठी आपण किती पासवर्ड वापरतो, एकदा हिशेब लावून पहा. आणि मग ठरवा, ते लक्षात कसे ठेवणार?

Do you often forget password? | तुम्ही पासवर्ड विसरता का?

तुम्ही पासवर्ड विसरता का?

Next
ठळक मुद्देपासवर्ड कसे असू नयेत हे सगळेच सांगतात; पण कसे असावेत हे काही कुणी सांगत नाही.

- अनन्या भारद्वाज

आपण पासवर्ड का विसरतो? म्हणजे कशामुळे विसरतो? कितीदा विचारतो? नेहमी नेहमी फरगेट पासवर्ड करतो; पण तरीही नव्यानं केलेला पासवर्ड का लक्षात राहत नाही?
- हे प्रश्न काही एरव्ही जीवनमरणाचे नाहीत. पण नव्या डिजिटल काळात आपल्या पासवर्डच न आठवणं ही मोठी पंचाईत ठरू शकते. विशेषतर्‍ अनेकजण फोन लॉक करून ठेवतात. त्याला पासवर्ड ठेवतात. काहीजण थंब पासवर्ड, फिंगर प्रिण्ट, व्हाईस कमाण्ड असेही प्रयोग करतात.
मात्र अनेकदा ते फसतात. म्हणजे इतके फसतात की ते फोन अनलॉक करणं फार अवघड होतं. खटाटोप वाढतो आणि डोक्याला ताप होतो तो वेगळाच.
अजून एक दुसरा टप्पा म्हणजे आपले सोशल मीडिया अकाउण्ट. आपण तिथं अकाउण्ट उघडलं आणि पासवर्ड टाकला की त्या साइट्सच सांगतात की तुमचा पासवर्ड वीक आहे की स्ट्राँग. तो वीक आहे असं लक्षात आलं की आपण त्यावेळी भलभलती कॉम्बिनेशन्स वापरून तो स्ट्राँग करायला जातो. ते कॉम्बिनेशन कागदावर लिहूनही ठेवतो. पुन्हा लोक सांगतात, सुरक्षिततेची काळजी घ्या, सगळ्या सोशल मीडिया फोरमसाठी एकच एक पासवर्ड वापरू नका. मग आपण प्रत्येक साइटसाठी वेगळा पासवर्ड करतो. ऑनलाइन बुकिंगसाठी वेगळा पासवर्ड, ऑनलाइन शॉपिंग साइट्साठी वेगळा पासवर्ड, दोन-चार इमेल अकाउण्ट, ऑफिसचे अकाउण्ट्स त्यासाठी वेगळे पासवर्ड. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डचे वेगळे पासवर्ड. नुस्तं पासवर्डचं जंजाळ होऊन जातं. पुन्हा ते सिक्युअर्ड नेटवर्क नसेल तर कुठल्या साइटवर पासवर्ड सेव्हही करता येत नाहीत.
पुन्हा ते पासवर्ड स्ट्रॉँग हवेत. वीक केले आणि कुणी आपलं अकाउण्ट हॅक केलं की, मेलोच आपण (सोशली!). 
हे सगळं असं होत असताना डोक्याचा पार भुगा होतो आणि वाटतं काय काय लक्षात ठेवायचं?
पुन्हा सगळे सांगतात, पासवर्ड  लिहून ठेवू नका. फोनमध्ये सेव्ह करून ठेवू नका. तो फोन चोरीला गेला तर आपण पुन्हा कंगाल!
हे इतके घोळ आपण नव्या काळात पासवर्डचे घातलेत की, पुढच्या काळात माणसं एकमेकांना भेटल्यावर आधी पासवर्ड सांगतील आणि मग बोलायला सुरुवात करतील वगैरे असे जोक आता फिरू लागलेत.
आणि एवढं करून हे सगळे पासवर्ड लक्षात कसे ठेवायचे याविषयी कुणी काही बोलत नाही, सांगत नाही. पासवर्ड कसे तयार करायचे, कसे लक्षात ठेवायचे हे काही कुणी शिकवत नाही. पासवर्ड कसे असू नयेत हे सगळेच सांगतात; पण कसे असावेत हे काही कुणी सांगत नाही. आणि सांगितलं तरी त्यात एक आकडा हवा, विविध साइन हव्यात वगैरे सांगतात. पण हे गुंता पासवर्ड लक्षात कसे ठेवणार, काहीच उत्तर नाही.
पण काळ बदलला आणि लोक या पासवर्डचा आणि पासवर्ड यूजर्सचाही अभ्यास करू लागलेत. अलीकडेच अमेरिकेत न्यू जर्सीतल्या ख्यातनाम रुटगर्स युनिव्हर्सिटीने एक अभ्यास प्रसिद्ध केला आणि पासवर्ड लक्षात ठेवण्यासाठी एक छोटुसं उपकरण तयार केलं तर पासवर्ड टेक्नॉलॉजीच बदलून जाऊ शकेल.
अभ्यास जेन लिंडक्विस्ट म्हणतात,‘वेबसाइट पासवर्ड वीक आहेत की नाही हे सांगतात; पण चांगले पासवर्ड कसे बनवणार, ते लक्षात कसे ठेवणार हे सांगत नाही, मग लोक फक्त पासवर्डचे कॉम्बिनेशन बनवतात. त्यामुळे आम्ही आता असं मॉडेल बनवतोय की जो पासवर्ड तुम्ही बनवला तो तुमच्या कितपत लक्षात राहील हे ते मॉडेल सांगेल. किंवा सिस्टीम डिझाइन करणार्‍यांनाही मदत करेल, त्यातून पासवर्ड विसरण्याचे घोळ कमी होतील.’
जितक्या जास्त वेळा वापरला जाईल तितका जास्त पासवर्ड लक्षात राहतो, ही साधारण मानसिकता असतेच. पण अनेक पासवर्ड, अनेकदा वापरल्यानं घोळ होतो आणि पासवर्ड विसरायला किंवा चुकायला लागतात. मग फ्रस्ट्रेशन येतं, स्मरणशक्तीच्या तक्रारी सुरू होतात असंही हा अभ्यास म्हणतो.
आता यावर उपाय काय तर भविष्यात पासवर्ड लक्षात ठेवायला मदत करणारी उपरकणं येतील.
सध्या मात्र रट्टामारूनच आपापले पासवर्ड लक्षात ठेवण्यापलीकडे आपल्या हातात काहीही नाही!

Web Title: Do you often forget password?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.