do you have video resume? No, how can I get a job call? | व्हीडिओ रिझ्युम आहे का? नाही, मग नोकरीचा कॉल कसा येईल?
व्हीडिओ रिझ्युम आहे का? नाही, मग नोकरीचा कॉल कसा येईल?

ठळक मुद्देइंडस्ट्री 4.0 चं जग आपल्या किती जवळ येऊन ठेपलंय, जागते रहो!!

-डॉ.भूषण केळकर

नोकरी मिळण्याचीच नाही तर मिळवण्याची पद्धतसुद्धा आता बदलते आहे. इंडस्ट्री 4.0 च्या काळात आता ही गोष्टही लक्षात ठेवायला हवी.
हे आता उदाहरण घ्या. काही दिवसांपूर्वी मी वाचलं होतं की हिंदुस्तान युनिलिव्हरची लीना नायर नावाची एक अधिकारी असं म्हणाली होती की, या बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरभरती आता नेहमीप्रमाणे नोकरीची जाहिरात वगैरे करून मग रेझ्युम मागवून होतच नाही! लिंकडीन आणि फेसबुक या समाजमाध्यमांतून लोकांना आपण होऊन विचारणा होते आणि त्यातून निवडल्या गेलेल्या लोकांना ‘व्हिडीओ रेझ्युम’ पाठवायला सांगितला जातो. हा व्हिडीओ रेझ्युम म्हणजे एक-दीड मिनिटांचा तुम्ही स्वतर्‍चा व्हिडीओ पाठवायचा ज्याच्यात तुम्ही हे सांगायचं असतं की तुमची ‘खासियत’ काय आहे, कंपनीने तुम्हाला का निवडावं? पूर्वीची छापील रेझ्युम लिहिण्याची आणि पाठवण्याची पद्धत आता कालबाह्य होत जाणार आहे. 
एवढंच नाही तर मुलाखतीसाठी आलेल्या अशा अनेक व्हिडीओ रेझ्युममधून अखेर प्रत्यक्ष मुलाखतीसाठी निवड होते, त्या उमेदवारांची निवड कोण करतं, तर एआय? एआयचे प्रोग्राम वापरून कुणाला मुलाखतीला बोलवायचं हे ठरतं. तुमची देहबोली, तुमचे शब्द उच्चार हे सारं तपासलं जातं एआयकडून!
इंडस्ट्री 4.0 चं जग आपल्या किती जवळ येऊन ठेपलंय, हे एव्हाना लक्षात आलंच असेल तुमच्या!
म्हणून म्हणतोय, जागते रहो!!
मागील काही लेखांमध्ये शेतीमध्ये सुद्धा रोबोट वापरले जातील याबद्दल मी लिहिलं होते. अमेरिकेतली कालची बातमी आहे की कॅलिफोर्नियामध्ये खरोखरच अनेक ठिकाणी रोबोट वापरले जात आहेत. आपण हे लक्षात ठेवू की हे अमेरिकेत झालं तरी भारतात अजून काही वर्षे तरी हे घडणं अवघड आहे.
पण एक मात्र आहे की आजकाल शहरांमध्ये बर्‍याच ठिकाणी रोबोटिक्सच्या क्लासेसचं पेव फुटलं आहे. एवढंच नव्हे तर केंद्र सरकारच्या ‘अटल टिंकरिंग लॅब्ज’ या पथदर्शी प्रकल्पामुळे नव्या पिढीला या इंडस्ट्री 4.0ची तोंडओळख अत्यंत लहान वयात होते आहे. मागील आठवडय़ात मी एका शाळेत गेलो असताना तेथील 9/10 वीच्या मुला-मुलींनी मला विचारलं की, आम्हाला डिसेंबरपासून हलक्या वजनाचे ड्रोन्स वापरता येणार आहेत, तर आता ते ड्रोन्स कसे मिळवायचे! नवीन पिढी एकूण या इंडस्ट्री 4.0 साठी विशेष सहजपणे तयार होते आहे हे स्वागतार्ह आहेच. खरं तर आपल्या केंद्र सरकारनं हे म्हटलंच आहे की ही इंडस्ट्री 4.0 चं हे आव्हान आणि संधी भारतानं स्वीकारायला हवी, कारण मागील तीन स्थित्यंतरं भारतानं पारतंत्र्यामुळे आणि फसव्या समाजवादामुळे घालवली आहेत!
मागील लेखात आपण ‘हायब्रिड’ या संकल्पनेविषयी बोललो. आता हेच बघा ना बातमी आहे की एका टीव्ही शोमध्ये जिमी फॉलन या कलाकाराबरोबर आपल्या ‘सोफिया’ने गाणं गायलं. बघा झालं की नाही हायब्रिड गाणं?
कालच स्टॉकहोममध्ये फरहाट नावाचा एक रोबोट ‘प्रकाशित’ झाला. जो मानवी भावभावना ‘समजू’ शकतो. एवढंच काय तर टोकियो, जपानमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये असे रोबोट आहेत की जे दिव्यांग वेर्ट्स रिमोट कंट्रोलने संचालन करतात आणि हे दिव्यांग वेर्ट्सही हॉटेलमध्ये नसतात, तर आपापल्या घरी असतात!
परवाच अशी बातमी होती की संशोधकांनी पिझा बनवण्याच्या हजारो रेसिपी कॉम्प्युटरला शिकवल्या आणि एआयच्या आधारे तीन असे पिझा तयार झाले की लोकांनी त्याचा विचारही केला नसता. विशेष म्हणजे ते पिझा लोकांना प्रचंड आवडलेसुद्धा! शिंप, ज्ॉम आणि सॉसेज अशा तीन गोष्टींचं कॉम्बिनेशन करणारा पिझा लोकांना इतका आवडला की बॉस्टनच्या रेस्टॉरंटमध्ये तो एकदम ‘हिट’ ठरला! 
एमआयटीमध्ये खरं तर असा एक प्रकल्प चालू आहे ज्याचं नावच मुळी ‘‘हाऊ टू जनरेट अलमोस्ट एनीथिंग’
आणि हे सारं कोण करणार?
तर अर्थातच एआय! 

 


Web Title: do you have video resume? No, how can I get a job call?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.