- रंजन पांढरे 

(सिव्हिल इंजिनिअर असलेला रंजन, ‘सर्च’ संस्थेत तंबाखू व दारू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्रोजेक्ट असोसिएट म्हणून काम करतो.) 

चल यार एक पेग ले,

बस एक, नही तो अपनी दोस्ती खतम!
असं दोस्तांनी म्हटलं 
आणि कितीही ब्लॅकमेल केलं
तरी त्यांना नाही म्हणता यायलाच हवं!
ते नाही म्हटलं तर
दोस्तांसह व्यसनाच्या गर्तेत
तुम्हीही फसणार,
कायमचे!
 
 
दोस्ती आणि सेलिब्रेशनची अट,
पिणं ही असूच शकत नाही!
 
माझ्या पिअर ग्रुपमध्ये मी पहिल्यांदा दारूबद्दल ऐकलं आणि तिथून सुरू झाली खरी गंमत! चल यार एक पेग ले, बस एक, नही तो अपनी दोस्ती खतम! हे एक वाक्य आणि कार्यक्रम संपला. त्यांनी म्हटल्याप्रमाणं खरंच दारू प्यायलो नाही तर दोस्ती संपते का, असा प्रश्न मला त्रस देत होता. मग एक पर्याय मला सापडला तो म्हणजे काही दिवस आपल्या अशा मित्रंपासून जरा लांब राहिलेलंच बरं. पण तेदेखील इतकं सोपं नाही. कॉलेजमध्ये, कट्टय़ावर कुठेतरी त्यांची माझी भेट होत होतीच. आज रात का क्या प्लान, असा प्रश्न विचारला की काहीतरी विषय बदलवायचा हा एकमेव पर्याय होता. इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला ही स्थिती. त्यानंतर पुढे या गोष्टी वाढत जायला लागल्या. अनेक मित्रंनी तर यापुढे कधीच मजल मारली. सिगारेट, दारू सर्रास सुरू झालं.
वाढदिवस म्हणजे सर्वाना एक पर्वणीच असायची. आपल्याला कोण पार्टी देणार किंवा कोणाकडून पार्टी काढायची यासाठी काही विशिष्ट गट कायम सक्रिय असायचे. रात्री बाराच्या ठोक्याला सर्व मित्र वाढदिवस असणा:या मित्रच्या रूमवर जाणार आणि त्याला केक कापायच्या आधी रम किवा व्हिस्कीची नीट (पाणी किंवा सोडा न घेता घेतलेली दारू) प्यायला लावणार. ती संपल्यानंतर पुढचे सर्व कार्यक्र म सुरू होणार. बर्थडे बॉय, त्याला  चढलेली असते आणि मग थोडं वरखाली झालं की लगेच भसाभसा उलटय़ा सुरू होतात. अशातच मांसाहारी पदार्थ रटरटत शिजत असतात. एक विशेष टीम यासाठी काम करत असते. (आम्ही त्या टीममधले होतो - न पिणारे.) रात्रभर हे सेलिब्रेशन सुरू असतं. अशातच जर चुकून दारू संपली तर दुकानं बंद झाल्यानंतर कुठे दारू मिळते हे सांगणारे माहीतगार असतातच. पेगवर पेग सुरू होतात. नाचणो, गाणो म्हणणो, एखाद्या मित्रला टार्गेट करून त्याचा गेम घेणं सुरू होतं. आम्ही तिस:या वर्षाला किवा फायनलला पोहोचतो, तोपर्यंत कुठलाही समारंभ असो, काही विशेष व्यक्ती आम्हाला जरा बारीकमध्ये विचारणार, चलते क्या, एक पेग मारके आते है? 
या सगळ्यात ‘नाही’ म्हणता येणं खूप गरजेचं असतं, आणि अवघडही! थोडंसं टेन्शन आलं, अडचण आली, फ्रस्टेशन आलं लगेच घेतले दोन पेग. पण तेव्हा दोन पेग नेहमीच अपुरे पडताना मी आजूबाजूला सहज बघत होतो. बर्थडे, परीक्षा संपली, परीक्षेचा निकाल लागला, फेल झालो, पास झालो, सेलिब्रेशन म्हणजे दारू असं चक्र  तयार झालं आणि या चक्रात आपण युवा अडकत चाललो. 
आताशा आपण सोशल ड्रिंकर आहोत हे सांगण्यात खूप भूषण असतं. पिअर प्रेशरमध्ये वावरताना हा अनुभव अनेकांना येत असेल याची मला खात्री आहे. हैदराबाद किवा पुणोसारख्या मेट्रो शहरात आयटी किंवा कार्पोरेटमध्ये बलाढय़ नोक:या करणा:या युवांसोबत माझा संपर्क आला. त्यापैकी काहींची अवस्था अशी की, सोमवार ते शुक्र वार प्रचंड काम करताना वाट फक्त एका दिवसाची बघायची, ते म्हणजे फ्रायडे नाईट! आणि ठिकाण म्हणजे शहरातील कुठलातरी आलिशान पब. मित्र असो किंवा मैत्रिणी, दोन्ही बाजूला दारूविषयी प्रचंड आकर्षण मला दिसतं. नाईटआउटमध्ये तर केवळ एक कारण दिसते ते म्हणजे दारू किंवा इतर नशांची हौस भागवणं, जे घरी शक्य होत नाही.
नागपूरचा वेस्ट हायकोर्ट रोड असो की पुण्याचा फग्यरुसन रस्ता, किंकाळ्या करणारे गाडय़ांचे आवाज, स्टंट, ब्रेक आणि दारूमुळे होणारे आणि काही मित्रंचे अपघात. आणि त्यातल्या काहींचं अचानक जगातून असं निघून जाणं. त्यातले काही मित्र अतिशय क्रिएटिव्ह होते, पण परीक्षेमध्ये पास होत नाही म्हणून, ब्रेकअप झाला म्हणून दारूचा आसरा घेऊ लागले. हे इथेच थांबत नाही, हळूहळू सिगारेट, अमली पदार्थ या टप्प्यात गोष्टी जाऊ लागल्या. आणि मग पुढचं सारं त्यांचं त्यांनाही थांबवता आलं नाही.  
हे झाले काही शहरी अनुभव. पण ग्रामीण भागामध्येदेखील दारू पिण्याचं प्रमाण खूप मोठं आहे. मोहाची किवा खोपडीची दारू स्थानिक ठिकाणी तयार होते आणि सहज उपलब्ध असते. गावामधली निरीक्षणं जरा वेगळी असतात. म्हणजे गाव दारूबंदी करण्याच्या सभेत दारु डे येऊन गोंधळ करणं असो किंवा गावातील सरपंच किंवा इतर पदाधिका:यानेच दारूची भट्टी असल्यानं विरोध करणं, हे अनुभव आम्हाला येतात. हा कायमच एक संघर्षाचा क्षण असतो. पण अशा वेळेस महिला पाठिंबा देण्यास तयार होतात. कारण दारू पिणा:या व्यक्तीचा सर्वात जास्त त्रस कोणाला होत असेल तर तो घरातील, गावातील महिलांना. मग त्या ही लढाई पुढे नेतात. 
वर्ष सरतंय आणि  या वर्षासोबत काही नवीन संकल्प तुम्ही ठरवले असतील, काही मागच्या वर्षातले संकल्प पूर्ण करायचे असतील, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी काही प्लॅन असतील तर त्यात आणखी एक गोष्ट समाविष्ट करा, आणि दारूला नाही म्हणा!
2016 च्या स्वागतासाठी ‘वी डू पार्टी ऑल नाईट’ म्हणताना त्या आनंदाला दारूचा गंध येऊ नये या आशेसह तुमच्या सर्व प्रयत्नांसाठी मनापासून शुभेच्छा. 
 
 
 
एज ऑफ इनिशिएशन ऑफ अल्कोहोल’ म्हणोज दारू पिण्याची सुरुवात भारतामध्ये वयाच्या 17व्या वर्षी होते असं ‘डब्लूएचओ’ म्हणजेच जागतिक आरोग्य संस्थेच्या अभ्यासातून समोर आले आहे. यापूर्वी 198क् मध्ये हे वय 27 वर्षे इतकं होतं. 
पण आता ‘टीनएज’मध्ये म्हणजेच वयात येतानाच अनेक मुलामुलींना  दारूची सवय लागते. ही सवय पुढे व्यसनाधीनतेकडे परिवर्तीत होण्याचा सर्वात जास्त धोका या वयात असतो. 
आपल्या देशात प्रतिव्यक्ती दरवर्षी चार लिटर दारू प्यायली जाते. अर्थात सर्वांचा म्हणजे सर्व माणसांचा यामध्ये समावेश नाही. पण जगाच्या पाठीवर काही आकडेवारी महत्त्वाची वाटते म्हणून नोंद करणो गरजेचे आहे. 
यामध्ये इस्टोनियामध्ये प्रतिव्यक्ती सर्वाधिक म्हणजे 16 लिटर, त्यापाठोपाठ रशिया 12 लिटर आणि पाकिस्तानात वर्षाला सर्वात कमी म्हणजे 100 मिलिलिटर दारूचं सेवन केलं जातं.
जगातील मृत्यूच्या कारणांमध्ये हायपरटेन्शन आणि तंबाखूनंतर दारूमुळे होणा:या मृत्यूचा चौथा क्र मांक लागतो.