शाहरुखने ‘टेड टॉक’च्या व्यासपीठावर सहा महिन्यांपूर्वी केलेलं भाषण पाहिलंत का?

By ऑनलाइन लोकमत on Wed, November 08, 2017 6:09pm

गेल्याच आठवड्यात ‘किंग खान’ म्हणेजच शाहरूख खान याचा ५२वा वाढदिवस साजरा झाला. त्याच्या वाढदिवसाचे फोटोग्राफ्स तुम्ही फेसबुक किंवा ट्विटरवर नक्कीच पाहिले असतील.

-   प्रज्ञा शिदोरे गेल्याच आठवड्यात ‘किंग खान’ म्हणेजच शाहरूख खान याचा ५२वा वाढदिवस साजरा झाला. त्याच्या वाढदिवसाचे फोटोग्राफ्स तुम्ही फेसबुक किंवा ट्विटरवर नक्कीच पाहिले असतील. रावन आता बावन झाला वगैरे पीजे वाचूनही आपण हसलोच. पण त्याने ‘टेड टॉक’च्या व्यासपीठावर सहा महिन्यांपूर्वी केलेलं भाषण पाहिलंत का? नसेल पाहिलं तर पाहून घ्या. माझ्या मते आपल्या आवडत्या एसआरकेचा आजपर्यंतचा हा बेस्ट परफॉर्मन्स आहे. तो त्याच्या आकर्षक, मनोरंजक भाषणातून आपल्याला खिळवून ठेवतो. आणि जाता जाता त्याला समजलेल्या आयुष्याबद्दलचं ज्ञान आपल्याला देऊन जातो. व्हिडीओची सुरुवात करताना तो आपल्याला त्याच्या लहानपणच्या दिल्लीत घेऊन जातो. त्याचं दिल्लीतलं लहानपण, त्याचे आईवडील, त्यांचा मृत्यू असं सगळं वर्णन करतो. कुठेही नाटकीपणा नाही, खोटे हावभाव नाहीत. सरळ साधा संवाद. मग, तो म्हणतो की, ‘ही मानवजात बरीचशी माझ्यासारखीच आहे !’ मग तो त्याच्या आयुष्यातली प्रत्येक पायरी आणि मानवजातीची पहिली पावलं अशी सुंदर गुंफण करतो. त्यामध्ये मग इंटरनेटनं बदललेलं जग, सार्वजनिक आणि खासगी आयुष्याच्या बदललेल्या सीमारेखा आपल्या अनुभव कथनामधून अचूक टिपतो. आणि मग तो आपल्या पन्नाशीबद्दल बोलायला लागतो. तो म्हणतो की, आपली मानवजात आत्ता अशा एका उंबरठ्यावर आहे जेव्हा तिला सगळ्यात गरज आहे ती प्रेम आणि दयाभावाची. मी स्वत: आता अनुभवातून शहाणा झालो आहे. अनेक बरेवाईट अनुभव घेतले आहेत. म्हणून आता वेळ आली आहे. अनुभवांमधून शिकण्याची ही गोष्ट आहे. मानवजातीचं भविष्य आता एका म्हातारपणाकडे झुकलेल्या सुपरस्टारसारखं असायला हवं, असं तो म्हणतो. म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला हा व्हिडीओ बघूनच समजेल. या भाषणामध्ये तो काय सांगतो ते हे खरं आणि महत्त्वाचं वाटतं याचं कारण त्याची बोलण्याची शैली. कदाचित खूप खरं सांगत असल्यामुळेच ते आपल्या मनाला एवढं भिडतं. हा व्हिडीओ बघण्यासाठी टेड टॉकच्या वेबसाइटवर जाऊन शाहरूख खान असं टाइप केलं तरी लगेचच तुम्हाला तो बघायला मिळेल. किंवा ही लिंक पहा.. https://www.ted.com/talks/shah_rukh_khan_thoughts_on_humanity_fame_and_love

किंग खानबद्दल खरं तर आपल्याला ब-यापैकी माहिती आहेच. त्याचे डायलॉग्ज अनेकजण तोंडपाठ म्हणूनही दाखवतात. पण त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला हवी असेल तर त्याची विकिपीडिया एण्ट्री आणि आयएमडीबी या वेबसाइटवरची माहिती नक्की वाचा. इथं त्याने आजपर्यंत केलेले सर्व चित्रपट आणि इतर गोष्टींची इत्थंभूत माहिती आहे. या टेड टॉकवर टेड टॉक ब्लॉग्सवर लोकांनी भरभरून लिहिलं आहे. हा व्हिडीओ आवडला आणि तो जे बोलतो आहे ते पटलं तर या एण्ट्रीजदेखील नक्की वाचा. यापैकी ब्रायन ग्रीन नावाच्या पत्रकाराने लिहिलेला ब्लॉग खरंच कमाल आहे. तो या लिंकवर वाचा..

https://blog.ted.com/the-quest-for-love-and-compassion-shah-rukh-khan-speaks-at-ted2017/  

संबंधित

Zero Teaser : शाहरुख बसला सलमानच्या कडेवर, 'झिरो'चा नवा धमाकेदार टीझर!
IPL 2018: आयपीएल जिंकण्यासाठी मालक काय-काय करतात बघा... चक्रावून जाल!
'मॉम' नव्हे, तर शाहरुखसोबतचा 'हा' चित्रपट असेल श्रीदेवीचा शेवटचा
Magnetic Maharashtra: महाराष्ट्रात 'मीडिया हब' व्हावं; सगळे एकत्र आल्यास जग जिंकणं शक्य- शाहरुख खान
शाहरूख खानला बचावासाठी तीन महिने, आवश्यक कागदपत्रं सादर करण्याचे आदेश

ऑक्सिजन कडून आणखी

झटकेपट वजन कमी करणारं यो यो डाएट करताय? मग सावध व्हा !
प्रियांका चोप्राची डेनीम स्टाईल आपल्याला शोभेल का?
पॅरीसच्या शाळेत वारली शिकवणारा तरुण चित्रकार
मानसोपचार तज्ज्ञ म्हणून गडचिरोलीत स्थायिक झालेल्या आरतीची गोष्ट.
योग नावाच्या नव्या इंडस्ट्रीत करिअरच्या संधी

आणखी वाचा