-   प्रज्ञा शिदोरे
गेल्याच आठवड्यात ‘किंग खान’ म्हणेजच शाहरूख खान याचा ५२वा वाढदिवस साजरा झाला. त्याच्या वाढदिवसाचे फोटोग्राफ्स तुम्ही फेसबुक किंवा ट्विटरवर नक्कीच पाहिले असतील. रावन आता बावन झाला वगैरे पीजे वाचूनही आपण हसलोच. पण त्याने ‘टेड टॉक’च्या व्यासपीठावर सहा महिन्यांपूर्वी केलेलं भाषण पाहिलंत का?
नसेल पाहिलं तर पाहून घ्या. माझ्या मते आपल्या आवडत्या एसआरकेचा आजपर्यंतचा हा बेस्ट परफॉर्मन्स आहे.
तो त्याच्या आकर्षक, मनोरंजक भाषणातून आपल्याला खिळवून ठेवतो. आणि जाता जाता त्याला समजलेल्या आयुष्याबद्दलचं ज्ञान आपल्याला देऊन जातो.
व्हिडीओची सुरुवात करताना तो आपल्याला त्याच्या लहानपणच्या दिल्लीत घेऊन जातो. त्याचं दिल्लीतलं लहानपण, त्याचे आईवडील, त्यांचा मृत्यू असं सगळं वर्णन करतो. कुठेही नाटकीपणा नाही, खोटे हावभाव नाहीत. सरळ साधा संवाद. मग, तो म्हणतो की, ‘ही मानवजात बरीचशी माझ्यासारखीच आहे !’ मग तो त्याच्या आयुष्यातली प्रत्येक पायरी आणि मानवजातीची पहिली पावलं अशी सुंदर गुंफण करतो. त्यामध्ये मग इंटरनेटनं बदललेलं जग, सार्वजनिक आणि खासगी आयुष्याच्या बदललेल्या सीमारेखा आपल्या अनुभव कथनामधून अचूक टिपतो.
आणि मग तो आपल्या पन्नाशीबद्दल बोलायला लागतो.
तो म्हणतो की, आपली मानवजात आत्ता अशा एका उंबरठ्यावर आहे जेव्हा तिला सगळ्यात गरज आहे ती प्रेम आणि दयाभावाची. मी स्वत: आता अनुभवातून शहाणा झालो आहे. अनेक बरेवाईट अनुभव घेतले आहेत. म्हणून आता वेळ आली आहे. अनुभवांमधून शिकण्याची ही गोष्ट आहे. मानवजातीचं भविष्य आता एका म्हातारपणाकडे झुकलेल्या सुपरस्टारसारखं असायला हवं, असं तो म्हणतो. म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला हा व्हिडीओ बघूनच समजेल.
या भाषणामध्ये तो काय सांगतो ते हे खरं आणि महत्त्वाचं वाटतं याचं कारण त्याची बोलण्याची शैली. कदाचित खूप खरं सांगत असल्यामुळेच ते आपल्या मनाला एवढं भिडतं.
हा व्हिडीओ बघण्यासाठी टेड टॉकच्या वेबसाइटवर जाऊन शाहरूख खान असं टाइप केलं तरी लगेचच तुम्हाला तो बघायला मिळेल.
किंवा ही लिंक पहा..
https://www.ted.com/talks/shah_rukh_khan_thoughts_on_humanity_fame_and_love

किंग खानबद्दल खरं तर आपल्याला ब-यापैकी माहिती आहेच. त्याचे डायलॉग्ज अनेकजण तोंडपाठ म्हणूनही दाखवतात. पण त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला हवी असेल तर त्याची विकिपीडिया एण्ट्री आणि आयएमडीबी या वेबसाइटवरची माहिती नक्की वाचा. इथं त्याने आजपर्यंत केलेले सर्व चित्रपट आणि इतर गोष्टींची इत्थंभूत माहिती आहे. या टेड टॉकवर टेड टॉक ब्लॉग्सवर लोकांनी भरभरून लिहिलं आहे. हा व्हिडीओ आवडला आणि तो जे बोलतो आहे ते पटलं तर या एण्ट्रीजदेखील नक्की वाचा. यापैकी ब्रायन ग्रीन नावाच्या पत्रकाराने लिहिलेला ब्लॉग खरंच कमाल आहे.
तो या लिंकवर वाचा..

https://blog.ted.com/the-quest-for-love-and-compassion-shah-rukh-khan-speaks-at-ted2017/
 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.

प्रमोटेड बातम्या

संबंधित बातम्या

मुंबईत इथे फिरा एक रुपयाही खर्च न करता

1 day ago

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा 52 वा वाढदिवस

5 days ago

शाहरुख खानला मुंबई मनपाचा दणका, रेड चिलीजच्या बेकायदा हॉटेलवर हातोडा

6th Oct'17

अभिनेता शाहरूख खानला मुंबई महापालिकेचा दणका...

6th Oct'17

शाहरुख खानच्या रेड चिल्लीज कंपनीचे बेकायदा हॉटेल पाडले

5th Oct'17

प्रमोटेड बातम्या

ऑक्सिजन अधिक बातम्या

करिअर का अडलं? न फिरवल्यामुळे!

करिअर का अडलं? न फिरवल्यामुळे!

1 day ago

थंडींचा रंग कोणता? मॅजेण्टा यलो आणि B & W

थंडींचा रंग कोणता? मॅजेण्टा यलो आणि B & W

1 day ago

दीपिकाचा डिटॅचेबल ड्रेस, थर्टीफस्टसाठी नवा ड्रेसिंग फॉर्म्युला !

दीपिकाचा डिटॅचेबल ड्रेस, थर्टीफस्टसाठी नवा ड्रेसिंग फॉर्म्युला !

1 day ago

इन बिटवीन- डोक्याला भुंगा लावणारी ही शॉर्टफिल्म पाहिली का?

इन बिटवीन- डोक्याला भुंगा लावणारी ही शॉर्टफिल्म पाहिली का?

1 day ago

.आणि पाऊस बरसला तेव्हा!

.आणि पाऊस बरसला तेव्हा!

1 day ago

पहिल्या पिढीतल्या ग्रामीण भागातल्या नवउद्योजकांचा खंबीर प्रवास.

पहिल्या पिढीतल्या ग्रामीण भागातल्या नवउद्योजकांचा खंबीर प्रवास.

1 day ago