डिझायनर लाइफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 09:04 AM2018-05-17T09:04:16+5:302018-05-17T09:04:16+5:30

थ्रीडी सिनेमे आपण पाहतो, पण थ्रीडी प्रिंटिंग? तसं प्रिंटिंग करून बूट, कपडे, गाड्यांचे पार्ट्स तयार केले जाताहेत.

Designer Life | डिझायनर लाइफ

डिझायनर लाइफ

Next

मी दाढी करण्यासाठी रेझर उचलला आणि दाढी करायला सुरुवात करणार एवढ्यात..
मित्र-मैत्रिणींनो, ही कुठल्या रहस्य चित्रपटाची सुरुवात वगैरे नाही. तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी केलेली गंमत आहे; पण मला सांगायचं हे की रेझर उचलून दाढी करायला लागेपर्यंत दाढीचा केस जेवढा वाढतो, ती १ नॅनोमीटर लांबी असते. नॅनोटेक्नॉलॉजी ज्यावर आधारित आहे ती लांबी म्हणजे १ नॅनोमीटर. अजून तुम्हाला अंदाज यावा म्हणून सांगतो. जर एक छोटा लिंबू आपण १ नॅनोमीटर आहे असं ठरवलं तर पूर्ण पृथ्वी १ मीटर व्यासाची होईल!
नॅनोटेक्नॉलॉजीबद्दल आजच्या संवादात बोलण्याचं कारण म्हणजे हे तंत्रज्ञान मुळात महत्त्वाचं आहेच; पण इंडस्ट्री ४.० मधे असणाऱ्या थ्रीडी प्रिंटिंगमध्ये त्याचा वापर वाढता आहे. कॅलिफोर्नियातील लॉरेन्स लिव्हरमोअर नॅशनल लॅबमध्ये थ्रीडी (त्रिमिती) प्रिंटिंग आणि नॅनोटेक्नॉलॉजी यावर मागील महिन्यात महत्त्वाचं संशोधन प्रसिद्ध झालंय.
नॅनोटेक्नॉलॉजीबद्दल आपण या लेखात फार खोलात जाणार नाही. परंतु आपण एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेल की नॅनोमटेरिअल्स हे अत्यंत वेगळे आहेत. ‘नॅनो’ म्हणजे अत्यंत लहान आकारात मीटरच्या हजार कोटी भागांपैकी एक- अनेक पदार्थांचे गुणधर्म बदलतात. उदाहरणार्थ सोनं हे नॅनोफॉर्ममधे द्रवरुप होतं, कॉपर (तांब) ज्वालाग्रही होतं. आणि कॉर्बन अत्यंत शक्तिशाली व टणक होतं. कार्बन नॅनोट्यूब फुुलरिन ही काही उदाहरणं. तर नॅनोमटेरिअल वापरून जे थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञान वापरलं जातं त्याचा बोलबाला गेल्या १-२ वर्षांत वाढलाय. हे थ्रीडी प्रिंटिंग किंवा ज्याला ‘आॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग’ (एएम) असंही म्हणतात तो ‘इंडस्ट्री ४.०’ एक महत्त्वाचा घटक आहे.
थ्रीडी प्रिंटिंगमध्ये संगणकावर तयार केलेल्या डिझाइन्स थ्रीडी प्रिंटरला फीड केली जातात आणि द्रवरुपात असणाºया किंवा पावडर रुपात असणाºया पदार्थातून ते डिझाइन त्रिमितीमधे तयार होतं. हे समजायला फार अवघड नाही. आपल्या साध्या नेहमीच्या प्रिंटरमधे आपण जे दोन मितींमध्ये करतो तेच त्रिमितीमध्ये करणं. तुम्ही जर एमआरआय किंवा सिटी स्कॅनचं तंत्रज्ञान बघितलं तर तुम्हाला ते लगेच लक्षात येईल. शरीराचे वेगवेगळे थर/स्तर पृथक्करण करत, पूर्ण शरीराचं त्रिमिती चित्र तयार करणं हे त्यात केलं जातं. थ्रीडी प्रिंटिंगमध्ये असाच प्रकार काही द्रवरुप माध्यमातून किंवा कार्बोमॉर्फ सारख्या पावडर/भुकटीपासून वेगवेगळे थर करत एकमेकांवर जोडत संगणकावर ‘कॉम्प्युटर एडेड डिझाइन’वर असणाºया डिझाइननुसार घनरुपात तयार केला जातो.
तुम्हाला असं वाटेल की हे थ्रीडी प्रिंटिंग वगैरे फार पुढची गोष्ट आहे. मग मी तुम्हाला काही उदाहरणं देतो. त्यातून लक्षात येईल की हे थ्रीडी प्रिंटिंग आपल्या दारात आलंय! आज थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञान वापरून चॉकलेट, पिझ्झा, पास्ता केला जातोय. मी विचार करतोय की कोणते भारतीय पदार्थ यापद्धतीेने केले जाऊ शकतील त्यात मला सुचलेले पदार्थ म्हणजे सुतरफेणी, माहीम हलवा, चिरोटा आणि सोहन हलवा! तुमच्या (आणि माझ्याही!) तोंडाला पाणी सुटून तुमचं या संवादावरून लक्ष विचलित होण्याआधी मला अन्य काही उपयोग सांगू देत जिथे थ्रीडी प्रिंटिंग वापरलं जातं.
नायकेने काही बूट या तंत्रज्ञानाने तयार केलेत. फॅशन इंडस्ट्रीमध्ये थ्रीडी प्रिंटिंगचा वाढता वापर आहे. या पुढे काही कपडे विशेषत: बॉलिवूडमध्ये आपल्याला दिसलं/ ऐकू आलं की हे कपडे थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानानं तयार केलेत तर आश्चर्य वाटायला नको.
ऑडी या प्रसिद्ध जर्मन कार कंपनीने ऑडी आरएसक्यू ही गाडी थ्रीडी प्रिंटिंगने बनवली आहे. उर्बी हीे २०१४ मधली गाडी सुद्धा पूर्णत: थ्रीडी प्रिंटिंगवर आधारित आहे. २०१५ मध्ये ‘एअरबस’ या विमान कंपनीने विमानातले १००० भाग थ्रीडी प्रिंटिंगने बनवले. २०१७ मध्ये जी.ई. एव्हिएशन कंपनीनं संपूर्ण हेलिकॉप्टर या तंत्रज्ञानानं बनवलंय!
मागील काही लेखांत मी ‘सेकंड लाइफ’ संसार, अवतार याबद्दल लिहिलं होतं त्याचबरोबर हे थ्रीडी प्रिंटिंग. यानं सारं जीवनचं डिझायनर होऊन गेलं तर?
 

Web Title: Designer Life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.