Descenting Diagnosis- Have you read this book? | डिसेंटिंग डायग्नोसिस- हे पुस्तक वाचलंय का?
डिसेंटिंग डायग्नोसिस- हे पुस्तक वाचलंय का?

ठळक मुद्देआरोग्याशी संबंधित प्रश्न आणि जागरुकता यासाठी हे पुस्तक वाचायला हवं.    

- प्रज्ञा शिदोरे

वैद्यकीय पेशाला आपण ‘नोबल प्रोफेशन’ म्हणतो. ते तसं आहेदेखील. आपला जीव ज्याच्या हातात आहे अशा व्यक्तीवर आपण पूर्ण विश्वास टाकतो. ती सांगेल ती पूर्वदिशा असं समजून वागतो. मात्र या व्यवसायातही हल्ली काही दुष्प्रवृत्ती आलेल्या दिसतात. त्याविषयी आपण वृत्तपत्रांत वेळोवेळी वाचतोही.
जसा इतर क्षेत्नात भ्रष्टाचार वाढतो आहे, तसंच वैद्यकीय क्षेत्नातही गैरप्रकार वाढताना आपल्याला दिसत आहेत. आणि याच वैद्यकीय गैरप्रकारांवर 
अरुण गद्रे आणि अभय शुक्ला यांनी हे पुस्तक लिहिलं ‘डिसेंटिंग डायग्नोसिस’ म्हणजे रोगनिदानावर प्रश्नचिन्ह उभं करणारं हे पुस्तक लिहिलं आहे.   
पुस्तकाचे लेखक अरुण गद्रे आणि अभय शुक्ला हे दोन्हीही वैद्यकीय व्यवसायातले. त्यांनी या क्षेत्नातल्या 70  ते 80 डॉक्टरांचा अभ्यास करून आणि त्यांची कार्यपद्धती तपासून हे पुस्तक लिहिलं आहे. त्यांच्या मते, जर टायफॉइडला 2 प्रकारच्या चाचण्या कराव्या लागत असतील तर काही डॉक्टर्स काहीही गरज नसताना अधिक चाचण्या सांगतात. डायग्नोस्टिक सेंटर्स, डॉक्टर्स अणि औषध कंपन्या यांचं एक गुळपीठ असतं. आपल्याला गरज असते म्हणून आपण डॉक्टरकडे जातो. अनेकदा आपल्या गरजेचा गैरफायदा घेतला जातो. एखाद्या रुग्णाला त्याच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी योग्य ठिकाणही उपलब्ध नसतं, असा साधारण आशय या पुस्तकाचा आहे. 
आपल्या आरोग्याशी संबंधित प्रश्न आणि जागरुकता यासाठी हे पुस्तक वाचायला हवं.
   
याविषयावर  https://www.ted.com/talks/leana_wen_what_your_doctor_won_t_disclose -- 
म्हणजे तुमचा डॉक्टर तुम्हाला काय सांगत नाही, हे टेड टॉक नक्की ऐका.  

 


Web Title: Descenting Diagnosis- Have you read this book?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.