co-ords- एकाच रंगाचे कपडे घालण्याचा नवा हॉट ट्रेण्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 04:40 PM2018-10-04T16:40:01+5:302018-10-04T16:40:08+5:30

पॅण्ट आणि जॅकेट एकाच रंगाचे घालण्याचा हा कोणता नवीन ट्रेण्ड?

co-ords - New Hot Trend With one Color | co-ords- एकाच रंगाचे कपडे घालण्याचा नवा हॉट ट्रेण्ड

co-ords- एकाच रंगाचे कपडे घालण्याचा नवा हॉट ट्रेण्ड

Next
ठळक मुद्देट्रेण्डी राहायचं असेल तर छोटेच कपडे घालावे लागतात या गैरसमजाला को-ऑर्ड्स सेट हे उत्तम उदाहरण आहे. 

- श्रुती साठे 

पॅण्ट, शॉर्ट्स वर कुठला टॉप छान वाटेल आणि कुठलं जॅकेट शोभेल? प्रिंटेड का प्लेन? आता असा विचार करून वॉर्डरोब उलथापालथा करायची गरज नाही ! सध्या ट्रेण्डमध्ये आहे एकाच कापडाचा मॅचिंग टॉप आणि बॉटम वापरायची ! हे कपडे को-ऑर्ड्स म्हणजेच कॉ-ऑर्डिनेट सेट म्हणून ओळखले जातात.  वापरायला सुटसुटीत, दिसायला स्टायलिश असे हे टू पीस सूट तरु णींच्या पसंतीस पडताना दिसतायत. 
आपली मराठमोळी सईसुद्धा अशाच एक को-ऑर्ड्ससेटमध्ये सुंदर दिसली दिसली. फिक्या जांभळ्या रंगाचं जॅकेट आणि शॉर्ट्स हे एकदम यंग आणि फ्रेश कॉम्बिनेशन आहे. सईने त्यावर फ्रंट नॉट स्टाइलचा ब्रालेट टॉप, स्ट्रॅपी सॅण्डल्स आणि हातात सोनेरी रंगाच्या अ‍ॅक्सेसरी वापरून एकदम एलिगंट लूक दिलेला दिसतो.
बॉलिवूड सेलेबच्यासुद्धा को-ऑर्ड्स सेट पसंतीस पडताना दिसतायत. अनुष्का शर्माने एअरपोर्ट लूकसाठी को-ऑर्ड्स सेटला प्राधान्य दिलं. निळ्या रंगाचं बॉम्बर जॅकेट आणि त्याच निळ्या रंगाचे क्युलॉट असा अतिशय साधा, कम्फोर्टेबल आणि तरीसुद्धा स्टायलिश. हा लूक तुम्हीसुद्धा वापरून पहा. सोनम कपूरदेखील मरून रंगाच्या  एका को-ऑर्ड्स सेटमध्ये सुरेख दिसली. तिने केलेलं मॅचिंग पॅण्ट-ब्लेझर आणि काळ्या लूज टॉपचं कॉम्बिनेशन हे आपल्या कोणालाही सहज वापरता येणारं आहे.

शिल्पा शेट्टीने मात्न  को-ऑर्ड्स सेट वापरून ग्लॅमरस लूक आणला. जांभळ्या रंगाचा हा टू पीस तिच्यावर खुलून दिसला. सोबत वापरलेला कॉन्ट्रास्ट लेपर्ड प्रिंट बेल्ट त्यावर शोभून दिसला.

को-ऑर्ड्स सेट हे पार्टी, कॅज्युअल, ऑफिसवेअर म्हणून वापरता येऊ शकतात, त्याच्या पॅन्ट आणि जॅकेटची स्टाइल योग्य त्या प्रयोजनानुसार निवडली म्हणजे झालं.  
ट्रेण्डी राहायचं असेल तर छोटेच कपडे घालावे लागतात या गैरसमजाला को-ऑर्ड्स सेट हे उत्तम उदाहरण आहे. 

 

Web Title: co-ords - New Hot Trend With one Color

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.