मेंदूतील आठवणी कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करता येऊ शकतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 07:00 AM2018-09-06T07:00:00+5:302018-09-06T07:00:00+5:30

मेंदू आणि एआयची जादू म्हणजे संगणकातील ज्ञान/आठवणी या मानवी मेंदूतसुद्धा अपलोड करता येऊ शकतील.

brain memory download in the computer? | मेंदूतील आठवणी कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करता येऊ शकतात?

मेंदूतील आठवणी कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करता येऊ शकतात?

Next
ठळक मुद्दे रोबोटतर्फे गणपतीची पूजा होते आहे. नागपूरच्या कमिन्स कॉलेजमध्ये तर इंजिनिअरिंगच्या मुलींनी इंटरनेट ऑफ थिंग्ज तंत्रज्ञान वापरून एका कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन केलं.

-डॉ. भूषण केळकर

नीटची परीक्षा एकदाच होईल; परंतु जेईई ही परीक्षा वर्षातून दोनदा होईल अशी घोषणा झाली आहे, हे आपण जाणतोच. त्यात मुलांवरचा ताण कमी करण्याचा हेतू आहे व तो स्तुत्यपण आहे. त्याचबरोबर प्रत्येक परीक्षार्थीला वेगळा प्रश्नसंच पण समान काठिण्य पातळीवर असेल अशा अभिनंदनीय बदलांचीही घोषणा झाली आहे; पण नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (एनटीए) सावध राहावे लागेल. जेईईसारख्या विलक्षण स्पर्धात्मक परीक्षांमध्ये विद्याथ्र्याकडून तंत्रज्ञानाचा गैरवापरपण होऊ शकेल हेसुद्धा लक्षात ठेवायला हवं. आता हेच बघा ना - ‘इंटरनेट कॉँटॅक्ट लेन्सेस’च्या साहाय्यानं तुम्ही केवळ डोळ्यांची पापणी लवलीत की इंटरनेटला जोडले जाल असं तंत्रज्ञान विकसित झालंय! अशा गोष्टी फार महाग असतील असंही नाही, कारण कॉम्प्युटरमधली चिप. ही ‘चीप’पण होत चालली आहे. एका चिपची किंमत ही सहजपणे एक रुपयाच्या आतलीच आहे! त्यामुळे अशा काही चिप्सचा समुच्चय असणारी ‘इंटरनेट काँटॅक्ट लेन्स’ ही सर्वसामान्यांच्या आवाक्यात असू शकेल हे उघड आहे. परीक्षेत कॉपी (दुसर्‍याचं पाहून) करण्याऐवजी इंटरनेटवरून केलं तर?
हे तर काहीच नाही. इंडस्ट्री 4.0 च्या तंत्रज्ञानाच्या कक्षा एवढय़ा वेगाने रूंदावत आहेत की ‘मिचिओ काकू’  हा शास्त्रज्ञ व भविष्यवेत्ता असं सांगतोय की आत्ताच आपल्याला आठवणी संगणकात अपलोड  करता येत आहेत. म्हणजे आपल्या मेंदूतील आठवणी या डाउनलोड करून संगणकात अपलोड करता येत आहेत! त्याही पुढची पायरी म्हणजे संगणकातील ज्ञान/आठवणी या मानवी मेंदूतसुद्धा अपलोड करता येत आहेत. याचाच अर्थ माझ्याप्रमाणे तुम्हीही काढला असेल की दोन मानवी मेंदूंमध्ये माहिती/आठवणी/भावना यांचे आदान-प्रदान हे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने होऊ शकेल!! 
या विषयातील अद्ययावत माहितीसाठी अनेकांमधली एक वेबसाइट मी तुम्हाला सुचवतो. 666.ु1ं्रल्लल्ली3.ल्ली3 हे ब्रेननेट म्हणजे ज्याला न्यूरोसायन्स/कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी म्हणतात. त्यात रस असणार्‍या व कार्यरत असणार्‍या जगभरातील शास्त्रज्ञांचा गट आहे.
‘शब्देविण संवादू’ची इंडस्ट्री 4.0 ची आवृत्ती! टोटल रिकॉल हा सिनेमा तुम्हाला आठवेल आणि हा सिनेमा आता कल्पनाविश्वातून वास्तवात येण्याची वाटचाल सुरू झाली आहे हे पटेल.
इंडस्ट्री 4.0 चं तंत्रज्ञान आपल्या सर्वाचं जग व्यापत चाललं आहे. हेच बघा ना, परवाचीच बातमी होती की ल्युकेमिया या कर्करोगाचे निदान हे एआयचा वापर करून कुठल्याही डॉक्टरापेक्षा अचूकपणे करण्यात आलं आहे. कालची बातमी आहे की जपानने एआय रोबोट्स तयार केलेत की ज्यांच्या साहाय्याने जपानी विद्यार्थी हे इंग्रजी भाषा शिकतील. 250 मिलियन येन (जवळपास 1.5 कोटी रुपये) असा खर्च असणारा हा प्रकल्प पथदर्शी म्हणून 500 शाळांत राबवला जाईल. मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून ‘मिनी’  नावाची रोबोट- ‘रीडिंग बडी’ विस्कॉन्सिनमध्ये अमेरिकेत बनवली आहे. आणि मुलं ते एन्जॉय करत आहेत.
हे सगळे प्रकार फक्त जपान आणि अमेरिकेत होऊ शकतात, आपल्याकडे नाही असं समजू नका! मागील महिन्यातील माहिती आहे की ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर’ ‘‘आस्क मोटाभाई’’ नावाचा चॅटबॉट आलाय. स्टॉक मार्केटमधली माहिती हा चॅटबॉट देतोय! रोबोटतर्फे गणपतीची पूजा होते आहे. नागपूरच्या कमिन्स कॉलेजमध्ये तर इंजिनिअरिंगच्या मुलींनी इंटरनेट ऑफ थिंग्ज तंत्रज्ञान वापरून एका कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन केलं. अहो हेच काय, पाथर्डी फाटा येथील धनलक्ष्मी शाळेत आठवीच्या मुलांनी तयार केलेल्या रोबोटतर्फे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण केले गेलं.
आता बोला!!

 

Web Title: brain memory download in the computer?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.