निळ्या जर्सीवाल्या मुली

By Admin | Published: March 31, 2016 02:48 PM2016-03-31T14:48:05+5:302016-03-31T14:48:05+5:30

चेंडू तोच, बॅट तीच, मैदानही तेच. पण गाजवताहेत मुली. त्याही मुंबई-पुण्यासह दिल्ली-चेन्नई-बेंगळुरूवाल्या नाही, तर कोल्हापूर-सांगलीसारख्या नी बडोदा नी विजयपुरासारख्या ग्रामीण भागातल्या!

Blue jersey girls | निळ्या जर्सीवाल्या मुली

निळ्या जर्सीवाल्या मुली

googlenewsNext

 चेंडू तोच, बॅट तीच, मैदानही तेच. पण गाजवताहेत मुली. त्याही मुंबई-पुण्यासह दिल्ली-चेन्नई-बेंगळुरूवाल्या नाही, तर कोल्हापूर-सांगलीसारख्या नी बडोदा नी विजयपुरासारख्या ग्रामीण भागातल्या!  क्रिकेट हे या मुलींनी फक्त टीव्हीवर पाहिलं होतं, आणि प्रत्यक्षात अनेकजणी मुलांसोबत स्थानिक पातळीवर क्रिकेट खेळत होत्या. मुली असून मुलांसारखे शर्टपॅण्ट घालून गेंदबल्ला खेळतात म्हणून अनेकींना अपमानही सहन करावे लागले!  मात्र तरीही त्यांनी क्रिकेट सोडलं नाही. आणि आता बदलत्या काळात महिला क्रिकेटला आणि स्वत:लाही नाव आणि ग्लॅमर मिळवून देण्यासाठी त्या कष्ट उपसत आहेत. त्यातल्याच या दोघी.  नुकत्याच टी-ट्वेण्टी वर्ल्डकप खेळलेल्या  भारतीय महिला क्रिकेट संघातल्या दोन गुणी खेळाडू. कोल्हापूरची अनुजा आणि सांगलीची स्मृती. छोटय़ा गावात जिद्दीनं क्रिकेट खेळून आणि शिकून आंतरराष्ट्रीय सामने गाजवायला सिद्ध झालेल्या या दोन खेळाडूंची ही एक खास भेट..

 
 
क्रिकेटवेडय़ा देशात मुलींच्या बदलत्या क्रिकेटची ही एक सुपर ओव्हर!
 
 
सलामीला सांगलीची स्मृती
स्मृती मानधना.
सांगलीची. सध्या तिची ओळख आहे ती भारतीय महिला संघाची सलामीवीर म्हणून!  आधी इंग्लंड, बांगलादेश दौरा, नंतर ऑस्ट्रेलिया दौरा, त्यानंतर श्रीलंकेविरुद्धची मालिका आणि आता विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी या सा:याच्या जोरावर तिचं संघातलं स्थान दिवसेंदिवस भक्कम होत चाललं आहे. डाव्या हातानं फलंदाजी करणारी स्मृती वनडे आणि टी-2क् अशा दोन्ही प्रकारच्या संघात उत्तम आणि धडाकेबाज खेळते आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी स्मृती ही पहिली सांगलीकर.
सांगलीसारख्या छोटय़ा शहरातल्या या मुलीनं एवढी धडक कशी मारली असेल? कसं स्वत:चं क्रिकेट मोठं करत नेलं असेल?
उत्तर मिळतं की, क्रिकेट हेच तिचं पॅशन आहे. 
ज्या वयात इतर मुली काटरून चॅनल्स पाहण्यात वेळ घालवतात त्या वयात स्मृती टीव्हीवर क्रिकेटचे सामने पाहण्यात मग्न असायची. तिचे वडील श्रीनिवास मानधना आणि मोठय़ा भावानं तिचं हे वेड वेळीच ओळखलं आणि तिला क्रिकेट खेळण्यास प्रोत्साहन दिलं. सांगलीचं छत्रपती शिवाजी स्टेडियम आणि चिंतामणराव महाविद्यालयाचं मैदान हे तिचं ‘सेकंड होम’ बनलं होतं. अनंत तांबवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तिनं या मैदानावर गाळलेल्या घामाच्या प्रत्येक थेंबातून इन्व्हेस्टमेंट होत होती, उद्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूची. 2012 साली बडोद्यात अंडर-19 सामन्यात स्मृतीनं नाबाद 224 धावांचा विक्रम केला. याच कामगिरीवर तिला 2014 साली इंग्लंड दौ:यासाठी भारतीय संघात निवडण्यात आलं. भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिका विजय मिळवून देण्यात स्मृतीचा वाटा मोलाचा होता. बीसीसीआयने आणि एमसीएने तिला ‘वुमेन क्रिकेटर ऑफ दि इअर’चा पुरस्कार दिला, यातच तिच्या यशाचं महत्त्व कळतं.
आपण छोटय़ा शहरात राहतो, तिथं सुविधा कमी आहेत, प्रशिक्षणाच्या सोयी नाहीत अशी काहीही रडगाणी न गाता, कसल्याही तक्रारी न करता केवळ आपल्या गेमवर नी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करत स्मृतीनं ही एक मोठी कामगिरी बजावली आहे.
अर्थातच त्यामुळे तिच्याकडून अजून ब:याच मोठय़ा यशाची अपेक्षा आहे.
 
 
कोल्हापूरची ऑलराउण्डर  अनुजा 
अनुजा पाटील.
भारतीय महिला क्रिकेट संघातलं हे एक ऑलराउण्डर भरवशाचं नाव. 
स्पिन बॉलिंग, मधल्या फळीत उपयुक्त बॅटिंग आणि चपळ फिल्डिंग हे सारं अनुजाला उत्तम जमतं. त्यामुळेच आजच्या क्रिकेटच्या परिभाषेत एका ऑलराउण्डरकडे असावं असं एक उत्तम ‘कम्प्लीट पॅकेज’ म्हणजे ही कोल्हापूरची मुलगी. 
कोल्हापूरसारख्या ग्रामीण चेहरा असलेल्या शहरातून ही मुलगी क्रिकेटचे धडे गिरवेल आणि थेट राष्ट्रीय संघात खेळायला जात आपल्या कामगिरीची छाप पाडेल असं एरवी कुणाला खरं वाटलं असतं?
घरातल्या तरुणानं क्रिकेटर होतो म्हणणं वेगळं, आपला मुलगा सचिन आणि आजकालच्या जगातला विराट व्हावा असं आईबाबांना वाटून ते जिवाचं रान करत त्याचं क्रिकेट प्राणपणानं फुलवण्याचा विचार करतात. 
पण मुलीनं सांगितलं की मी क्रिकेट खेळणार, त्यात करिअर करीन, एक दिवस मी नॅशनल टीममध्ये खेळेन तर घरचे कसे रिअॅक्शन देतील?
टिपिकल स्टोरी हीच की, घरचे म्हणतील स्वयंपाक शिक, घरकाम कर, फार तर कम्प्युटरचा क्लासबिस लाव. क्रिकेट हा काय मुलीनं खेळण्याचा खेळ आहे का?
पण अनुजाचं सुदैवानं तसं झालं नाही.
अर्थात राष्ट्रीय संघार्पयतचा तिचा प्रवास सोपा नव्हता. पण निदान या सा:या प्रवासात तिचं कुटुंब तिच्या पाठीशी भक्कम उभं होतं. अख्ख्या कुटुंबानं तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते स्वप्नच जगून पाहिलं. त्यापायी कुटुंबाने हलाखीत दिवस काढले, अनेक अडचणींवर मात केली, पण आपला ध्यास सोडला नाही. 
पण मुळात आपण क्रिकेटच खेळायचं हे या मुलीनं का ठरवलं असेल?
नुस्तं टीव्ही पाहून नी क्रिकेटस्टार्स ‘आवडून’ हे पॅशन रुजलं नाही, तर तिच्या घरातच क्रिकेटचं वेड होतं. अनुजाचे चुलते महादेव पाटील हे हौशी क्रिकेटपटू. रोज सकाळी ते मैदानावर जात. छोटी अनुजाही त्यांच्याबरोबर जाऊ लागली. तिलाही क्रिकेटची गोडी लागली. हायस्कूलमध्ये प्रवेश घेतल्यावर तिथं तिचं क्रिकेट खेळणं सुरू झालं. कोल्हापूरच्या तवनाप्पा पाटणो हायस्कूलमध्ये आठवीत शिकत असताना तिनं लेदरबॉल क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. पण नुसतं ठरवून आणि इच्छा असून उपयोग होत नाही. प्रत्यक्ष खेळताना येणा:या ख:या अडचणी आता तिला जाणवू लागल्या. 
सर्वात मोठी अडचण होती ती तिला खेळण्यास सवंगडी आणायच्या कोठून? 
कोल्हापुरातही क्रिकेट हा पुरुषांचाच खेळ आहे, तो मुलींनी कसा खेळायचा अशीच सार्वत्रिक धारणा. पण अनुजाला तर खेळायचंच होतं, मग तिनं मुलांच्या संघातून खेळायला सुरुवात केली. जे खेळण्याचं तेच प्रशिक्षणाचंही. मुलांच्याच शिबिरात प्रशिक्षण सुरू झालं. पण क्रिकेट कोच अनिल सांगावकर यांनी कुठलाही वेगळेपणा न जाणवू देता तिला मुलांच्या तोडीस तोड क्रिकेटचे धडे दिले. आणि अनुजाच्या या क्रिकेटप्रेमाला तिच्या आई-वडिलांनीही प्रोत्साहन दिलं. मात्र त्यांच्या या निर्णयाला नात्यागोत्याच्या माणसांपासून शेजा:यापाजा:यांनीही सुरुवातीला नाकंच मुरडली. मुलीनं मुलांसारखं टी शर्ट आणि पँट घालून खेळण्यास जाणं आणि त्याला पालकांनी परवानगी देणं म्हणजे काहीतरी मोठा अपराध केल्यासारखं अनुजाच्या आईबाबांकडे लोक पाहत. पण त्यांचा इरादा पक्का होता. त्यांनी लेकीच्या हातातली बॅट चुकून मागे घेतली नाही. 
पण हे स्वप्न मोठं असलं तरी ते पूर्ण करण्याचा खर्चही मोठा होता. कोल्हापुरातील शाहू मिल कॉलनीतील छोटय़ा घरात पाटलांचा सगळा कुटुंबकबिला. अरुण पाटील हे रिक्षाचालक. आई शोभा घरी वेफर्स बनवायची. नंतर या धंद्यात स्पर्धा वाढल्यानं तोही बंद पडला. नंतर त्यांनी घरगुती खाणावळ सुरू केली. त्यावरच सगळ्या कुटुंबाचा डोलारा. 
अनुजाची क्रिकेटमधील प्रगती तर वेगानं होत होती, पण तसतसा खर्चही वाढत होता. तिला चांगलं किट मिळावं म्हणून मदतीसाठी अरुण पाटील यांनी लोकप्रतिनिधींसह अनेकांकडे मदत मागितली. काहींनी मदत केली, तर काहींनी नुसतीचं आश्वासनं दिली. पण पाटील कुटुंबीयांनी अनुजाच्या प्रशिक्षणात खंड पडू दिला नाही. 
अनुजाच्या, तिच्या काकाच्या, आई-वडिलांच्या कष्टाला लवकरच फळं मिळू लागली. सराव शिबिरातून प्रथमच खेळताना तिनं 16 वर्षाखालील महिला महाराष्ट्र संघात स्थान पक्कं केलं. प्रवरानगरमध्ये (अहमदाबाद) झालेल्या अखिल भारतीय स्तरावरील क्रिकेट स्पर्धेत तिने सहा सामन्यांत मोठय़ा चपळाईने 20 खेळाडूंना धावबाद केल्याबद्दल तिला ‘बेस्ट फिल्डर’ पुरस्काराने गौरविण्यात आलं. क्षेत्ररक्षणासह फलंदाजी व ऑफ स्पिन गोलंदाजी अशी अष्टपैलू खेळाडू म्हणून अनुजा चांगलीच गाजली. उत्कृष्ट कामगिरीमुळे दरवर्षी तिची महाराष्ट्र संघात निवड होत राहिली. त्यानंतर 19 वर्षाखालील पश्चिम विभागीय महिला क्रिकेट साखळी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद तिनं चोखपणो सांभाळले. पश्चिम बंगालमधील अखिल भारतीय महिला क्रिकेट सुपर लीग खेळण्याची संधी मिळाली. यातील चार सामन्यांत 154 धावांची मोट बांधत सहा बळी तिने टिपले. या सा:या कामगिरीमुळे रणजी क्रिकेट संघाचं दार तिच्यासाठी खुले झाले.
राजकोटमध्ये (गुजरात) बडोदा संघाविरुद्ध खेळताना चार बळी घेऊन संघाच्या विजयात तिने मोलाची कामगिरी बजावली. हैदराबादेतील अखिल भारतीय महिला सुपर लीग क्रिकेट तसेच गुजरातमध्ये पश्चिम विभागीय साखळी 20-20 क्रिकेट स्पर्धा, बडोदामधील अखिल भारतीय 20-20 क्रिकेट स्पर्धेत तिने सरस कामगिरी केली. तिची कामगिरी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या नजरेआड होऊ शकली नाही. तिला असोसिएशनने ‘बेस्ट अपकमिंग प्लेअर’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. 
आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचं तिच स्वप्न पूर्ण झालं ते 2012 साली. श्रीलंकेत झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी तिची भारतीय संघात निवड झाली. 
29 सप्टेंबर 2012 हाच तो दिवस. याचदिवशी गाले येथे इंग्लंडविरुद्ध तिने आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. एका सर्वसामान्य कुटुंबातील आई-वडिलांनी मुलीला घडवण्याच्या घेतलेल्या असामान्य ध्यासाची ती पूर्ती होती. अनुजाच्या अंगावर निळ्या रंगाची ‘इंडिया’ची जर्सी होती.
त्यानंतर यंदा जानेवारीत झालेल्या ऑस्ट्रेलिया दौ:यात आपलं कौशल्य दाखवून दिलं. भारतीय संघानं तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती आणि यात अनुजाचा वाटा मोठा होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात श्रीलंकेला व्हाईटवॉश देण्यासाठी या ‘पंचगंगेच्या पाण्याचा’ही चांगला वापर झाला होता. 
यंदा ती 2016 चा टी-20 विश्वचषक खेळली. टीम इंडियाच्या निळ्या जर्सीमध्ये सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांना विक्रमाचे डोंगर रचताना तिनं पाहिलं आहे. तीच निळी जर्सी आज तिच्या अंगावर आहे. इतकंच काय तर या दिग्गज खेळाडूंचा सहवास आणि मार्गदर्शनही तिला मिळतं आहे. कोल्हापूरच्या तांबडय़ा मातीत घेतलेला ध्यास आज ईडन गार्डनच्या हिरवळीर्पयत पोहोचला आहे. निळी जर्सी अंगावर चढवली की, मैदानावर चांगली कामगिरी करणं आणि संघाला विजय मिळवून देणं इतकंच आपल्याला माहीत असतं, असं अनुजा म्हणते.  तिच्या इथवरच्या प्रवासाचं हेच सूत्र आहे, हे तिच्याशी बोलताना जाणवत राहतं. 
 
 
स्मृती म्हणते.
आता मुलींनाही क्रिकेटमध्ये प्रचंड संधी निर्माण झाल्या आहेत. आयसीसीच्या धोरणानुसार पुरुष संघाच्या बरोबरीने महिला संघाचे सामने आणि दौरे आयोजित करण्यात येणार आहेत. महिला खेळाडूंनाही करार पद्धत लागू केल्यानं आर्थिक स्थिरता आली आहे. अनेक खासगी कंपन्याही आता महिलांना पुरस्कृत करीत आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांचे टीव्हीवरून थेट प्रक्षेपण होत असल्यानं खेळाडूंना प्रचंड प्रसिद्धी मिळत आहे. एकूणच क्रिकेटवेडय़ा भारतात पुरुष संघाइतकंच महिला संघालाही ग्लॅमर येईल अशी आशा आहे. माङया अनुभवावरून मी एकच गोष्ट सांगते, चांगली कामगिरी केल्यास कोणालाही भारतीय संघातून खेळता येतं; पण त्यासाठी हवी जिद्द, चिकाटी आणि ध्यास! नामुमकीन को मुमकीन बनाने की कोशीश है ये!
 
अनुजा म्हणते,
विराट कोहलीला मी माझा रोल मॉडेल मानते. मला विराटचा अॅटिटय़ूडच आवडतो. तो अतिशय पॉङिाटिव्ह आणि अॅटॅकिंग क्रिकेट खेळतो. विशेषत: टार्गेट चेस करताना तो कसलंही दडपण न घेता आपल्या नैसर्गिक शैलीत खेळतो. त्याचा हा गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. काय वाट्टेल ते झालं तरी आपलं ध्येय चेस करायचंच हे मी विराटकडून शिकतेय!
 
 
- विश्वास चरणकर
(क्रीडाक्षेत्रवर बारीक लक्ष असलेला विश्वास लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीत उपमुख्य उपसंपादक आहे.)
vishwas.charankar@gmail.com

Web Title: Blue jersey girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.