Bill Gates says, the habit of working at the last minute is fatal! | बिल गेट्स का म्हणतात, शेवटच्या क्षणी काम करण्याची सवय घातक!
बिल गेट्स का म्हणतात, शेवटच्या क्षणी काम करण्याची सवय घातक!

ठळक मुद्देआपण कामचुकार नसतो, काम टाळतही नसतो. पण शेवटच्या क्षणार्पयत ते काम लटकवून ठेवतो आणि मग धावतपळत कसंबसं ते पूर्ण करतो.

अमेरिकेतल्या एका भाषणात बिल गेट्स यांनी हा किस्सा सांगितला होता स्वतर्‍च्याच भयंकर वाईट सवयीचा. ते सांगतात, की मी काम चांगलं करायचो. पण सगळी कामं शेवटच्या मिनिटार्पयत तंगवून ठेवायचो. वेळ संपत आली, की मग धावतपळत काम करायचो. माझं काम चांगलं व्हायचं, पण त्या कामाचा मला आनंद होत नसे. दुसरं म्हणजे कुणीही त्या कामाचं काही कौतुक करीत नसे. मग वाटायचं, की हे काय, आपण इतकं काम करतो, चांगलं करतो तरी कुणाला त्याचं काही विशेष वाटत नाही. हा खेद एकीकडे, दुसरीकडे ते काम करताना येणारा ताण, काम चांगलं करण्यापेक्षा ते वेळेत करण्याचंच टेन्शन मग वाढत जायचं. इतकं वाढायचं, की काम पूर्ण झालं, सुटलो असं वाटायचं.
नंतर नंतर माझ्या लक्षात यायला लागलं, की आपल्याला ही वाईट सवय सोडावी लागेल. आपल्याला काम करायचं असतं, ते आपल्याला आवडतं. जमतंही. मग शेवटच्या क्षणार्पयत ते काम टोलवत कशाला राहायचं? मग प्रय} करून मी ती सवय मोडली.
हे जे बिल गेट्स सांगतात, ते आपल्यापैकी अनेकांसाठी तंतोतंत खरं असतं. आपण कामचुकार नसतो, काम टाळतही नसतो. पण शेवटच्या क्षणार्पयत ते काम लटकवून ठेवतो आणि मग धावतपळत कसंबसं ते पूर्ण करतो.
ही सवय तोडण्याचंही अवघड काम जमवलं तर जमू शकतं.
ते कसं जमेल याचं उत्तरही, बिल गेट्सच देतात.
ते म्हणतात,  की सकाळी फक्त 15 मिनिटं मी कागदपेन घेऊन बसायला लागलो. जी कामं त्या दिवशी होणं गरजेचीच आहे, ती आधी करतो. मग बाकीची. दुसरं काम किती तातडीचं आलं ऐनवेळी तरी, जे आधी करायचं काम असतं, त्याला वेळ देतोच. हळूहळू हे प्लॅनिंग जमतं.
जे त्यांना जमलं ते आपल्यालाही जमू शकेल, अट इतकीच, की आपण ते करणार का?
की अगदी आपल्या करिअरच्या, यशाच्या जिवावर बेतेलक्ष्तपत उशीर होईर्पयत ही सवय लांबवत नेणार?


Web Title: Bill Gates says, the habit of working at the last minute is fatal!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.