झटकेपट वजन कमी करणारं यो यो डाएट करताय? मग सावध व्हा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 03:11 PM2018-06-21T15:11:20+5:302018-06-21T15:11:20+5:30

अनेकांची तक्रार, काहीही करा, वजन कमीच होत नाही. कमी झालं तरी झर्रकन वाढतं, असं का?

are you on yo yo diet? | झटकेपट वजन कमी करणारं यो यो डाएट करताय? मग सावध व्हा !

झटकेपट वजन कमी करणारं यो यो डाएट करताय? मग सावध व्हा !

Next
ठळक मुद्देत्यामुळे डाएट कधीपर्यंत करू, या प्रश्नाचं उत्तर एकच आयुष्यभर!  आणि व्यायाम कधीर्पयत तर तोही आयुष्यभर !!

- डॉ. यशपाल गोगटे

वजन कमी करणं, ही सध्या बहुसंख्य तरुणांची समस्या असते. गेल्या आठवडय़ात आपण पाहिलंच की, नुस्तं व्यायाम करण्याशी नाही तर आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींशीही वजनाचा संबंध आहे. नियमित व्यायाम करण्याचे फायदे तर आहेतच. करण्याबद्दलची माहिती आपण मागील काही लेखांमधून जाणून घेतली. तसं अनेकजण उत्साहानं आहाराचे नियम आखतात. व्यायाम जोमानं करतात. वजन कमीही होतं. पण वजन कमी झाल्यावर पुढे काय? ते कमी झालेलं वजन टिकवून कसं ठेवायचं? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जो सगळेच विचारतात की, वजन नेमकं किती कमी करावं?   अनेकजण वजन कमी करायला सुरुवात करतात तेव्हा त्यांच्या मनात 10-15-25 किलो असे काहीसे भन्नाट आकडे असतात. इतकं वजन सहजासहजी कमी होत नसतं. त्यामुळे वजन कमी करायला सुरुवात केल्यावर अपेक्षित यश मिळत नाही. आपण इतकं काही करतोय, इतके दिवस करतोय तरी म्हणावं तसं वजन कमी होत नाही असं म्हणत काहीजण निराशेपोटी व्यायाम करणं, आहारावर नियंत्रण ठेवणं सोडून देतात. आणि म्हणतात काहीही करा, वजन कमीच होत नाही. याचं मुख्य कारण हेच की, आपण किती वजन कमी करायचो, याचा वस्तुनिष्ठ विचारच करत नाही. मग नक्की वजन कमी किती करावं? तर त्याचा एक नियम आहे. तुमच्या वजनाच्या पाचटक्के एवढे वजन कमी केलं तरी वजन कमी करण्याचे, चयापचयाचे आजार नियंत्रित राहण्याचे फायदे आपल्याला मिळतात. म्हणजेच 60 किलो वजन असणार्‍या तरुणीनं तीन किलो वजन कमी केलं तरी तिला त्या वजन कमी करण्याचा फायदा होतो. तेवढं होतंय का कमी, याचा सुरुवातीला विचार करा.
वजन कमी केल्यावर ते टिकवून ठेवणंदेखील तेवढंच महत्त्वाचं असतं. झटकन वजन कमी करणं मग ते परत वाढवणं आणि नंतर परत कमी करणं या प्रकाराला ‘यो-यो’ असं म्हटलं ेजातं. ते शरीराला जास्त नुकसान करतं. त्यामुळे थोडंसंच जरी वजन कमी केलं तरीपण ते जास्त काळ तसंच टिकवून ठेवणं महत्त्वाचं. तर ते अधिक फायद्याचं ठरतं.


वजन उतरायला लागल्यावर काही काळानं कितीही प्रयत्न केला तरी वजन उतरत नाही. त्याला वजनाचा ‘प्लॅटो फेज’ असं म्हणतात. प्लॅटो फेजवर मात मिळवण्याकरता खाण्याकडे लक्ष देणं व योग्य व्यायाम करत राहणं हे गरजेचं असतं. आपण हे नियमित केलं तर प्लॅटो फेज आपोआप तुटते. वजन पुन्हा एकदा कमी व्हायला सुरुवात होते. व्यायाम कमी करण्यासाठी जसं आहारावर नियंत्रण ठेवणं गरजेचे असतं. तसंच कमी झालेलं वजन टिकवून ठेवण्याकरता व्यायाम करणं गरजेचं आहे.
वजनाबद्दलची एक कायमची असलेली तक्र ार म्हणजे, माझं वजन कमी होतं; पण ते परत जैसे थे वाढून जातं. या वजनवाढीला ‘रिबॉउण्ड वेट गेन’ असं म्हणतात. याची अनेक कारणं  आहेत. मुख्य म्हणजे मेंदूत हायपोथॅलॅमसमधील वजनाचा एक सेट पॉइंट. पूर्वी जेव्हा दुष्काळ येत असे तेव्हा हा सेट पॉइंट वजनाला खूप कमी होऊ देत नसे. पण आता अनेकांची बरीच चांगली स्थिती असतानाच्या आजकालच्या काळात तो वजन कमी करण्यास बाधक ठरतो. वजन कमी व्हायला लागलं की शरीरात काही हार्मोन्स तयार होतात. त्यामुळे वजन पुन्हा वाढायला लागतं. यामुळेच वजन कमी करणं ही तात्पुरती योजना नसून यावर कायमस्वरूपी उपाय करावा लागतो. बरेचवेळा लग्नासाठी किंवा पार्टीसाठी किंवा इतर काही खास फंक्शनसाठी म्हणून वजन कमी केलं जातं. ते कार्य पूर्ण झालं की मग वाट्टेल ते खाणं, हादडणं, व्यायाम न करणं सुरू होऊन जातं. अशावेळेसही वजन परत वाढायला लागतंच.

 

Web Title: are you on yo yo diet?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.