आलिया...जे समोर आयुष्य आहे, ते जगावं, प्रामाणिकपणे त्याला सामोरं जावं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 01:21 PM2017-10-12T13:21:43+5:302017-10-12T13:23:08+5:30

जे समोर आयुष्य आहे, ते जगावं, प्रामाणिकपणे त्याला सामोरं जावं. हा मी ठरवलेला एक साधासोपा मार्ग आहे. त्यावरून चालत राहणं मला आवडतं.

Aliya ... | आलिया...जे समोर आयुष्य आहे, ते जगावं, प्रामाणिकपणे त्याला सामोरं जावं

आलिया...जे समोर आयुष्य आहे, ते जगावं, प्रामाणिकपणे त्याला सामोरं जावं

Next

धीस इज लाइफ. माय लाइफ.
जे समोर आयुष्य आहे, ते जगावं, प्रामाणिकपणे त्याला सामोरं जावं. हा मी ठरवलेला एक साधासोपा मार्ग आहे. त्यावरून चालत राहणं मला आवडतं.
माझे वडील. तुम्हांला त्यांचं नाव आणि स्वभाव सगळंच माहीत आहे. ते नेहमी सांगतात, द बेस्ट आॅफ नोइंग इज नॉट नोइंग...‘मला माहीत नाही’ असं एकदा मान्य केलं की, माहिती करून घेणं सुरू होतं. हे एक फार सोपं लॉजिक आहे. मी तेच वापरते.
माझ्यासाठी आयुष्यात दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत : लॉजिक आणि लव्ह!
लव्ह म्हणजे स्वत:वरचं प्रेम. सेल्फ लव्ह. माझं प्रेम आहे स्वत:वर. मी जी काही आहे, जशी आहे तसं मी स्वत:ला स्वीकारलं आहे. मनापासून. मी प्रेमानं सांगते स्वत:लाच, इट्स ओके आलिया, इफ यू डोण्ट नो सो मेनी थिंग्ज, इट्स ओके. जे येतं, ते फक्त नीट कर!
मला काय येतं?
- तर कॅमेºयासमोर उभं राहून ते जे काही कॅरेक्टर आहे, ते मला जगता येतं.
माझ्या आयुष्यात अगदी लहानपणीच माझ्याही नकळत हे माझ्यात भिनलं की, बदल हीच एकमेव सतत चालणारी गोष्ट आहे. जग बदलतं. आपण बदलतो. बºयाच गोष्टी असतात, तशा राहत नाहीत. आयुष्य घट्ट मुठीत करकचून आवळून नाही ठेवता येत.
यश मिळालं तर ते दोन्ही मुठीत घट्ट धरून ठेवता येतं का? ते यश सांडू नये, हरवू नये, कुणी हिसकावू नये किंवा कायमचं आपल्याला सोडून जाऊ नये म्हणून किती काळ मूठ आवळणार आपण?
- यशाचं अत्तर इटुकल्या जागेतून कधी हवा होईल आपल्या लक्षातही येणार नाही. मग कशाला मूठ आवळा? त्यापेक्षा तळहातावर जे काही जगणं आहे ते जगलेलं, जपलेलं बरं.
आज आलियाकडे यश आहे, उद्या असेलच असं नाही. मिळालेलं यश असं कायमचं, सतत आपल्यासोबत राहत नाही, याची मला जाणीव आहे. आज मला यश मिळतंय, उद्या दुसºया कुणाला मिळेल. आज लोक मला बेस्ट म्हणतात; पण उद्या माझ्यापेक्षा बेटर कुणीतरी येईल. आपल्यापेक्षा सर्वार्थानं बेटर असं कुणीतरी असतंच या जगात. त्यानं आपली जागा घेतली की आपण आउट!
मग आपण काय करायचं?
आपलं मन म्हणतं ते बिनधास्त करायचं!
आपलं मन देतंच की इण्ट्युशन!
आपलं इन्स्टिंक्ट असतं, ते दाखवेल त्या दिशेनं जायचं. जाता-येता अखंड प्लॅनिंग-प्लॅनिंगचा खेळ नाही खेळायचा. सतत फार विचारबिचार करून निर्णय घेतले की, त्या निर्णयांतली सगळी गंमत निघून जाते.
समोर आलं. आवडलं. करावंसं वाटलं. केलं. मस्त केलं. मजा आली. समाधान वाटलं. संपलं!
हवं कशाला प्लॅनिंग ज्यात त्यात?
मी हेच करते.
माझे वडील नेहमी म्हणतात, यशाची चव चाखली की माणसांचा एक प्रॉब्लेम होतो. त्यांना वाटू लागतं की हे यश कायम राहील. यश कसं मिळवायचं याचा फॉर्म्युलाच सापडला आपल्याला. आणि मग अनेकजण गोष्टी इझी घ्यायला लागतात. त्यांना वाटतं, जमलं आता! पुढे सोपंच असणार सगळं. एकदा जमलं म्हणजे मग यापुढे सतत जमेलच!
‘जमतं आपल्याला’ हा एक ट्रॅप आहे, हे लक्षात ठेवलेलं बरं...

Web Title: Aliya ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.