सोशल मीडियाचे प्रश्न हे
बाहेर कसे सोडवता येतील?
त्यासाठी उत्तरंही याच
माध्यमात शोधावी लागतील.
ते उपाय कुठले?
काय केलं तर यूजर्सना
सोशल मीडियातूनच अलर्ट,
मदत आणि काऊन्सिलिंग मिळू शकेल?
मुळात असं करता येईल का?
तर येईल,
त्याला म्हणतात
पॉपअप अलर्ट!

प्रश्न कळले, आपलं कुठं चुकतंय हे पण कळलं; पण उपाय काय?
हा अभ्यास सोशल मीडियाच्या व्यसनावर उतारा म्हणून काही उपायही सुचवतो. सुचवले आहेत. हा अभ्यास म्हणतो की, एखादी व्यक्ती सोशल मीडियावर सातत्यानं खूप वेळ घालवत असेल, दिवसाचे अनेक तास सोशल मीडियावरच घालवत असेल तर त्या माध्यमानं यूजर्ससाठी काही पॉपअप द्यावेत. पॉपर म्हणजे काय तर एक प्रकारचा इशारा, लक्षवेधी सूचना की तुम्ही अमुकवेळेपेक्षा जास्त काळ इथं आहात, जरा तपासा. वैधानिक इशारा म्हणून जसा सिगारेटच्या पाकिटावर असतो तसा सोशल मीडियाच्या अतिरिक्त वापराच्या दुष्परिणामांची माहितीही या साइट्सने द्यायला हवी.
या अभ्यासात हे ठळकपणे दिसतं आहे की, यूजर्सच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर सोशल मीडियाच्या अति वापराचे विपरीत परिणाम होतात. माध्यम व्यसनाधीन बनतात अनेकजण. त्यामुळे जागरूक वापरकर्ते बनवणं किंवा यूजर्सना परिणामांची माहिती देणं ही या माध्यमांची जबाबदारी आहे. आणि त्यांनी ती स्वीकारली पाहिजे असंही हा अभ्यास अधोरेखित करतं. अर्थात, यूजर्सना पॉपअपच्या माध्यमातून कळवल्यानंतरही त्यांना वापर चालू ठेवायचा असेल तर ती यूजरची निवड आहे; पण सोशल मीडिया साइट्सचे अतिरिक्त वापर करणाºया व्यक्तींना अलर्ट करणारे मेसेज जाणं गरजेचं आहे. ‘आरएसपीएच’चे सर्वेक्षण पूर्ण करणाºयांपैकी ७१ टक्के लोकांना ही कल्पना पसंत पडली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पॉपअप दिल्यामुळे वेळीच मनाला आवर घालायला मदत मिळू शकेल. सोशल मीडियावरून ठरावीक वेळेसाठी बाहेर पडणं आणि कालांतराने पुन्हा येणं या गोष्टी सोप्या होऊ शकतील.

फोटोशॉप केलेत का फोटो?
एखाद्या यूजरने सोशल साइट्सवर फोटो अपलोड करताना जर फोटो एडिटिंग अ‍ॅप्स वापरले असतील, फोटोशॉप इफेक्ट असतील त्या फोटोत, तर त्या फोटोच्या त्याच्या वापराचा स्पष्ट उल्लेख करणारा एक छोटा आयकॉन असावा असंही हा अभ्यास म्हणतो. इतरांचे सुंदर, आकर्षक आणि सेक्सी फोटो बघून अनेकांच्या मनात स्वत:च्या दिसण्याविषयी, शरीराच्या ठेवणीविषयी न्यूनगंड तयार होतो. इतरांचे सुंदर फोटो बघत स्वत:च्या फोटोजेनिक नसण्याविषयी नाखूश असणाºयांची संख्या सोशल मीडियावर प्रचंड आहे. या न्यूनगंडातून पुन्हा मानसिक ताण, प्रचंड खाण्याची सवय, त्यातून वाढणारे वजन, न खाण्याकडे वळणं, निराशा अशा अनेक समस्यांची सुरु वात होते. हे टाळायचं असेल तर जे फोटो एडिटिंग अ‍ॅप्स वापरून दुरूस्त केलेले आहेत त्या फोटोंच्या खाली वॉटरमार्क किंवा आयकॉन असला पाहिजे, म्हणजे हा फोटो ओरिजनल असा नाही इतकं तरी किमान बाकीच्यांना कळू शकेल. कुढणं कमी होईल. जे समोर दिसतंय ते खरं आहे हे मानण्याच्या सवयींपासून माणसांना परावृत्त करण्यासाठी याची मदत होईल. विशेषत: फॅशन, ब्रॅण्ड्स, सेलिब्रिटींचे फोटो, जाहिराती अशा सगळ्या ठिकाणी असे आयकॉन आले तर ते पाहून झुरणाºया अनेकांना आपल्या शारीरिक-मानसिक समस्यांवर मात करता येऊ शकेल. ही गोष्ट अवघड असली तरी अशक्य नाही. जनहिताच्या दृष्टीने ब्रॅण्ड्स, फॅशन, सेलिब्रिटी आणि जाहिराती यांनी या गोष्टींचा गांभीर्याने विचार केला पाहिजे असंही या सर्वेक्षणात सुचवलंय.

कुठली माहिती खरी आणि कुठली खोटी?
फेक न्यूज, फेक माहिती ही आजच्या सोशल मीडियाची मोठी समस्या आहे. आपल्यापर्यंत पोहचणारी माहिती दरवेळी खात्रीलायक साइट्सवरून आलेली असेलच असे नाही. अनेकदा आपल्यापर्यंत विविध माध्यमातून पोहचणारी माहिती खरी असतेच असंही नाही. सोशल मीडिया वापरणाºया लोकांनाही पोहचणारी माहिती खरी आहे की खोटी हे कसं तपासायचं हे समजत नाही. एखादा फॉरवर्ड आल्यावर तो खरा की खोटा हे तपासण्याची काय यंत्रणा असते याविषयी देखील बºयापैकी अज्ञान आहे. अशावेळी निरनिराळ्या साइट्सनी याविषयी जागरूकता निर्माण होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्याचप्रमाणे सोशल मीडिया वापराचं वय कमी कमी होत आहे हे लक्षात घेता शाळा, कॉलेज पातळीपासूनच सोशल मीडिया म्हणजे नेमकं काय, तो कसा वापरला पाहिजे, त्याच्या अति वापराचे काय परिणाम होऊ शकतात, खरी माहिती आणि खोटी माहिती हे कसे तपासायचे हे समजून घेतले पाहिजे. याबद्दल तरु ण-तरुणींशी बोलले पाहिजे. जनजागृती कार्यक्र म राबवले पाहिजेत.

शाळेतच धडे गिरवा
मुलं तेरा वर्षांची होत नाहीत तो सोशल मीडियावर येतात. सोशल मीडिया हा महासमुद्र आहे. तिथे सर्व प्रकारची माणसं असतात. सर्व वृत्तीची लोकं असतात. वावरणाºया माणसांचे हेतू निरनिराळे असतात. दरवेळी हेतू चांगले असतीच असं नाही. अनेकदा हेतू संशयास्पद असतात. वाईट असतात. आपण अनेक केसेस ऐकतो, वाचतो ज्यात तरु ण- तरु णींची फसवणूक होते. अवैध मानवी वाहतुकीत सोशल मीडियाचा मोठा हात असतो हे अनेक घटनांमधून सिद्ध होतंय. म्हणूनच तरु ण होणाºया मुला-मुलींना जागरूक करणं गरजेचं आहे. शालेय पातळीवरच सोशल मीडियाचे शरीरावर आणि मनावर होणारे परिणाम काय असतात याची माहिती दिली पाहिजे. सायबर बुलिंग, ट्रोलिंग, सोशल मीडियाचे व्यसन, शरीराची ओळख याविषयी बोललं पाहिजे.

मानसिक आजारांशी लढण्याचं साधन

माणसे सोशल मीडियावर काय लिहितात यावरून त्यांच्या मनात काय चालू आहे, ते कोणत्या मानसिक अवस्थेतून जाताहेत याचा अंदाज येऊ शकतो. आपण अनेकदा बघतो, आत्महत्या करण्याआधी व्यक्ती सोशल मीडियावर पोस्ट टाकते. अनेकदा त्याआधीही निराशाजनक पोस्ट व्यक्तीने टाकलेल्या असतात. अशावेळी त्या पोस्टकडे त्या व्यक्तीच्या आजूबाजूचे दुर्लक्ष करतात आणि आत्महत्या झाली की हळहळ व्यक्त होते. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हे रोखता येऊ शकते हा ‘आरएसपीएच’ला विश्वास वाटतो. त्यांच्या मते, अशा निराशाजनक, मानसिक आजाराची लक्षणे अधोरेखित करणाºया पोस्टवर लक्ष केंद्रित करून त्या पोस्ट टाकणाºया व्यक्तीपर्यंत मदत पोहचवता येईल का, याचा विचार व्हायला हवा. काही आॅनलाइन टूल्स, समुपदेशनाच्या सोयी कशा उपलब्ध होतील, याबद्दलही यूजर्सना जागरूक करता येऊ शकतं.


 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.