इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना 3 इण्टर्नशिप मस्ट, पण त्या इण्टर्नशिप प्लॅन कशा कराल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 05:29 PM2017-08-04T17:29:54+5:302017-08-04T17:39:14+5:30

प्रत्येक वर्षीची इण्टर्नशिप तुम्हाला वेगळं काही शिकवेल, आणि त्यातून कदाचित प्री-प्लेसमेण्ट जॉब ऑफरही तुम्हाला मिळू शकेल!

3 internships mandatory for engineering studets? -how to plan for them | इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना 3 इण्टर्नशिप मस्ट, पण त्या इण्टर्नशिप प्लॅन कशा कराल?

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना 3 इण्टर्नशिप मस्ट, पण त्या इण्टर्नशिप प्लॅन कशा कराल?

Next
ठळक मुद्देइण्टर्नशिप मन लावून करा, कामात झोकून द्या.सॉफ्ट स्किल्स आणि कम्युनिकेशन शिका.नवीन तंत्रज्ञान शिका, वापरायचा प्रयत्न करा.

येत्या शैक्षणिक वर्षापासून इंजिनिअरिंगच्या विद्याथ्र्याना इण्टर्नशिप करणं सक्तीचं असून, त्यांना योग्य इण्टर्नशिप मिळावी म्हणून प्रयत्न  करणं महाविद्यालयं आणि शिक्षणसंस्थांसाठीही बंधनकारक. ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल  एज्युकेशन  म्हणजेच एआयसीटीई या तांत्रिक शिक्षणासाठी सर्वोच्च असलेल्या संस्थेनंही याप्रकारच्या इण्टर्नशिपची गरज व्यक्त केली आहे.  एआयसीटीई स्वत: संस्थांना योग्य कंपन्यात इण्टर्नशिप मिळवून देण्यासाठीचे प्रयत्न  करत आहे. त्यासाठीच्या व्यवस्था तयार करण्यात येत आहेत.  लिंकडीन, इण्टर्नशाळा यासारख्या समाजमाध्यमांना, पोर्टल्सना त्यात सहभागी करुन घेतलं जात आहे. इण्टर्नशिप सक्तीची तर केली पण आपल्याला योग्य इण्टर्नशिप मिळणार कुठं? ती कधी करायची? कोणत्या कंपनीत केली तर फायद्याचं, आपल्याला कंपनीवाले का घेतील, मुख्य म्हणजे कोणत्या इण्टर्नशिपमध्ये आपण काय शिकणं अपेक्षित आहे असे अनेक प्रश्न इंजिनिअरिंगच्या विद्याथ्र्याना पडणं अत्यंत रास्त आहे. त्यामुळे कोणत्या इण्टर्नशिपचा काय हेतू असला पाहिजे  या प्रश्नांची उत्तरं शोधायला मदत करणार्‍या या काही टिप्स.

 

1) पहिली इण्टर्नशिप सॉफ्ट स्किलसाठी.

पहिल्या वर्षी तुम्ही जी इण्टर्नशिप कराल त्यावेळी हे लक्षात ठेवलं पाहिजे की इंजिनिअरिंगचं टेक्निकल ज्ञान तुमच्याकडे कमीच असणार आहे. हा टप्पा आहे जास्तीत जास्त सॉफ्ट स्किल्स शिकण्याचा. कंपनीच्या वातावरणात कसं वावरतात, इतरांशी, वरिष्ठांशी कसं बोलतात, संवाद कसा साधतात ही सारी संवाद सूत्र या इण्टर्नशिप मध्ये शिकायला हवीत. त्यातून तुम्हाला काम करण्याची वेगळी नजर मिळेल. त्यामुळे पहिल्या इण्टर्नशिपमध्ये जास्तीत जास्त सॉफ्ट स्किल्स शिका. बोलणं-वागणं-बसणं, चर्चा करणं, ऐकून घेणं, इथपासून सॉफ्ट स्किल्स शिकण्याची सुरुवात होऊ शकते.

 

2) दुसरी इण्टर्नशिप मॅनेजमेण्ट, कण्टेण्ट रायटिंग किंवा सेल्समध्ये

या इण्टर्नशिपमध्ये तुमचं कम्युनिकेशन स्किल तर सुधारेलच, पण तुम्हाला टिममध्ये काम कसं करायचं हे शिकता येईल. त्यातून तुम्हाला कार्पोरेट जगात डोकावून पाहण्याची एक संधी मिळल. किंवा मग एखाद्या एनजीओत इण्टर्नशिप करा, आपल्या कामाचा जगण्याचा फोकस, आपल्या कामाचा उपयोग हे सारं तुम्हाला त्यातून ठरवता येईल.

 

तिसरी इण्टर्नशिप : प्रॅक्टिकल अ‍ॅप्लिेकशनसाठी

 द्वितीय आणि तृतीय वर्षार्पयत तुमचं कम्युनिकेशन स्किल वाढलेलं हवं. तुम्हाला तुमच्या फिल्डचा अंदाज यायला हवा. तेच तुम्ही आधीच्या इण्टर्नशिपमधून शिकलेलं असता. आता तिसर्‍या इण्टर्नशिपला प्रत्यक्ष कामात उतरा. जे तुम्ही शिकलात ते आणि ते कंपनीत काम चालतं ते प्रत्यक्ष करुन पहा. तुमच्या क्षेत्रातील प्रोफेशनल्सशी संपर्क करा. त्यांच्याकडून काम शिका. हे काम करताना तुम्हाला कळेल की आपल्याला नक्की किती येतं आहे? या क्षेत्रात आपल्याला खरंच रस आहे का? काम करायला आवडेल का याचा काम करुन अंदाज घ्या. मग पुढे काय करायचं ते ठरवा.

 

इण्टर्नशिपच्या पुढे जॉब

तुमच्या पहिल्या दोन इण्टर्नशिपमुळे तुमचा रिझ्युमे उत्तम होवू शकतो.तिसर्‍या इण्टर्नशिपसाठी तुम्हाला मोठय़ा ब्रॅण्डची कंपनी मिळू शकते. एकदा इण्टर्नशिप मिळाली की झोकून देऊन काम करा. मिळेल ते शिका. नवीन लेटेस्ट टेक्नॉलाजी  आणि टुल्स शिकून घ्या. तुमची तिसरी इण्टर्नशिप तुम्हाला तुमचा पहिला जॉब मिळवून देऊ शकते. त्याला म्हणतात प्री-प्लेसमेण्ट ऑफर. ती संधीही तुम्हाला मिळेल, फक्त इण्टर्नशिप मन लावून आणि उत्तम करा.

 

-सर्वेश अग्रवाल

संस्थापक सीईओ इण्टर्नशाळा.

(internshala.com)

Web Title: 3 internships mandatory for engineering studets? -how to plan for them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.